Breaking News
Home / माहिती / धीरूभाई अंबानींचा बिजनेस बुडाला, भजी विकल्या आणि नंतर पुन्हा असे बनले सर्वात श्रीमंत

धीरूभाई अंबानींचा बिजनेस बुडाला, भजी विकल्या आणि नंतर पुन्हा असे बनले सर्वात श्रीमंत

एक प्रमुख व्यावसायिक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक धीरूभाई अंबानी अशा व्यवसायिकां मध्ये येतात जे आपल्या हिंमतीवर स्वप्ने बघतात आणि ती पूर्ण करतात. बोलले जाते कि, धीरूभाई अंबानी ह्यांनी भारतात व्यापार करण्याची पद्धत बदलली. कोणालाही असे वाटले नाही कि, एक भजी विकणारा व्यक्ती जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत येईल. आता आम्ही तुम्हाला सांगत आहेत धीरूभाई अंबानी ह्यांच्या बद्दल माहिती.

धीरजलाल हिरालाल अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी ह्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ ला गुजरातच्या एका सामान्य शिक्षकांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण फक्त हाय स्कूल पर्यंत झाले. परंतु आपल्या दृढ निश्चयाने त्यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय आणि औद्योगिक साम्राज्य निर्माण केले. सुरुवातीच्या काळात धीरूभाई अंबानी गुजरातच्या जुनागढ भागातल्या गिरनार पर्वतावर जाणाऱ्या भक्तांना भजी विकायचे.

धीरूभाई अंबानी गुजरात मधील एक छोटे गाव चोरवाड मधील राहणारे आहेत. घरातील परिस्तिथी चांगली नव्हती, त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतरच छोटे मोठे काम करण्यास सुरुवात केली. सांगितले जाते कि, त्यांनी पहिला भजी विकण्याचे काम केले. त्यानंतर ते १७ व्या वर्षी त्यांचे भाऊ रमणीकलाल ह्यांच्याकडे यमनला गेले. जिथे त्यांना एका पेट्रोल पंप वर ३०० रुपये प्रति महिना नोकरी मिळाली. त्यांचे काम बघून त्यांना फिलिंग स्टेशन मधले मॅनेजर बनवले.

असे सांगितले जाते कि, त्यांना व्यवसाय एवढ्या चांगल्या प्रकारे समजला होता कि, त्यांनी एका शेखला माती सुद्धा विकली होती. प्रत्यक्षात, दुबईच्या शेखला त्यांच्या इथे एक गार्डन बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी दुबईला माती पाठवली आणि त्याचे पैसे सुद्धा घेतले. धीरूभाई अंबानी विषयी बोलले जाते कि, त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये होते जेव्हा ते गुजरात मधील एका छोट्या शहरातून मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य निर्माण केले. १९६६ मध्ये अंबानी ह्यांनी गुजरात मधील नरोड येथे त्यांची पहिली कापड गिरणी चालू केली.

जिथे त्यांनी फक्त १४ महिन्यात १०,००० टन पॉलीस्टर यार्न संयंत्र निर्माण करून एक जागतिक विक्रम केला. ह्या मिलने धीरूभाई अंबानी याना एका वेगळ्या वळणावर आणले. त्यानंतर त्यांनी या मिलला एका मोठा टेक्सटाईलच्या स्वरूपात बदलले आणि आपला स्वतःचा ब्रँड विमल ची सुरुवात केली. आर्थिक अडचणीमुळे धीरूभाई दहावीच्या पुढे शिकू शकले नाही. परंतु त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते कि, शेअर बाजार आपल्या बाजूने कसा करायचा. इथपर्यंत कि, प्रसिद्ध बाजार विशेषज्ञ सुद्धा त्यांना रुलिंग डी – स्ट्रीट पासून थांबवू शकले नाही. त्यानंतर धीरूभाई अंबानी ह्यांनी आपल्या मेहनतीने रिलायन्स इंडस्ट्रीज ला एवढ्या उंचीवर घेऊन गेले.

धीरूभाई अंबानी ह्यांनी २००२ मध्ये आर कॉम लाँच केले आणि रिलायन्स ग्रुप ला मोबाइलच्या दुनियेत ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ ची घोषणा देऊन नव्या उंचीवर पोहचवले. ज्या वेळी धीरूभाई अंबानी ह्यांनी रिलायन्स कॉम्युनिकेशनची सुरुवात केली, त्यावेळी भारतात खूप टेलिकॉम कंपन्या होत्या परंतु आरकॉम ने बाजारात येताच सगळ्यांना मागे टाकले. रिलायन्स ने फक्त ६०० रुपयात मोबाइल फोन आणले. त्यावेळी टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये सरकारी कंपनी बीएसएनएल, एयरटेल, हच, आयडिया, टाटा, एयरसेल, स्पाईस, आणि वर्जिन मोबाइल होते. असे असूनही ते प्रस्थापित झाले. धीरूभाई अंबानी ह्यांचे म्हणणे होते कि, त्यांचे ध्येय पोस्टकार्ड पेक्षाही कमी किमतीत लोकांना फोनवर बोलण्याची सुविधा द्यावी.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.