पुष्पानं भल्याभल्यांना वेड लावून टाकलं. अभिनेता अल्लू अर्जून, अभिनेत्री रश्मिका मंधानाच्या सुपरहिट जोडीनं अख्ख मार्केट खाऊन टाकलंयं. पुष्पाच्या या सगळ्या क्रेझनं ‘मै झुकेगा नही साला’ हा डायलॉग इतका फेमस करून टाकलायं की गल्लोगल्ली पुष्पा उभे राहिलेयंत. राजकीय भाषण, रिल्स, सोशल मीडिया टीव्ही सिरीअल्स कॉमेडी शोज सगळीकडे पुष्पाची क्रेझ आहे. पुष्पाच्या या डायलॉगनं सगळ्या पोराटोरांना वेड लावलंयं. पुष्पाच्या या सगळ्या क्रेझमध्ये लग्नमंडळी कुठे मागे पडतील. त्यांनीही यात सगळीकडे आघाडी घेतलीयं. पुष्पराजच्या या डायलॉगचा फिवर आता उखाणा घेण्याच्या शर्यतीतही लागू पडताना दिसतोय. उखाणा घ्यायचा ना तर तो व्हायरल झाला पाहिजे. नाहीतर उखाणा घेण्याला अर्थ नाही. अनेकजण ती मेथीची भाजी वरुन पुढे जातचं नाहीत. असो. उखाणा घ्यायचा ना तर एकदम दमदार घ्यायचा जसा या आपल्या भाऊंनी घेतला.
“काल झालं आमचं लग्न लग्नात आला बँण्ड वाला… स्वातीचं नाव घेतो झुकेगा नही साला.” उखाण्यामुळं भाऊचं लग्न एवढं व्हायरल झालंयं की विचारून सोय नाही. भाऊंनी आपल्या लाडक्या वहिनीसाठी उखाणा घेतलायं खरा पण कोण कसं झुकतंयं ते येणारा काळचं सांगेल. ‘मै झुकेगा नही साला’ म्हणणारे लोक असे अनेक भेटतात. पण वेळ आली ना की बायको पुढे झुकावचं लागतंयं बघा. पूर्वी उखाणे फक्त बायका घेत आता नव्या परंपरेनुसार पोरांनीही उखाणा घ्यायची पद्धत चालू केलीयं. आता एवढं कमी होतंयं की काय म्हणून एकानं व्हीडिओ काढून व्हायरल करायचं ठरवलंयं. आता ज्याचा चालतो त्याचा बरा चालतो नाहीतर अनेकांचा पचका होऊ लागतो. आता या व्हीडिओत भाऊंनी मार्केट राखून ठेवलंयं. आपल्या मित्रमंडळींची लाज राखलीयम नाहीतर प्रत्येकवेळी मार्केट आपलीं महिला मंडळीच खाऊन जातात. त्यांच्या या सगळ्या खेळात पुरुष मंडळी मागेच राहतात.
या भावानं पुष्पाचा डायलॉग लिहून एक नवी आयडीया दिलीयं. ती म्हणजे सिनेमातला गाजलेला डायलॉग घ्यायचा आणि उखाण्यात टाकायचा म्हणजे उखाणा एकदम फेमस होणार व्हायरल होणार आणि एक गोष्ट व्हीडिओमध्ये बारीक लक्ष देऊन बघितल्यावर लक्षात येईल ती म्हणजे आपल्या वहिनी उखाणा घेण्यापूर्वी इतक्या लाजल्या इतक्या लाजल्या की आपल्या भावाला फुल्ल रोमॅटींग असल्याचं सर्टीफिकीटच मिळालं, आता तक्रार करायला जागा नको की आमचे हे काही रोमॅटींकच नाहीत. कारण व्हायरल झालेल्या व्हीडिओत पुरावेही आहेत. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट आणखी एक कळलं की वहिनीनं पूर्ण उखाण्यात मान वर करून बघायची हिंम्मत केलेली नाही. त्यामुळं भावाचा दरारा पुष्पा सारखाच आहे एवढं नक्की कळतंयं. हा झाला विनोदाचा पार्ट. तुम्ही या भावाच्या उखाण्याला किती गुण द्याल ते आम्हाला कळवा.
बघा व्हिडीओ :