Breaking News
Home / मनोरंजन / नर्तकीसोबत नागीण डान्स करण्याची हौस तरुणाला पडली महागात, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

नर्तकीसोबत नागीण डान्स करण्याची हौस तरुणाला पडली महागात, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

मनोरंजन होणं ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब असते. त्यातही मनासारखं मनोरंजन असेल तर जो आनंद होतो तो काही औरच असतो. अर्थात ही आपल्यासाठी प्रेक्षक म्हणून जितकी आवडीची बाब असते तितकीच ती आपलं मनोरंजन करणाऱ्यांसाठीही असते. पण मनोरंजन करणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नक्कीच नसते आणि नाही. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं म्हणून हे कलाकार बरीच खटपट करतात. बरंच डोकं लावतात. अनुभवाचा वापर करतात. आणि त्यातून जे काही निर्माण होतं ते आपल्याला खूप आनंद देऊन जातं.

पण सोबतच काही वेळा असं ही होतं की अपेक्षित मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीची मजा येते. म्हणजे आपल्याला अनपेक्षित अशा गोष्टी समोर सादर होतात आणि त्याची मजा अगदी मनापासून घेतो. काही वेळा ही मजा कोणाची तरी फजिती झाल्यामुळे असते तर कधी कधी कलाकाराचं सादरीकरण काही वेगळंच असतं. इतकं वेगळं की हसण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. तसेच सगळ्या गोष्टी इतक्या पटकन घडतात की नकळत हात तोंडावर जातो आणि हसू फुटतं.

आता हे सगळं सांगायचं कारण काय याचा अंदाज आपल्याला लेखाचं शीर्षक वाचून आला असेलच. होय, आज आपल्या टीमने बघितलेला एक धमाल व्हिडियो हे या लेखामागचं कारण आहे. कमीत कमी वेळेचा पण धमाल उडवणारा असा हा एक व्हिडियो आहे. याआधी आपल्या टीमने अनेक व्हिडियोज वर लिखाण केलेलं आहे. पण हा काही वेगळाच व्हिडियो आहे हे नमूद करायला हवं. आता होतं काय ते थोडक्यात जाणून घेऊ. हा व्हिडियो म्हणजे एका नृत्याच्या कार्यक्रमातील छोटा भाग असावा असं वाटतं. एका मोकळ्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं हा व्हिडियो बघून कळतं. हा कार्यक्रम छोटेखानी असावा असं जाणवतं कारण आजूबाजूला ‘प्रेक्षक’ हे संख्येने तुरळकच असतात. पण कार्यक्रमसाठी डीजे आणि लायटिंगची व्यवस्था बऱ्यापैकी असते हे दिसतं. बरं कार्यक्रम थोडा मोकळा ढकळा असतो हे जाणवतं. असा कार्यक्रम असला की प्रेक्षकांच्या फर्माईशी या असतातच. पण या व्हिडियोत मात्र खुद्द नृत्य कलाकार स्वतः काही तरी नवीन कलाकारी दाखवणार असं जाणवतं.

आता त्यावेळी व्हिडियोच्या आधी काय काय झालं हे माहिती नसल्याने काही भाष्य करता येत नाही. असो. तर या नृत्य कलाकाराच्या जवळच एक माणूस नाचत असतो. नृत्यकलाकार या पुरुषाला जवळ बोलवते. मग त्याला या कलाकाराच्या दोन्ही पायांवर उभं राहायला सांगितलं जातं. ही व्यक्तीही तयार होते. पण सुरुवातीलाच तोल जातो. पण तरीही दोघे पाठी हटत नाहीत. हा माणूस तोल सावरत त्या नृत्य कलाकाराच्या पायांवर उभं राहतो. नृत्य कलाकाराकडून सुद्धा त्या व्यक्तीला आणि स्वतःला सावरत तोल साधण्याचा प्रयत्न होतो. आता काही तरी नवीन होणार याची प्रचिती एव्हाना आपल्याला आलेली असतेच. पण काय होईल याचा नेम नसतो. आणि खरंच नेम नसतो. त्यामुळे पुढच्या काही क्षणांत जे काही घडतं त्यामुळे आपण एकाचवेळी आश्चर्यचकित, सर्द झालेलो असतो. तरीही आपल्या चेहऱ्यावत वर उल्लेख केल्याप्रमाणे हास्य उमटलेलं असतंच. आता ते कशामुळे झालेलं असतं हे काही इथे सांगत नाही. कारण नाही तर हा व्हिडियो बघण्याची मजा निघून जाईल. पण आपल्या पैकी अनेकांना लेखाचं शीर्षक वाचून काय झालं असेल त्याचा अंदाज आला असेल अस म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याविषयी जास्त चिकित्सा करण्याऐवजी आपणच त्याची मजा घ्या.

बरं वर उल्लेख केलेली मजेशीर घटना झाल्यावर ही हा व्हिडियो चालू राहतो आणि थोडक्यात एक छोटा डान्स परफॉर्मन्स बघता येतो हे मात्र नमूद करायला हवं. अर्थात गंमत किंवा फजिती झाली तरी हा माणूस आणि नृत्य कलाकार पुढेही नाचत राहतात हे ही बघायला मिळतं. असो.

आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला. वायरल नसला तरी काही क्षण आनंद देणारा असा हा व्हिडियो वाटला. म्हंटलं आपल्या वाचकांसाठी त्यावर लिहू आणि त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.