Breaking News
Home / मनोरंजन / नवरदेवाच्या मित्रांनी दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बिचारी नवरी सुद्धा लाजली

नवरदेवाच्या मित्रांनी दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बिचारी नवरी सुद्धा लाजली

हा लेख लिहीत असताना आता लग्नाचा काळ सुरू झाला आहे हे लक्षात येतंय. जवळपास दर विकेंडला आपल्या ओळखीच्या कोणाचं ना कोणाचं तरी लग्न नाही तरी साखरपुडा होत असतोच. त्यात आपलं लग्न झालं नसेल किंवा जमत नसेल तर घरातून ऐकावे लागणारे टोमणे या काळाची खासकरून जाणीव करून देतात. बरं ज्यांचं लग्न झालंय त्यांचीही सुटका नसतेच. मागच्या वर्षी आपल्या लग्नात धमाल केलेल्या मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या लग्नात आता जोड्याने जाण्याची वेळ येत असते. मग त्याची तयारी वगैरे करणं हे आलंच.

पण याच काळात काही जुने हिशोब ही पूर्ण केले जातात. इथे हिशोब याचा मानापमान असा अर्थ कृपया घेऊ नका. कारण ते प्रकरणच वेगळं असतं. वर उल्लेख केलेला हिशोब म्हणजे आपल्या लग्नात ज्या ज्या मित्रांनी खोडकरपणा केलेला आहे त्यांचं अगदी प्रेमाने उट्टं काढण्याची वेळ असते. काही वेळा असं ही होतं की जुनं उट्टं काढलं जात नाही. तर ही मैत्री एवढी गहिरी असते आणि मित्र अगदी जिवलग असतात की सगळी फजिती अगदी हक्काने केली जाते.

त्यात अजून काही मित्रांची जोड असेल तर मग फुल्ल ऑन मजा. सहसा ही सगळी मजा नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला गिफ्ट्स देताना केली जाते. कारण त्या प्रसंगी नवरा नवरी काही बोलुही शकत नसतात. पण आपण मात्र आपली मजा घेत असतो. त्यात एखाद्याच मित्राने ही अशी मजा करायची ठरवली तर मग एखादं अतरंगी गिफ्ट देऊन ही मजा घेतली जाते. पण अख्खा ग्रुप असेल तर मग नळावर पाणी भरायला लागते तशी गिफ्ट्स देण्यासाठी रांगच लागते. तेव्हा नवरा नवरीचे चेहरे बघणं म्हणजे गजब धमाल असते. बरं कोणाचं डोकं कसं चालेल हे काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोणते कोणते गिफ्ट्स कधी दिले जातील हे सांगू शकत नाही. पण तरीही काही गिफ्ट्स हे समान असतात. अनेक जण लाटणं, लहान मुलांची बॉटल, झाडू, लहान मुलांची खेळणी वगैरे गिफ्ट्स म्हणून देतात. त्यामूळे आपल्याला ही असे काही व्हिडियो बघितले की मजा येते. पण त्यात नवीन अस काही वाटत नाही. पण आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो मात्र यावर कडी करणारा आहे. एका लग्नातलाच व्हिडियो आहे. रिसेप्शन प्रसंगी हा व्हिडियो चित्रित केला गेला असणार हे नक्की.

या व्हिडियोत आपल्याला नवरा नवरी त्यांच्या सिंहासनावर विराजमान झालेले दिसून येत असतात. एकदम भारी जोडपं वाटत असतं. तेवढ्यात त्यांच्या हातात एक गिफ्ट येतं. ते गिफ्ट काय आहे हे बघतानाच त्यांना बहुधा कल्पना येते की यात काही तरी अतरंगी गिफ्ट्स असणार. आपल्याला ही तेच वाटून जातं. आपण हा लेख वाचून मग व्हिडियो बघणार असाल तर आपल्याला कल्पना असेलच. पण एक मात्र खरं की आतील सगळी गिफ्ट्स उघडून जे शेवटचं गिफ्ट बाहेर निघतं त्याची आपण अपेक्षा केलेली नसते. पण हे गिफ्ट मात्र आपल्या चेहऱ्यावर जरूर हसू आणतं. नवरा नवरीच्या ज्या कोणी मित्र किंवा मैत्रिणीच्या डोक्यात ही कल्पना आली असेल त्यांना सलामच आहे. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपण मनमुराद हसले असालच. नसेल बघितला तर जरूर बघा. निखळ मनोरंजनाचा जरूर आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *