देशात कोरोना प्रकरण थांबण्याचे नाव नाही आणि आता हा आकडा ३१ लाखांवर गेला आहे. तिथेच सरकार आता अनलॉक ३ ची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. सरकार चे म्हणणे आहे कि, कोरोना पूर्णपणे थांबणार नाही अशातच आपल्याला आता अधिक खबरदारी घ्यावी लागेल. त्याच बरोबर सर्व नियमांचे पालन करत या सोबतच जीवन जगावे लागेल. त्यातच खूप वेळापासून कित्येक लोकांचे काम थांबले होते ते आता हळू हळू पूर्ण होत आहेत. कोरोना काळात खूप जणांचे लग्न थांबले होते, ते आता पूर्ण होत आहेत. काही दिवसापूर्वी यु पी मधल्या गोरखपूर भागात एका लग्नातील विचित्र घटना समोर आली आहे जिथे पोलिसांना सुद्धा सहभागी व्हावे लागले.
वरातीत आलेल्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी केला हट्ट
मंगळवारी रात्री लग्नासाठी वरात गावात आली. सर्व काही व्यवस्थित चालू होते. अचानक मांडवात मोठा वाद निर्माण झाला आणि पोलिसांना बोलवावे लागले. खरंतर नवरीच्या परिवारातील लोकांचे असे म्हणणे होते कि, त्यांना नवरदेवाशी नाही तर वरातीत आलेल्या एका दुसऱ्या तरुणासोबत आपल्या मुलीचे लग्न करायचे आहे. त्यानंतर तिथे खूप मोठे भांडण झाले त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले.
खरंतर द्वारपूजा नंतर जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा नवरी आणि तिच्या परिवारातील लोकांनी नवरदेव बनून आलेल्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. नवरी आणि तिच्या घरातल्यांचे म्हणणे होते कि जो नवरदेव बनून आला आहे त्याच्या बरोबर आमच्या मुलीचे लग्न ठरलेलेच नाही. त्यांचे म्हणणे आहे कि, जो मुलगा वरातीत आला आहे त्याच्या बरोबर आमच्या मुलीचे लग्न ठरले होते. या कारणामुळे ते त्याच मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट करू लागले.
यामुळेच बोलवावे लागले पोलिसांना
परिवार आणि नातेवाईकांमध्ये भांडणसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही पक्षात बोलणी झाली, परंतु कोणाचेच समाधान झाले नाही. परिस्थिती निवळत नाही हे पाहून कोणीतरी जगदीशपूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे अधीक्षक चतुर्भुज पांडे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले कि, वधु पक्षाकडील लोकांना या गोष्टीचा गैरसमज झाला होता. आता त्यांना समज दिली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हे लग्न पुन्हा त्याच मुलाशी लावून दिले, पोलीस तोपर्यंत मांडवात थांबून राहिले जोपर्यंत नवरीची पाठवणी नाही झाली.
कारण त्यांना भीती होती कि त्यांच्या जाण्यानंतर परिस्थिती पुन्हा बिघडू नये. तथापि सगळं व्यवस्थित झाले आणि नवरीची सासरी पाठवणी केली. महत्वपूर्ण म्हणजे कोरोनामुळे आतापर्यंत खूप लग्न थांबले होते, परंतु आता हळू हळू लोक कमी माणसांच्या उपस्थितीत लग्न करू लागले आहेत. लोकांचे मानणे आहे कि, कोरोना पूर्णपणे थांबायला खूप वेळ जाणार, अशातच ते असे कार्यक्रम जास्त वेळ थांबवू शकत नाही. सामान्य लोकांसोबतच सिनेकलाकार सुद्धा आता सामान्य स्थितीत येत आहेत आणि कमी लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करत आहेत.