लग्न म्हंटलं की आपल्या मनात काही ठराविक गोष्टी येतात. या गोष्टी म्हणजे त्या लग्न सोहळ्यांतील आकर्षणं होत. अर्थात या सगळ्यात केंद्रस्थानी असतात ते वधू वर. पण त्यांच्या सोबतच बाकीच्या अनेक गोष्टींचं आपल्याला आकर्षण हे असतंच. यात गेल्या काही काळात एका गोष्टीची भर पडली आहे. ही गोष्ट म्हणजे त्या त्या लग्नसोहळ्यात होणारं नववधुचं आगमन होय. लग्नसोहळ्यातील हा एक छोटेखानी सोहळाच असतो. त्यात आपण वावरतो सोशल मीडियाच्या जगात. त्यामुळे नववधूने मंडपात अगदी थाटात आगमन होण्याचे व्हिडियोज वायरल होत असतात. त्यातीलच एक व्हिडियो पाहण्याची संधी आपल्या टीमला मिळाली. आजचा हा लेख त्याचविषयी आहे. हा व्हिडियो दक्षिण भारतातला असावा असा अंदाज आहे. जवळपास नऊ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर दाखल झालेला हा व्हिडियो खूपच चर्चेत राहिला आहे. हा लेख लिहीत असताना जवळपास १२ लाखांहून अधिकांनी हा व्हिडियो पाहिला आहे असं कळून येतं. या व्हिडियोत अर्थातच आपल्याला नववधू असलेली ताई दिसून येते.
पण या व्हिडियोत आणि बाकीच्या व्हिडियोज मध्ये एक फरक आहे. या व्हिडियोत आपल्याला ताई आणि तिचे त्यावेळी होणारे अहो दिसत नाहीत. तर दिसतात त्या तिच्या मैत्रिणी. आता नववधू आणि तिच्या मैत्रिणी म्हंटल्या की त्या मजा मस्ती गंमत करण्याची ही संधी सोडतात होय. अजिबात नाही. त्यामुळे ही ताई जेव्हा लग्नमंडपात दाखल होत असते तेव्हा या ती आणि तिच्या तिन्ही मैत्रिणी जबरदस्त असा डान्स परफॉर्मन्स करण्याचं ठरवतात. हा परफॉर्मन्स अमलांत ही आणला जातो. त्याची सुरुवात मात्र केवळ या तीन मैत्रिणींच्या डान्स ने होते. मग आपली ताई त्यात दाखल होते. आपले मित्र मैत्रिणी एकत्र असले की आपली कळी खुललेली असतेच. इथेही तसंच होतं. या चौघी मस्त असा डान्स करतात. त्यात अजून मजेचा भाग असा की जवळपास साडे तीन मिनिटांत जवळपास चार गाण्यांवर या सगळ्या जणी डान्स करतात. एरवी बाकीच्या व्हिडियोज मध्ये सहसा एकच गाणं किंवा दोन गाणी वाजताना दिसून येतात. पण इथे या मुलींचा ग्रुप जबरदस्त फॉर्मात असतो. त्यात जवळपास प्रत्येक नववधूच्या एंट्रीला वाजणारं मेरे सैय्यां सुपरस्टार हे गाणं असतंच. तसेच सौदा खरा खरा, काला चष्मा, मेरा पिया घर आया अशी गाणी ऐकायला मिळतात. अर्थात त्यावर नववधू ताई आणि तिच्या मैत्रिणींनी केलेला डान्स हा अप्रतिम असतोच.
खरं तर लग्न म्हंटलं की मरणाची धावपळ असते. उगीच नाही, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून म्हणतात. पण अशा व्यस्त वेळापत्रकातही जेव्हा नववधू आणि वर मजा करण्याची संधी शोधून धमाल करतात तेव्हा बरं वाटतं. कारण, हे क्षण काही वारंवार येणारे नसतात. एकदा गेले की गेले. त्यामुळे या क्षणांचा आनंद घेणं महत्वाचं असतं. तसेच नवरा नवरी हे एका जबाबदार नात्यात प्रवेश करते होत असतात त्यामुळे लग्न ही एक मोठी घटना असते. तिचा आनंद घेणं अर्थातच आवश्यक आहे नाही का ! आपल्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार यात शंका नाही. पण आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा आणि एका छान डान्स परफॉर्मन्सचा आनंद घ्या.
तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :