या काकूंनी अख्खी हळद गाजवलीयं. एरव्ही हळदीला पोरं गावात हळद असली की दा’रू पिल्यागत नाचतात. पण का कुणास ठावूक पोरांना आज काय बॅटरी चार्ज करायला चार्जर भेटलाच नाही. पण सगळी पोकळी काकूंनी म्हणजेच नवरीच्या आईनं भरून काढली. पोरीचं लग्न जमल्यावर सगळ्यात जास्त खुश आईच असते. आईला वाटतं की, आकाश ठेंगणं झालंयं. सगळं जग तिच्या पायाशी आणून ठेवा तिला आनंद होणार नाही. तिला आनंद होईल तो फक्त मुलाबाळांच्या लग्नानं. पोरगी आता लग्न होऊन सेटल होणार म्हटल्यावर कुणाची आई खूश होणार नाही. काकूंना आभाळ ठेंगणं झालं आज. पोरीनं आईला थांबवाचे पूरेपूर प्रयत्न केले पण त्यांनी काही थांबायचं नाव घेतलेलं नाही. पोरीला सोबत घेऊन पण नाचू लागल्या. बेफिकीर आणि बेफाम होऊन. खरंतर काकूंनी आज त्या सात समूंदर पार मे तेरे या गाण्यावर नाचणाऱ्या कॅडबरीच्या जाहिरातीतल्या सासू सूनेलाही मागे टाकलं. त्यांच्या या सगळ्या गाण्यावर नाचण्याची कमाल पाहून आजूबाजूची पब्लिकही थोड्यावेळासाठी का होईना गोंधळून गेली.
ही बाई अशी काय नाचतेय म्हणून काय काय डोक्यात विचार येऊन गेले लोकांच्या, पण काकूंचा भन्नाट डान्स पाहिल्यावर त्यांच्या एक लक्षात आलं की आज काकूंच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. आनंद गगनात मावेना एवढा आहे. त्यामुळेच काकूंचा हा छप्पर फाडके डान्स आहे. डान्स करावा तर कुणी तो पोरींनी. पण काकूंनी त्या इन्स्टावर ढुं’गणं हलवणाऱ्या पोरींनाही दाखवून दिलं की त्यांच्यात बाप हा बापच असतो. कुणीही नाद करायचा नाय. कालपर्यंत सगळं कसं होणारं. मुलीच्या घरचे आपण.. तयारी कशी करायची, खर्चाचं कसं होणार, असं टेन्शन घेणाऱ्या काकूंना समजवायला अख्ख कुटूंब उभं होतं. पण काकांनी एफडी करून ठेवलीय मुलीच्या लग्नासाठी, याचं सरप्राईझ दिल्यावर सगळं संकट कसं दूर झालं. आता सगळं काही व्यवस्थित होणार होतं, मुलांच्या मनासारखं होणार होतं. मुलीसाठी चांगला नवरा मिळाल्यावर आणखी काय प्रतिक्रीया असणार, असाच भन्नाट धमाल आणि बेधडक डान्स होणार ना कुठल्याही आईचा, तसाच हा डान्स प्रकार सुरू आहे.
डान्सच्या या धम्माल बारीत नवरी बाई आईला समजवायला आली खरी पण आईनं तिलाही बाजूला करून डान्स स्टेपवर लक्ष केंद्रीत केलं. तिच्या डान्स स्टेपची थिरकलेली पावलं पाहून आईचं आज काही खरं नाही, एवढं पोरीला कळून चुकलं. मनात एकदा नाही तर दोनदा येऊन गेलं असावं कुणी भांग मिक्स केलीयं का रे कोल्ड ड्रींकमध्ये. पण नाही, आईची माया आहे ती, अशी कसली बसली उपमा देऊन पाप लागेल आम्हाला लिहीताना आणि तुम्हाला ऐकताना. त्यामुळे त्या आईच्या या डान्सला शंभर पैकी गुण द्यायचे झाले तर शंभर पैकी शंभर, एकशे दहा, दोनशे असेच द्यावे लागतील. काय स्टेप केलीय काकूंनी म्हणजे काय बोलावं. एक एक स्टेप पाहून अंगावर काटा येईल. काकूंच्या या अदा पाहून त्या इन्स्टावर रिल्स बनवणाऱ्या कार्ट्या तोंडात बोटं घालून बसल्या होत्या. आयच्यान सांगतो, असला भारी डान्स अख्क्या सोसायटीत कुणी केला नसेल. सगळ्या बायकांना काकींना मागे टाकलं होतं. डान्सिंग क्विन अहो आपल्या सोसायटीच्या डान्सिंग क्विन, डान्सिंग डॉलला आपल्या काकूंनी हादरवून टाकलंयं की. तिकडं डान्स बघून त्यांना घाम फूटलाय. डान्स करायला जे गाणं निवडलंयं ना ते ऐकून आणखी घाम फूटलाय.
बघा व्हिडीओ :