Breaking News
Home / मनोरंजन / नवरीची लग्नमंडपात ‘आली ठुमकत नार लचकत’ गाण्यावर दमदार एंट्री

नवरीची लग्नमंडपात ‘आली ठुमकत नार लचकत’ गाण्यावर दमदार एंट्री

घर पहावं बांधून आणि लग्न पाहावं करून असं म्हणतात ते काही खोटं नाही. या दोन्ही गोष्टींना आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच सगळं सुरळीत पार पाडण्यासाठी बऱ्याच खटपटीही कराव्या लागतात. पण जेव्हा आपली स्वप्नपूर्ती होत असते तेव्हा आपल्याला होणारा आनंद गगनात मावत नसतो. लग्नाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जेव्हा नवरा नवरी मंडपात दाखल होतात तेव्हा या सगळ्या आनंदाला तर अजून उधाण येतं. नवरा नवरी कसे दिसतात, त्यांचे पेहराव कोणते आहेत, दागिने कोणते घातले आहेत वगैरे अनेक गोष्टींची उत्सुकता यावेळी सगळ्यांनाच असते. हे अगदी आधीपासूनच. त्यात आता मस्तपैकी भर पडली आहे ती धमाल गाणी वाजवत नवरा नवरीला मंडपात आणण्याच्या ट्रेंडची. आपण अनेक वायरल व्हिडियोज मधून हा ट्रेंड पाहिला असेल. त्यात नवरा नवरी अगदी रुबाबात मंडपात प्रवेश करताना दिसतात. असाच एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला आणि ठरलं की त्यावर लिहावं.

हा व्हिडियो आहे अमित आणि लिखिता यांच्या लग्नातला. या दोघांची हळद आणि लग्न काही काळापूर्वी पार पडलं. तेही अगदी राजेशाही थाटात. आणि यात राजेशाही थाट खरंच दिसून येतो. केवळ लिहीण्यासाठी म्हणून हा शब्द वापरला नाहीये. कारण जेव्हा लिखिता ताई लग्नमंडपात दाखल होतात तेव्हा मस्त असं गाणं लागेलेलं असतं. आली ठुमकत नार हे ते गाणं. अर्थात हे गाणं नव्याने बसवून गायलेलं गाणं आहे. याचे गायक आहेत आदर्श शिंदेजी आणि मुंबई पुणे मुंबई या लोकप्रिय चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हे गाणं ऐकायला आणि पाहायला मिळतं. या लग्नप्रसंगी हे गाणं वाजत असताना लिखिता यांचं आगमन होतं. सोबत चार मुलं त्यांच्यावर छत्र धरून त्यांना मंडपात आणत असतात. या पाच जणांच्या पुढे मागे दासी बनलेल्या काही तरुणी आणि शिपाई बनलेले काही तरुण असतात. यावरून या लग्नसोहळ्याची थीम ही राजेशाही असणार हे नक्की होतं. एव्हाना गाण्यातील म्युझिक सोबतच गाण्याचे बोल कानावर पडू लागलेले असतात. मग काय आपली ताई पण मस्त पैकी डान्स करायला लागते.

तिचा उत्साह बघून तिच्या सोबत असलेले चार तरुणही मस्त नाचत असतात. हातात असलेलं छत्र पडू नये याची काळजी घेत त्यांचा डान्स चालू असतो. पुढे सरकताना दासी बनलेल्या मुली गुलाबाच्या पाकळ्या टाकून नववधूचं स्वागत करत असतात. काय मस्त माहोल बनला असेल त्यावेळी असं आपल्या मनात चमकून जातं न जातं तेवढ्यात आपला अमित दादा आता व्हिडियोत दिसायला लागतो. त्याच्या प्रिय पत्नीच्या स्वागताला तो आलेला असतो. बरं त्याच्यात पण तिच्या एवढाच उत्साह असतो. त्यामुळे अजून रंगत वाढते. दोघांचे पोशाख अगदी राजेशाही असल्यामुळे कौतुकास पात्र ठरतात. मग हळू हळू हे सगळे लग्न मंचकाकडे जातात. लिखिता ताईला मंचावर घेत तिच्या सोबतीने अमित दादा उभा असतो. काय उमदी जोडी दिसते अगदी. तिथे एखाद्या आजी वगैरे उपस्थित असल्या असतील तर त्यांनी नक्कीच दृष्ट काढली असती. व्हिडियोच्या शेवटी आपल्याला नववधू आणि वर मंचकाच्या मध्यभागी उभे असलेले दिसतात. त्यांच्या आजूबाजूला दासींच्या भूमिका करणाऱ्या मुली आणि सैनिकांची भूमिका करणारी मुलं उभी असतात.

एकंदरच, नवरा नवरीच्या या जबरदस्त एन्ट्री ने मस्त माहोल तयार झालेला असतो आणि मग व्हिडियो संपतो. आपल्या टीमने आतापर्यंत अनेक वायरल व्हिडियोज बघितले आहेत. त्यात अनेक लग्नाचे वायरल व्हिडियोज ही आहेतच. त्यातील सगळ्यांत उत्तम अशा व्हिडियोज मध्ये हा व्हिडियो नक्की येईल. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो बघितला आहे त्यांना हा व्हिडियो आवडला आहे. त्यात आपली टीमही सामील आहे. आपल्या टीमच्या वतीने या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या सुखी संसारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला या व्हिडियो प्रमाणे हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आमच्या टीमने लिहिलेले लेख आवडीने शेअर करता त्याबद्दल धन्यवाद. आपल्या या शेअरिंग मुळे तुमच्यासाठी नवनवीन विषयांवर लेखन करण्याचं प्रोत्साहन मिळतं आम्हाला. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या टीमला कायम स्वरूपी असू द्या. लोभ असावा. मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *