लग्नाचे वायरल व्हिडियोज बघणं हे आपल्या वाचकांना आणि आपल्या टीमला सुद्धा प्रचंड आवडतं. कारण अनेक लग्न सोहळ्यातील नवरा नवरीचा डान्स हा खूप आनंद देऊन जातो. तर काही वेळेस या जोडीच्या जागी त्यांचे मित्र, नातेवाईक मस्त डान्स करतात आणि धमाल उडवून देतात. तर काही व्हिडियोज मधून तर केवळ त्या लग्न सोहळ्यांचा थाटमाट, भव्यता ही बघत राहावी अस वाटत असतं. आपलं लग्न असं होवो न होवो पण इतरांच्या लग्नातील आनंद तर आपल्याला घेता येतोच ना. पण कधी कधी असंही होतं, की ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच दिसून येतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पहिला ज्यात भव्यदिव्य लग्न सोहळ्यात नववधूने तिच्या डान्सने चार चांद लावले होते. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. मग म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल म्हणून हा लेख लिहिण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.
हा व्हिडियो सूरु होतो तेव्हा या सोहळ्यात आपल्याला प्रथम दर्शन होतं ते निवेदिकेचं. त्यांच्या बोलण्यातून त्या सगळ्यांना डान्स फ्लोअरकडे लक्ष देण्यास सांगत असतात. कारण आता तिथे नववधू आपलं नृत्य कौशल्य दाखवणार असते. या नववधूचं नाव इशा आहे असं कळून येतं. त्यांची घोषणा संपते आणि आता आपल्याला इशा समोर दिसत असतात. सोनेरी रंगातील पोषाखात त्या फार सुंदर दिसत असतात. त्या डान्स फ्लोअरवर येतात आणि पाठी असलेले डिजेवाले बाबू गाणं वाजवायला सुरुवात करतात. हे गाणं सूरु होण्यापूर्वी आपल्याला या लग्नसोहळ्यातील भव्यता थोड्याफार प्रमाणात दिसून येते. पण पूर्ण व्हिडियो बघितला की त्यातील भव्यतेची कल्पना येते. जबरदस्त तयारी केलेली असते. त्यामुळे लग्नाचा माहोल बनलेला असतो. बरं या माहोलमध्ये चार चांद लावण्याचं काम इशा यांच्या डान्सने होतं. पहिला गाणं सुरू होत आणि इशा या मस्त मस्त स्टेप्स करत डान्स करण्यास सुरुवात करतात. त्यातील अजून कौतुकाची गोष्ट म्हणजे डान्स करताना त्यांच्या ओठांवर प्रत्येक गाणं अगदी बसलेलं असतं. प्रत्येक शब्द प्रत्येक वेळी त्या बोलत असतात. त्यावरून त्या किती एकरुप होऊन डान्स करत असतील याची कल्पना यावी.
त्यांच्या या डान्स परफॉर्मन्सला पूढे अजून एका ताईंची जोड लाभते. त्याही मस्त मस्त नाचत या परफॉर्मन्स मध्ये रंग भरतात. जवळच इशा यांचे अहो सुद्धा असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला दिसून येतो. तसेच त्यांच्या सोबत असलेली किंबहुना प्रत्येक उपस्थित व्यक्ती ही या डान्स परफॉर्मन्सची मजा घेत असते. आपणही जर हा परफॉर्मन्स पाहिला असेल तर आपणही या डान्स परफॉर्मन्सची मजा घेतली असणार हे नक्की. जर हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा. त्यातील मस्त डान्स परफॉर्मन्सचा आनंद घ्या.
तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला आपण उत्तम प्रतिसाद देत आलेले आहात. यापुढेही आपला हा प्रतिसाद कायम राहील याची आम्हाला खात्री आहे. आम्हीही उत्तमोत्तम लेख लिहून आपलं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख जरूर वाचा आणि त्यांचा आस्वाद घ्या. तसेच आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि हा आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :