मित्र आयुष्याला घोडा लावणारे नकोत तर लग्नात घोडा नसेल तर घोड्यासारखे उभे राहणारे हवेत. असं का ते हा व्हीडिओ पाहिल्यावर तुमच्या चांगलंच लक्षात येईल. आपल्या नवरदेव भावाला मांडवापर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रमंडळींनी जी शक्कल लढविली ना ती आजकाल लग्नात करोडो रुपये मिळवणाऱ्यांनाही येणार नाही. कुणीतरी म्हटलंयं तुम्ही शाळेत जाता तेव्हा सोबत असतात ना ते सवंगडी. अभ्यास नाही झाला म्हणून मा’र खाताना सोबत उभे राहतात ना ते तुमचे गडी आणि चॉकलेट किंवा लिमलेटची गोळी तुम्हाला रुमालाने तोडून देतात ना ते तुमचे मित्र. मग तुम्ही शाळा संपवून कॉलेजला जायला लागता. तुमचे मित्र वेगळ्या क़ॉलेजमध्ये लागतात. त्यांच्या या सगळ्या गोष्टी कधीतरी भेटल्यावर तुम्हाला आठवतात. त्या सगळ्या मित्रांच्या आठवणींच्या कप्प्यात सगळी साठवण असते.
कॉलेजलाही तेच असतं. तुम्हाला एखाद्या पोरीला इम्प्रेशन मा’रण्यासाठी मदत करण्यापासून ते तुमची सगळी लफडी घरच्यांपासून लपवण्यापर्यंत आणि करीअर निवडीसाठी पाठीशी खंबीर उभा राहणारा तुमचा मित्रच असतो. त्यानंतर सुरू होतं खऱ्या आयुष्याच्या परीक्षेचं गणित. इथं मात्र कोडी गणितं सोडवायला तुमच्या सोबत सहकारी येतात. अपवाद सोडले ना तर तुमचे असे कुणीच नसतात. मित्र नसतातच. कारण मित्र फक्त शाळा आणि क़ॉलेजमध्येच, आणि तीच निस्वार्थी मैत्री असते. त्यानंतर सगळं जग स्वार्थाच्या मागे धावत असतं. कदाचित जुन्या ओळखीच कुणी तुम्हाला भेटेलही पण तुमच्या मित्रांच्या रांगेत त्याला स्थान नसेल. मित्र कसे ओळखायची अशी टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल ना तर एक सोपी ट्रीक आहे. या आपल्या नवरदेव मित्रानं जे केलं ना जे त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी केलं ना फक्त लग्नात तशी अट मंडळींपुढे ठेवून पहा. तिथं जे पाठीला पाठ लावून उभे होतील ना तेच खरे मित्र, या मित्राला मांडवापर्यंत पोहोचवलायला जशी मदत केली. आलेली ही मंडळी पहा. एका रांगेत त्याच्यासाठी उभी आहेत. लोकं याचा व्हीडिओ बनवू लागली. पण मित्रांनी एक रांग करून आपल्या नवरदेव मित्राला मंडपापर्यंत पोहोचवायची तयारी केली. मित्रांच्या आयुष्याला लागलेले घोडे पाहता लग्नातला घोडा आणि घोडेवाळा पैसे न मिळाल्याने असाच पसार झाला.
शेवटी मित्रं ते मित्रंचं असतात त्यांनी ठरवलं. आपल्या मित्राची अभिमान वाटेल इतक्या चांगल्या पद्धतीने एंट्री व्हायला हवी की आपल्या आजच्या विशेष लग्नाची चर्चा लग्नातून घोडा पळाला त्याची न होता नवरदेवाला किती घोड्यांनी मंडपापर्यंत पोहोचवला या पद्धतीने व्हायला हवी. नवरदेवांनी या सगळ्यांसाठी स्पेशल पार्टी दिलेली दिसतेयं. नाहीतर किती जरी मोठा मित्र असला तरीही चांगल्या ड्रेसची वाट कोण लावणार?, अर्थात या प्रश्नाचं उत्तर ही तेच आहे की मित्रचं. मित्रांनी खांदा दिला हा शब्द इथं इतक्या पॉझिटीव्ह वे द्वारे वापरला गेलायं की परिभाषाच बदलून गेलेली दिसतेंयं. मित्रांच्या या सगळ्या बोलण्यावरुन एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे माणसाच्या गळ्यात आयुष्यातून फक्त तीनच वेळा माळ पडते. जन्म झाल्यावर लग्न झाल्यावर आणि मृ’त्यूवेळी…. जन्म होतो तेव्हा आपल्या सोबत ही मंडळी काय विधी करत आहेत. हे त्या लहान बाळालाही कळतं नाही. मृ’त्यू होतो तेव्हा तर फक्त बॉडी उरते त्यामुळे तेव्हाही काय होतंयं हे देखील कळतं नाही. या सगळ्या पसाऱ्यात राहते ते म्हणजे लग्न आणि लग्न अतिशय सुज्ञ वयात केलेलं असंतं आणि अशावेळी होणारा सन्मान म्हणजे चार चाँद असतात. या नवरदेवाला अशाच प्रकारचे मानपान देणारे मित्र भेटलेत याबद्दल त्यालाही शुभेच्छा…
बघा व्हिडीओ :