Breaking News
Home / मनोरंजन / नवरदेवाने हळदीमध्ये एकट्यानेच नाचून सर्वांची कसर भरून काढली, बघा व्हि’डीओ

नवरदेवाने हळदीमध्ये एकट्यानेच नाचून सर्वांची कसर भरून काढली, बघा व्हि’डीओ

भारतीय लग्न म्हणजे एक सोहळाच. या सोहळ्याचा आपणही एक भाग असावं असं प्रत्येकाला वाटतं. खासकरून हळदीच्या कार्यक्रमात तर विशेष उपस्थिती असणं महत्वाचं असतं. कारणं तर आपल्याला माहिती आहेतच. पण त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे डान्स करायला मिळणं. काही जण तर इतके तुफान नाचतात की काही विचारू नका. आपण मराठी गप्पाच्या लेखांमधून अशा अनेकांना भेटले असालच. पण आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो अगदी तुफान आहे. दुसरा शब्द नाहीये त्यासाठी. कारण अतरंगी म्हणजे खट्याळ वगैरे संबोधतो आपण. पण ह्या व्हिडियोतील डान्स म्हणजे अगदी तुफानागत आहे. हा व्हिडियो आहे एका हळदी समारंभातील. त्यात आपल्याला दिसतात ते तीन जण. म्हणजे तसे उपस्थित काही जण असतात पण कॅमेऱ्यात तेवढेसे दिसत नाहीत. एक नवरा मुलगा वाटणारा व्यक्ती, बरोबर एक मुलगा आणि अजून एक व्यक्ती. हे तिघेही गाणं सुरू होण्याची वाट बघत उभे असतात.

त्यातील तिसरे दादा एव्हाना मस्त डुलायाला लागलेले असतात. पण जसं गाणं सूरु होतं आणि नवरा ज्या त्वेषाने डान्स करतो, ते पाहून हे दादा नंतर अगदीच बाजूला निघून जातात. त्यांना कळतं या वादळात आपला काही निभाव लागायचा नाही. तर दुसरा मुलगा नवऱ्यासोबत डान्स करण्याचा प्रयत्न करतो खरा, पण त्याला जमतंय होय. आपल्या नवरदेव दादाचा वेगच इतका असतो की त्याच्या समोर कोण उभं राहिलं. त्या धांदलीत सुरुवातीलाच त्याच्या खिशातून काही तरी वस्तू पडते. मोबाईल असावा. तेव्हा मुलगा ती वस्तू बाजूला ठेऊन देतो. पण आपल्या दादाचं लक्ष नसतं. तो अगदी स्वतःच्या धुंदीत मस्त गरा गरा फिरत असतो. एकदा तर त्याच्या पट्यात एक ताई येता येता वाचतात. पाठी गाणंही मस्त लागलेलं असतं. ओढ लागली मला गं माऊली हे ते गाणं. पिंपळादेवीची स्तुती करणारं हे गाणं गायलं आहे परमेश माळी आणि सोनाली भोईर यांनी. या दोघांच्या सुरांनी नटलेलं हे गीत लिहिलं आहे परमेश माळी यांनी .केवळ दोनच वर्षात ह्या गाण्याला युट्युबवर प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी ही मिळालेली आहे. जवळपास दोन करोड हुन अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे आणि त्याचा आनंद घेतला आहे.

हे गाणं ऐकून मनात आपोआप उत्साह आणि ऊर्जा निर्माण होतेच. त्यास आपला हा नवरदेव पण कसा अपवाद असेल. त्याची तुफानी ऊर्जा बाकीच्यांना बाजूला जायला भाग पडते. पण काहीही असो, तो हा डान्स करताना मजा घेतो तर आपण त्याचा डान्स बघून मजा घेतो. शेवटी काय तर दोघांचाही आनंद घेण्याचा हेतू साध्य होतो.

ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला आहे त्यांना हा व्हिडियो आवडतोच. सोबतच हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. खास आपल्यासाठी म्हणून आपली टीम विविध व्हिडियोज बघून त्यावर लेख लिहीत असते. त्यातील बहुतांश लेख आपल्याला पसंत पडतात हे दिसून येतं. तुम्ही जेव्हा हे लेख शेअर करता त्यातून आमच्या टीमला हे कळून येतं. आपला हा पाठींबा आमच्या पाठी कायम असू दयावा. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *