Breaking News
Home / माहिती / धावत्या गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे का लागतात, बघा ह्यामागचे कारण

धावत्या गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे का लागतात, बघा ह्यामागचे कारण

माणसं आणि त्यांचं श्वानप्रेम हा सध्याच्या जगात कौतुकाचा विषय बनलेला आहे. आपल्या आजूबाजूला असा एक ना एक तरी असामी असतो ज्याला या इमानदार प्राण्याबद्दल विशेष प्रेम असतं. मग ते घरी कुत्रा पाळत असोत वा नसोत. मध्यंतरी एक विडीयो समोर आला होता, ज्यात त्या घरातला कुत्रा, त्या घरातल्या छोट्या मुलीला टीव्ही बघण्यात मदत करत असे असं सी.सी.ती.व्ही. फुटेज पाहून दिसून आलं. त्या छोट्या मुलीचे वडील घरी येत आहेत असं त्याला वासावरून आणि आवाजावरून कळलं कि तो तिला टीव्ही बंद करायला सांगत असे. त्यासाठी तो भुंकत असे किंवा तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवत असे. हि गंमतीदार गोष्ट नुकतीच वायरल झाली होती. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो कि या मनमिळावू प्राण्याने आपल्या मनाच्या कोपऱ्यात एक विशेष स्थान मिळवलेलं आहे.

पण जेव्हा आपली गाडी आणि खासकरून दुचाकी एखाद्या रस्त्यावरून जात असते आणि कुत्री मागे लागतात तेव्हा मात्र आपल्या मनातला भीतीचा कोपराहि जागृत होतो, हे नक्की. एकदा असा विडीयोहि वायरल झाला होता, ज्यात अमेरिकेत एक व्यक्ती गाडीवरून जात होता. कुत्रा पाठी लागला हे पाहून त्याने गाडी हळू केली आणि तो कुत्रा त्याला चा वायला आला. त्याने गाडी पळवली. पण पुढे जाऊन त्याने विचार केला कि हा मला चा वायला आला तर इतरांनाही चाऊ शकतो. त्यासाठी त्याने गाडी पुन्हा त्या रस्त्याने घेत त्या कुत्र्याच्या मालकाला हटकलं. आपल्यालाही असा काहीसा अनुभव आला असेल. यात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा भरणा जास्त. पण घरी पाळलेले कुत्रेही काही वेळेस असं वागतात. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या विचार केला असता, काही अंदाज काढले जातात.

त्यातील पहिला अंदाज म्हणजे कुत्रा हा प्रादेशिक सीमा मानणारा प्राणी आहे. म्हणजेच जेव्हा कुत्रे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणि खासकरून गाड्यांच्या टायरवर लघु शंका करत असतात तेव्हा ते स्वतःचं त्या प्रदेशातील अस्तित्व दाखवून देत असतात. तसेच त्यांची घ्राणेंद्रिय हि तीक्ष्ण असतात हे आपल्याला माहिती आहेच. तसेच कुत्रा हा प्राणी जिथे राहतो त्याचं प्राणपणाने संरक्षण करतो असं सहसा दिसून येतं. काही वेळेस घाबरणारे कुत्रेही असतात. पण रस्त्यावरील कुत्र्यांमध्ये आक्रमकपणा हा आपसूक भिनतो ते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. अशावेळी आवज करत येणारं वाहन कदाचित त्यांना आव्हानात्मक वाटत असावेत. त्यामुळे जर एखादी गाडी जी बाहेरील भागातून आलेली आहे, तिच्या सोबत आलेल्या दुसऱ्या कुत्र्याच्या गंधामुळे या भागातील कुत्र्यांना चेतावनी मिळत असावी. त्यामुळे उद्यपित होऊन हे कुत्रे गाड्यांच्या मागे लागत असावेत.

पण हा अंदाज योग्य मानला तरीही पळत्या गाड्यांच्या मागेच हे कुत्रे विशेष करून लागतात, असं दिसतं. अशावेळी दुसरा अंदाज बांधला जातो. ते म्हणजे कुत्र्यांची असणारी उत्सुक वृत्ती. आपल्या कडेही पाळीव म्हणून असणारे कुत्रे बघितलेत तर जाणवेल कि त्यांना बाहेर जाणं हे फार आवडतं. खेळायला फार आवडतं, खासकरून फेकलेला बॉल किंवा एखादी वस्तू घेऊन येण्यात त्यांची चढा ओढ असते. सोशल मिडियावरती तर अनेक विडीयोजमधून त्यांचा सदैव उत्सुक असणारा स्वभाव अधोरेखित होत असतोच. कदाचित त्यांच्या या उत्सुक स्वभावामुळे जेव्हा एखादी गाडी आवाज करत, तसेच लाईट्सचा वापर करत जाते तेव्हा त्यांच्यातील उत्सुकता जागृत होत असावी आणि ते पाठलाग करत असावेत असा अंदाज बांधता येऊ शकतो. कारण काहीही असो, पण एक मात्र खरं कि या दोन्ही वृत्ती आपल्याला मदतशीरही ठरतात. ज्या घरात राहतात, त्या घराचं संरक्षण करण्याची उपजत वृत्ती असल्याने अनेक वेळेस अनर्थ टळतो. तसेच त्यांच्या उत्सुक वृत्तीमुळे जे मनोरंजन होतं ते वेगळंच.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.