Breaking News
Home / मनोरंजन / नवरा नवरीच्या एंट्रीच्या वेळी मित्रांनी धमाकेदार डान्स करून केले दिले सरप्राईज, बघा डान्स

नवरा नवरीच्या एंट्रीच्या वेळी मित्रांनी धमाकेदार डान्स करून केले दिले सरप्राईज, बघा डान्स

लग्न समारंभ आणि मित्रपरिवार यांचं काय नातं आहे कळत नाही. पण या धकाधकीच्या सोहळ्यात चार चांद लावण्याचं आणि उत्साह वाढवण्याचं काम आपली मित्रमंडळी करत असतात. मग तो लग्नसोहळा साधासुधा असो की शाही. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियो चं घ्या ना. या व्हिडियोत आपल्याला नवरा नवरीचे घनिष्ट मित्र लग्नात रंग भरताना दिसतात. तेही जेव्हा नवरा नवरी मंडपात येण्याच्या वेळेला. त्यामुळे आधीच असलेल्या आनंदाच्या क्षणांस बहर येतो. नवरा नवरी मंडपाच्या दाराशी आलेले असतात आणि तेव्हा त्यांच्या स्वागताला बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रसिद्ध धून वाजायला लागते. माहोल अजून जोशपूर्ण होतो. तोपर्यंत ही मित्रमंडळी कॅमेरावाल्या काकांसोबत जागेची मांडवली करत असतात. तेवढ्यात अनिल कपूर यांच्या गाजलेल्या डान्स वरील धून वाजायला लागते- धिना धीन धा.

मग काय सगळे जण अनिल कपूर यांची सिग्नेचर स्टेप करत डान्स करण्यास सुरुवात करतात. असं करता करता अजून दोन प्रसिद्ध गाणीही वाजतात. डान्स मध्ये रंग भरले जात असतात. नवरा नवरी ही आनंदात असतात. उपस्थितही या डान्सचा आनंद घेत असतात. बरं यातील गाण्याचं मिक्सिंग उत्तम केल्याने लागोपाठ गाणी वाजत जातात त्यामुळे आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतं. त्यात व्यत्यय येत नाही. किंबहुना जेव्हा ‘तेनु ले के मैं जावांगा’ हे सुप्रसिद्ध गाणं लागतं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते की हा यार ये गाना तो बनता ही है. कारण लग्नसमारंभ असो आणि हे गाणं वाजलं नाही असं क्वचितच होत असेल. एव्हाना नवपरिणीत जोडपं मंचावर स्थानापन्न झालेलं असतं. कुतूहलाने आपल्या या मित्रपरिवाराच्या डान्स कडे पाहत असतं. इथे डान्स परफॉर्मन्स एव्हाना संपायला आलेला असतो. रणवीर सिंग यांच्या प्रसिद्ध ‘त्ततर त्ततर’ स्टेप्स केल्या जात असतात. पण मग डान्स संपतो का? छे हो. सैराट मधील झिंगाट वाजल्याशिवाय लग्नाला रंगत चढते होय.

झिंगाट वाजू लागतं आणि मग सगळेच दंग होऊन नाचायला लागतात आणि गाण्याच्या शेवटी मंचावर जाऊन नवरा नवरीला शुभेच्छा देतात. वातावरण अगदी मस्त झालेलं असतं. या परफॉर्मन्स नंतर चाललेल्या गळा भेटी दरम्यान नवरा नवरी ही आपल्या या मित्रांच्या डान्सचं कौतुक करतात. आपल्यालाही बरं वाटतं. एकूणच हा डान्स जसा नवपरिणीत जोडीला आनंद देऊन जातो अगदी तसाच आनंद आपल्यालाही देऊन जातो. आपल्यापैकी ज्यांच्या लग्नात मित्रपरिवाराने असा धमाल डान्स केला असेल त्या आठवणी जाग्या होतात. नकळत आपण त्यांच्यात रमतो. आमच्या टीमला हा व्हिडियो अगदी मनापासून आवडला. तुम्हाला हा लेखही कसा वाटला ते नक्की सांगा. तसेच आठवणीने हा लेख शेअरही करा. आपण लेख शेअर केल्याने आम्हालाही प्रोत्साहन मिळतं आणि आपल्यासाठी विविध विषयांवर लेख लिहिण्याची ऊर्जा प्राप्त होते. तेव्हा लेख शेअर करणं सुरूच ठेवा आणि आपला स्नेह ही वाढू दे. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *