Breaking News
Home / मनोरंजन / नवरदेवाच्या मित्रांनी चेष्टेने असं काही गिफ्ट दिले जे खोलताच नवरीने रागाने फेकले, बघा काय होते ते गिफ्ट

नवरदेवाच्या मित्रांनी चेष्टेने असं काही गिफ्ट दिले जे खोलताच नवरीने रागाने फेकले, बघा काय होते ते गिफ्ट

कुठल्याही बायकोला जाऊन विचारा, तुझे सगळ्यात मोठे दुष्मन कोण? तुम्हाला वाटेल की, बायकोचं उत्तर ‘सासरघरचे’ असं येईल… मात्र मुळात बायकोचं उत्तर ‘आमच्या ह्यांचे दोस्त, हेच मोठे दुष्मन’ असं येईल. कारण प्रत्येक बायकोला वाटत असतं की, आपला नवरा खूप साधभोळा आहे, त्याचे मित्रच त्याला बेकार वळणाला लावतात. पण बायकोला कुठं माहिती असतं, गंगाधर ही शक्तिमान है… म्हणजे हिच्या नवऱ्यामुळेच सगळे बिघडलेले असतात. आता बायकांना आपल्या नवऱ्याचे दोस्त लै “बेरकी” आहेत, हे लग्नातच कळतं. कारण नवऱ्याचा एखादा दोस्त कुणाच्या टाळक्यावर तांदूळ फेकून मारत असतो तर दुसरा दोस्त नवऱ्याचे बूट घेऊन नवरीकडच्यांना देणार असतो, तोही स्वतः काही कमिशन घेऊन तर तिसरा दोस्त नवरीच्या मैत्रिणी बघण्यात दंग झालेला असतो. आणि नवरदेव आपला गप खाली मान घालून विचार करत असतो. तर विषय असा की, इथंच नवरीला कळतं आपला नवरा सोडता बाकी सगळे मित्र गायबाने आहेत. आता नवरा पण सटकलेला असतो पण आपल्याच लग्नात पोरी बघणं, बरं दिसणार नाही म्हणून तो खाली बघत असतो. तसही बळीच्या बकऱ्याची अवस्था नवरदेवापेक्षा वेगळी असती काय???

तर वाचक मंडळीहो, आमच्या हाती एक असा व्हिडीओ लागला आहे, ज्यात नवरीला नवऱ्याच्या मित्रांची अक्कल तर कळलीच आहे वरून तिने त्यांना अपमानीत पण केलंय. तर झालं असं की, सर्वसाधारण लोक आपल्या ऑफिसमधल्या, कॉलेजच्या किंवा इतर कुठल्याही मित्राच्या लग्नात फ्रेम, घड्याळ, पेंटिंग अशा काहीबाही वस्तू गिफ्ट म्हणून देतात. पण हे ‘बेस्ट फ्रेंड’ नामक काही प्राणी असतात, ज्यांचा जन्म मित्राला छळण्यासाठी झालेला असतोय. बेसिकली ते मित्राच्या बायकोला डीवचतात आणि मग चिडून ती नवऱ्याच्या नावाने बोंब ठोकते, एकूणच काय तर या बेस्ट फ्रेंड नामक प्राण्यांमुळे अनेकांची आजवर वाट लागलेली आहे.

या व्हिडीओत आपल्याला दिसून येतं की, मस्तपैकी लग्नाचं वातावरण आहे. सगळीकडे खुशीया ही खुशीया आहेत. नवरा-नवरी पण मोकार खुश आहेत कारण गेले सहा महिने ते फोनवर बोलत होते आजपासून ते एकत्र राहणार आहेत. तर हे सगळं घडत असताना नवऱ्या मुलाचे बेस्ट फ्रेंड्स येतात. नवऱ्याला भावी आयुष्य शांततेत जगण्याच्या तर नवरीला उर्वरित आयुष्य गपगुमान जगण्याच्या शुभेच्छा देतात.

मग ते नवऱ्याच्या हातात गिफ्ट न देता नवरीला देतात. नवराही जरा चक्रावतो. हे प्रकरण काहीतरी गडबड आहे, हे त्याच्या लक्षात येतं. फक्त लग्न मोडू नये, एवढीच प्रार्थना तो मनातल्या मनात करत असतो. नवरी गिफ्ट घेते आणि इतर गिफ्ट्स प्रमाणे साईडला ठेऊन देते. पण ‘बेस्ट फ्रेंड्स’ म्हणतात, वहिनी, आमचं गिफ्ट स्पेशल आहे, इथेच खोलून बघा.

नवऱ्याच्या मित्रांवर भरोसा ठेवील, ती बायको काय?, तिलाही यात काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. मग ती जरा नाराज चेहऱ्याने गिफ्ट उघडते. आणि सगळे हसू लागतात. मात्र या नवरीचा पारा चढतो. तिला चेष्टा सहन होत नाही. मग ती रागारागात आणलेलं गिफ्ट खाली फेकून देते. आधी चेष्टेने हसणारा नवरा आता मात्र शांत होतो. नेमकं गिफ्ट काय आहे, हे बघण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागणार आहे भाऊ… पण तरीही सांगतो, हे बेस्ट फ्रेंड्स गिफ्ट म्हणून त्या नवरीला लहान मुलाला दूध पाजण्याची बॉटल देतात. आता असली बोगस मजाक केल्याचे परिणाम नवऱ्याच्या मित्राला नाही तर नवरदेवाला आयुष्यभर भोगावे लागणारच ना भाई…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.