डान्स हा असा कलाप्रकार आहे जो अगदी मनापासून सादर केला असता तत्क्षणी सगळ्यांना आवडून जातो. मग डान्स करणारी व्यक्ती विख्यात डान्सर आहे किंवा नाही हे कोणीही बघत नाही. सगळे जण मनापासून केलेल्या डान्सची मजा घेत असतात. त्यात मग डान्स करणाऱ्या व्यक्तीच वय, वर्ण, लिं’ग, हुद्दा अस काहीही आड येत नाही. याचं एक ताज उदाहरण म्हणजे काही दिवसांपासून चर्चेत असलेला वायरल व्हिडियो. आता वायरल म्हंटल्यावर आपली टीम याविषयी न लिहिता थांबते होय. त्यातूनच आजचा हा लेख आकारास येतो आहे. चला तर मग या वायरल व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.
हा व्हिडियो आहे एका परिचारिकेचा. त्यांचं नाव ज्योती असून तेलंगणा राज्यातील आरोग्य क्षेत्राशी निगडित एका प्रथितयश संस्थेत काम करतात. नुकत्याच संपन्न झालेल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी या संस्थेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तसाच हा कार्यक्रम होता. मग काय यात थोडा वेळ मनोरंजन म्हणून काही गाणी लावली होती. यावेळी ज्योती यांनी एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. हे गाणं म्हणजे ‘बुलेटू बंदी’.
नजीकच्या काळात अतिशय प्रसिद्ध झालेलं हे गाणं खूपच लोकप्रिय आहे. तेथील लग्नांमध्येही हे गाणं वाजवलं जातं. या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी हे गाणं वाजत होत आणि ज्योती यांनी डान्स सुरू केला. सुरुवातीला थोडंसं हलके हलके त्या नाचत होत्या. मधेच एका सह-परिचारीकेला त्यांनी या डान्स मध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या दुसऱ्या ताई येईनात. मग ज्योती यांनी हा डान्स सुरू ठेवला. त्यांचं या प्रसंगी कौतुक करावंसं वाटतं कारण परफॉर्मन्स देताना त्या सतत हसतमुख राहिल्या, त्यांनी स्वतः त्या परफॉर्मन्सची मजा घेतली. तसेच परफॉर्मन्स द्यायला जागा कमी असून सुद्धा वैविध्यपूर्ण स्टेप्स करत त्यांनी या डान्समध्ये रंग भरले. या संपूर्ण वेळेत त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य काही मावळलं नाही.
खरं तर परिचारिका म्हंटल्यावर कामाचा ताण किती असतो हे आपण जाणतोच. किंबहुना आपण केवळ या ताणाची कल्पनाच केलेली बरी. त्यात दीड – पावणे दोन वर्षांपासून आलेला को’विड १९ ने तर या आरोग्य सेवकांना अगदी नावाला पुरेल एवढी ही विश्रांती घेऊन दिलेली नाही. सतत येणाऱ्या कामामुळे ही मंडळी कावली असणार हे नक्की. पण असं असलं तरीही त्यांनी त्यांचं काम कर्तव्य समजून सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे असे काही विरंगुळ्याचे क्षण त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाले असावेत आणि त्यांच्याकडून डान्स झाला असावा.
त्यात त्या नाचल्या ही उत्तम, म्हंटल्यावर आपोआप हा डान्स वायरल झालाच. अनेक नेटिझन्सनी या डान्स बद्दल ज्योती यांचं कौतुक केलं. पण त्याचवेळी त्या काम करत असलेल्या राज्यातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, झाल्या प्रकाराबद्दल काहीशी नाराजी दर्शवल्याच कळतं. ऑन ड्युटी असताना असं डान्स वगैरे करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं पडलं असं प्रथितयश वृत्तसंस्थानी दिलेल्या बातम्यांतून कळतं. पण या गोष्टीबद्दल अनेक नेटिझन्सनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे की हा स्वातंत्र्यदिनी आयोजित एक कार्यक्रम होता. अशा प्रसंगी ज्योती यांनी डान्स करणं काही वावगं नव्हे. असो. या विषयावर अनेकांची विविध मतं आणि त्यासाठी विविध कारणं असू शकतात. पण एका गोष्टीवर मात्र एकमत होईल की डान्स उत्तम होता. तेव्हा आपल्याला जेव्हा हा बहुचर्चित डान्स व्हिडियो बघायला मिळेल तेव्हा नक्की बघा. त्यांच्या डान्सचा आनंद घ्या.
तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे ही आठवणीने कळवा. कारण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अनेक नवनवीन गोष्टी शिकवतात. त्यातून समजलेल्या गोष्टी आम्ही नवीन लेखांतून वापरून पाहतो आणि अर्थातच लेख आपल्याला आवडतात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया, सकारात्मक सूचना आमच्या पर्यंत कमेंट्स मधून पोहोचवत राहा. आपला हा स्नेहबंध वृद्धिंगत आणि दृढ होऊ दे ही सदिच्छा. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :