Breaking News
Home / मनोरंजन / नवरा नवरीला असा जगावेगळा आहेर दिलेला तुम्ही ह्याअगोदर कुठल्याही लग्नामध्ये पाहिला नसेल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

नवरा नवरीला असा जगावेगळा आहेर दिलेला तुम्ही ह्याअगोदर कुठल्याही लग्नामध्ये पाहिला नसेल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लग्न म्हंटलं की सगळीकडे लगबग ही आलीच. आता लगबग आली की थोडा ताण ही आलाच की ! पण लग्नात या ताणाची परिसीमा गाठली जाते. इतकी की काही वेळा वातावरणात साचून राहिलेला ताण सगळ्यांना जाणवतो. म्हणूनच तर जुने जाणते म्हणून गेलेत की घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून ! पण अस असलं तरी लग्नातील काही जण मात्र हा ताण हलका करण्यासाठी मदतच करत असतात.

मग काहींचा डान्स परफॉर्मन्स अशावेळी कामी येतो. त्यात नवरा नवरी डान्स करत असतील तर सोन्याहून पिवळं ! कारण मग या डान्स परफॉर्मन्स मध्ये सगळे जण गुंग होऊन जातात. वातावरण प्रसन्न होतं. याचप्रमाणे नवरा नवरीची जिवलग मंडळी ही लग्नात धमाल आणतात. खाकरून जी अतरंगी मित्रमंडळी असतात ती तर जबरदस्त मजा करून घेतात. अर्थात हे वेगळं सांगायला नको की या सगळ्या मंडळींचा पहिला आणि मोठा बकरा हा नेहमी नवरदेव असतो. कारण सहसा नवरीच्या मित्र मैत्रिणींकडून हे अस काही होताना दिसत नाही. पण नवऱ्याचे मित्र मात्र या संधीचा पुरेपूर फायदा उचलतात. आपण या विषयांवरचे अनेक व्हिडियोज यापूर्वी पाहिले असतीलच. तरीही काही व्हिडियोज पुन्हा नव्याने आपल्याला दिसत असतात. यातील काही तर काही वर्षांपूर्वीचे असतात आणि अचानक आपल्या समोर येतात. आजही आपल्या टीमच्या बाबतीत हेच झालं.

अचानक एक व्हिडियो बघण्यात आला आणि आजचा हा विषय सुचला. बरं हा व्हिडियो तसा चार पाच वर्षांपूर्वीचा असला तरी आजही त्यातील गंमत कायम आहे. सुज्ञ वाचकांना जाणवलं असेलच की हा व्हिडियो एका लग्नात नवऱ्याच्या मित्रांनी केलेल्या धमाल मस्तीचा आहे. ही मित्रमंडळी नवऱ्या मुलाला आणि नावरीमुलीला अतरंगी आहेर देऊन धमाल निर्माण करतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला उजव्या बाजूला नवपरिणीत जोडपं दिसून येतं. मंचावर उभं राहून ते शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. त्यामुळे लग्न होऊन, आता रिसेप्शनचा कार्यक्रम चालू असावा असं जाणवतं. सुरुवातीला काही जण नेहमीचे आहेर या जोडप्याला देऊन गेले असावेत. पण नंतर मात्र वर उल्लेख केलेले एकेक अतरंगी मित्र येतात. बरं आहेर म्हणून त्यांनी चक्क भाजीपाला आणलेला असतो. त्यामुळे नवराईची पहिली प्रतिक्रिया, ‘अरे हे काय’ अशीच असते. पण त्या माउलीला कल्पना नसते की हे केवळ एकट्या दुकट्याच काम नव्हे. इथे संपूर्ण मित्रमंडळ कामाला लागलेलं दिसतं. कारण ही मंडळी कोथींबीरपासून ते पडवळ, दुधी भोपळ्यापर्यंत सगळ्या भाज्या घेऊन आलेले असतात. बरं त्यात त्यांची अट ही असते. ती अट म्हणजे दिलेली प्रत्येक भाजी जशीच्या तशी हातात ठेवायची आणि फोटो काढायचा !

शेवटी शेवटी तर या जोडीच्या चारही हातांमध्ये ही भाजी मावेनाशी होते. त्यामुळे एक महाशय तर पडवळ थेट नवरदेवाच्या गळ्यातच घालतात. आता काय म्हणावं असा विचार येऊन येऊन आपण हसत असतो. कारण अतरंगी मित्र असले की हे सगळं होणं क्रमप्राप्तच आहे. पण या सगळ्यांमुळे आपली ताई मात्र थोडी बावरलेली वाटते. पण यथावकाश ती ही सावरते आणि नवरदेवाला तर स्मित हास्य करण्यावाचून पर्याय ही नसतो. पण एक मात्र खरं की सगळी मंडळी धमाल आणतात. बरं हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या आणि अशा अनेक गंमती जंमती लग्नांचा वेळी होत असतात. येत्या काळात तर लग्नांचा सुकाळ असेल. तेव्हा तर यात अजूनच भर पडेल हे नक्की ! असो.

आमच्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि गंमतीदार वाटला. म्हंटलं चला आज यावरच लिहू आणि त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *