Breaking News
Home / मनोरंजन / नवरदेवाला लग्नामध्ये त्याच्या मित्रांनी जे गिफ्ट दिले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

नवरदेवाला लग्नामध्ये त्याच्या मित्रांनी जे गिफ्ट दिले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आपल्याकडचे लग्नसमारंभ म्हणजे सोहळेच. पण गेल्या वर्षीपासून करोनामुळे यांवर बऱ्याच अंशी गदा आलेली दिसून येते. पण तरीही आपली पब्लिक म्हणजे हुशार आहे. छोटेखानी समारंभ असला तरीही त्यात आनंद कसा शोधायचा हे आपल्याला चांगलंच कळतं. त्यात सगळ्यांत महत्वाची भूमिका बजावतात ते आपले जिवलग मित्र. मित्राचं लग्न म्हणजे त्यांच्यासाठी बागडण्याची, खोड्या काढण्याची एक नामी संधी असते. अशीच संधी साधली ती एका मित्रांच्या ग्रुपने. आपल्या मित्राचं लग्न आहे हे बघून त्याला काहीसा खजील करण्याकरता आणि पण एकंदर त्याची मजा घेण्याकरता या सगळ्यांनी मिळून एक प्लान बनवलेला दिसून येतो. हा सगळा प्लान म्हणजे हा व्हिडियो आहे. बरं हा प्लान म्हणजे या नवपरिणीत जोडप्याला सांसारिक पण त्या क्षणी अतरंगी वाटणाऱ्या भेटवस्तू अगदी उघडपणे देणं.

यात सुरुवात होते ती पहिल्या मित्रापासून. तो केराचं सूप आणि कपडे घासायचा साबण घेऊन येतो. सूप त्या नवऱ्या मुलाला देतो आणि साबण, नवरी मुलीच्या हातात सोपवून निघून जातो. मग एक ताई येते. ती येताना काय आणते ते कळत नाही. पण एकदम पॅकिंग केलेलं असतं. बहुधा घरातले पडदे असावेत. नवरा नवरी त्याचा स्वीकार करतात. मग मात्र रिघचं लागते. एक मुलगी पाण्यासाठी बकेट आणून देते. तर दुसरी मुलगी बाथरूमची झाडू आणि मग आणून देते. तर एक मित्र अगदी शिपायांच्या आवेशात लादी पुसायचा मॉप आणि पायपुसण घेऊन येतो. अजून एक भाऊ येतात ते तर थेट टॉयलेट क्लिनर घेऊन येतात. हद्दच केली म्हणत आपण कपाळाला हात लावतो आणि हसत सुटतो. मग अजून एक जण थेट खराटा आणून नवीन जोडप्याच्या पुढ्यात ठेवतो. तरीही एक जण बाकी असतो. तो येतो ते अगदी मी नाही त्यांच्यातला असं करत. पण गिफ्ट तर असतं नवऱ्या मुलासाठी बंडी. आपली एव्हाना हसून हसून पुरेवाट झालेली असते. तिथे नवरा नवरीची अवस्था पण वेगळी नसते. ते ही मजा घेत असतात.

पण या मित्राचं सेलिब्रेशन अजून बाकी असतं. मित्राची मस्करी केली तरी त्यावर जीव लावणारे हे सगळे मित्र. त्यामुळे ही मजा मस्ती संपल्यावर या नवीन जोडप्याला मंचावर खाली घेऊन येतात आणि मस्त डान्स करतात. त्यांचा हा आनंद बघत असताना हा व्हिडियो संपतो. छोटासा आणि मजेशीर व्हिडियो आहे हा. खासकरून मित्र मंडळींनी जी काही धमाल केली आहे त्याबद्दल काय बोलावं. आपल्या मित्राची त्याच्याच लग्नात मस्करी करणं हे केवळ जिगरी दोस्त करू शकतात. इतरांना ते जमत नाही. पण त्यामुळे लक्षात राहावेत असे क्षणही आपल्या मनाच्या कोपऱ्यात जमा होतात. त्यामुळे हर एक फ्रेंड जरुरी होता है हेच खरं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला आणि म्हणूनच आपल्या वाचकांसाठी काही लिहावं असं वाटलं. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमने लिहिलेले लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता. यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं जे नवनवीन लेख लिहिण्यास ऊर्जा मिळवून देतं. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या पाठी कायम राहू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *