Breaking News
Home / मनोरंजन / नवरा नवरींनी हळदीमध्ये केलेला हा भन्नाट डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

नवरा नवरींनी हळदीमध्ये केलेला हा भन्नाट डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

लग्नाच्या वायरल व्हिडियोज वरील लेखांना काय उत्तम प्रतिसाद देत आहात मंडळी. मनापासून धन्यवाद. तुम्ही जो प्रतिसाद देता ना तो आमच्यासाठी खंबीर पाठिंब्यासारखा असतो. त्यामुळे आपल्या टीमलाही लेख लिहायला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही विविध वायरल व्हिडियोज शोधून काढतो आणि तुमच्या साठी लेख लिहितो. आजचा हा लेख सुद्धा तुम्हाला अतिशय आनंद देऊन जाणारा आहे. याचं कारण या वायरल व्हिडियोत भरपूर गंमत आहे. अर्थातच हा एक लग्नातील वायरल व्हिडियो आहे हे वेगळं सांगायला नको. त्यातही हळदी समारंभातील हा व्हिडियो आहे. मागे आपल्या टीमने एक लेख लिहिला होता त्याच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या. जसा त्या व्हिडियोत नवऱ्या मुलाने आणि इतरांनी केलेला डान्स हा कोरिओग्राफ केलेला होता. तसंच आजच्या व्हिडियोतील लग्नात डान्स करणारं जोडपचं मुळी कोरिओग्राफर आहेत.

त्यामुळे त्यांनी केलेली धमाल अगदी मनापासून केलेली आहे. त्यातील नवरदेवाचं नाव आहे नरेश तर नवरीचं नाव आहे श्रुतिका. दोघेही अगदी सुरुवातीपासून डान्सचे चाहते आहेत आणि बरेच वर्ष कार्यरत आहेत, असं कळतं. त्यामुळे त्यांना विविध डान्स प्रकार येतात आणि तेही उत्तम प्रकारे हे काही वेगळं सांगायला नकोच. हे सगळे प्रकार आपल्याला या व्हिडियो मध्ये बघायला मिळतात. त्यामुळे जेव्हा ही मंडळी डान्स करतात तेव्हा संपूर्ण वेळ तुमचं लक्ष या दोघांवरून हटत नाही. त्यातही सुरुवातीला आपली श्रुतिका ताई एकदम भन्नाट एनर्जीने डान्स करत असते. तिच्या डान्स मधून तिच्यात डान्सर असण्यासाठीचा एक स्वॅग दिसून येतो. पण आपला नरेश दादा पण थोडी कमी आहे. तो ही डान्स जुगलबं’दी साठी तयार होत असतो. मग काय त्याचंही धडाक्यात डान्स करणं सुरू होतं. एका क्षणाला तर एक स्टं’ट ही या डान्स दरम्यान तो करून दाखवतो. ताई नाही नाही म्हणत असते पण दादा एव्हाना रंगात आलेला असतो. पूढे दोघे जण सालसा हा डान्स प्रकारही अगदी सुरेखरीत्या सादर करतात.

त्यात अर्थातच त्यांचं पदलालित्य दिसून येतं ज्यातुन त्यांची मेहनत कळून येेते. हा व्हिडियो पाहताना एवढा आनंद मिळतो तर तिथे उपस्थित असणाऱ्यांची काय कथा. सुरुवातीला मंडपात केवळ नवरा नवरी डान्स करत असतात. मग त्यांच्या पासून प्रेरित होऊन बाकीची मंडळीही मंडपात धुमशान घालत असतात. एकंदर व्हिडियो आनंद देऊन जातो. त्यामुळे या व्हिडियोतील जोडी विषयी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या दोघांचं युट्युब चॅनेल असल्याचं लक्षात आलं. या चॅनेल वर दोघेही डान्स आणि फिटनेस याबाबतीचे व्हिडियोज सातत्याने शेअर करत असतात. अनेक लहान मुलांना त्यांनी डान्स शिकवलं आहे हे सुद्धा यातून कळून येतं. एकूणच हे जोडपं स्वतःत असलेली कला नवीन पिढीपर्यंत ही पोहोचवण्यात यशस्वी होत आहेत हे बघून आनंद वाटतो. या नृत्य निपुण जोडीला त्यांच्या एकत्रित आयुष्यासाठी आणि तसेच कला क्षेत्रातील वाटचालीसाठी ही मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असणारच आहे, तेव्हा हा लेख नक्कीच शे’अर करा. अगदी नेहमीप्रमाणे. तसेच फक्त एका लेखावर स्वतःची वाचनाची भूक भागवू नका. आपली टीम तुमच्या साठी खासकरून रोज विविध लेख लिहीत असते. त्यांचाही आनंद घ्या. धन्यवाद.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.