Breaking News
Home / जरा हटके / नवरा नवरीला अश्याप्रकारे कोणी शगुन देतो का, मित्राने नवरदेवाची केलेली हि फजिती पाहून हसू आवरणार नाही

नवरा नवरीला अश्याप्रकारे कोणी शगुन देतो का, मित्राने नवरदेवाची केलेली हि फजिती पाहून हसू आवरणार नाही

लग्न म्हणजे राडा, धिंगाणा… चूकून झालेली मजा आणि जाणीवपूर्वक केलेली मस्ती… असं सगळं काही लग्नात होतं. लग्नात 2-3 वेळा अशा असतात की, तिथे गंमत होणार, हे निश्चित असते. पहिलं म्हणजे लग्नाची नवरदेवाची वरात. दुसरं म्हणजे लग्न लावताना नवरा-नवरीला उचलणे आणि तिसरे म्हणजे गिफ्ट देण्याची वेळ.

नवऱ्याकडचा आहे मंडपाच्या उजव्या बाजूला स्वीकारला जाईल, नवरीकडचा आहेर मंडपाच्या डाव्या बाजूला स्वीकारला जाईल, असं माईकवर मपथ्य कोकलून सांगणारा माणूस कुठून बोलतो आहे, याचा नेमका अंदाज वराडी मंडळींना लवकर येत नाही. लग्न लागल्यापासून तर शेवटची पंगत उठेपर्यंत हा माणूस आहेर देण्याविषयी माईकवरून कोकलत असतो. मधल्या काळात मात्र “आहेर स्वीकारले जाणार नाहीत” अशी टीप असायची. आता मात्र आहेर ऐवजी काही काही भेटवस्तू दिल्या जातात. आणि याच भेटवस्तू देताना खूप मजा येते आणि लोक कधीकधी फजितीही करतात.

सोशल मीडियावर दररोज मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर निंयत्रण राहत नाही. सध्या लग्नाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील वधू -वरांच्या मित्रांची मजा काही औरच असते. कुटुंबातील जवळच्या सदस्याप्रमाणे, प्रत्येक विधीमध्ये समानतेने सहभागी होण्याबरोबरच, ते वधू -वरांचा आनंद घेण्यातही आघाडीवर मित्र-मैत्रिणी असतात. वधू -वरांच्या खास मित्रांचे आश्चर्यकारक कारनामे बऱ्याचदा लग्नाच्या व्हिडीओमध्ये कैद होतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका मित्राचा एक मजेदार असा व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे. तुम्ही यापूर्वीही असे व्हायरल व्हिडीओ बघितले असतील ज्यात नवऱ्याचे मित्र नवरीला चेष्टा करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तू देतात. जसे की, बाळाला दूध पाजण्याचे बॉटल किंवा मोबाईलच्या खोक्यात मोबाईल न देता कव्हर देणे, असे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील.

किंवा नवरीच्या मैत्रिणींनीही अनेक हटके गिफ्ट नवरदेवाला दिलेले व्हिडीओही व्हायरल झाले असतील. पण आमच्या हाती लागलेल्या व्हिडीओत एका मित्राने एकदम अतरंगीपणा करत नवरदेव आणि नवरीच्या फजिती केली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत की लग्नसमारंभ सुरू आहे. नवरी आणि नवरदेव स्टेजवर गिफ्ट स्वीकारत उभे आहेत. इतक्यात स्टेजवर एकजण येतो. आणि त्यानंतर जे काही करतो ते पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. लोक या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये हास्य इमोजी टाकत आहेत. हा मजेदार व्हिडिओ पाहून प्रत्येकजण खूप मजा घेत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या मित्राची करामत पाहून तुम्हाला नक्कीच हासू आवरणार नाही.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *