Breaking News
Home / मनोरंजन / नवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल

नवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल

लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. सोबतच काही ठिकाणी तर हमखास नवरीला डान्स करताना आणि नवरोबाच स्वागत करताना बघत असतो. गेल्या तीन चार वर्षांपासून ही एक नवीन पद्धत जणू रुजू झाल्यासारखी वाटते. जी चांगली ही आहेच. कारण स्वतःच्या लग्नात केवळ एका ठिकाणी मंडपात बसून राहण्यापेक्षा नवरा नवरीने डान्स करणं आणि त्या क्षणांचा आनंद घेणं केव्हाही चांगल आहे. पण ही पद्धत अगदी गेल्या काही वर्षातील आहे असं वाटायचं आम्हाला आणि आपल्याला. पण त्यास काहीसा छेद देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. कारण हा व्हिडियो जवळपास अकरा वर्षे जुना आहे. त्यातही आपल्याला लग्नातील डान्स बघायला मिळतो. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. जवळपास अकरा वर्षे जुना असा हा व्हिडियो आजच्या घडीला ही वायरल ठरेल असा आहे. आजतागायत या व्हिडियोला जवळपास ८७ लाख लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.

हा व्हिडियो म्हणजे नवरीने सगळ्यांसमोर केलेला एक उत्तम असा डान्स आहे. नवरीचे नाव स्मिता असून त्यांनीच हा डान्स कोरिओग्राफ केल्याचं एका कमेंट वरून कळून येतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा स्मिता आणि त्यांच्या सोबत डान्स करण्यासाठी काही मुली मंचावर येतात. गाणं सुरू होण्याअगोदर आपापल्या जागी व्यवस्थित उभ्या राहतात. जवळूनच इव्हेंट्स मध्ये वापरला जाणारा स्मोक सुरू असतो. त्यामुळे वातावरण एकदम फिल्मी व्हायला मदत होते. तेवढ्यात गाणं वाजायला लागतं. गाण्याचे पहिले काही शब्द म्हणजे ‘झनक झनक’ असे असतात. या प्रत्येक झनक बरोबर एकेक मुलगी स्वतःच्या स्टेप्स करते. त्यात स्मिता ही असतात. जसं गाण्याला वेग येतो तसा या सगळ्या जणींच्या डान्सला सुदधा वेग येतो. आतापर्यंत बसून स्टेप्स असणाऱ्या स्मिता उठून उभ्या राहिलेल्या असतात आणि डान्समध्ये रंगत भरत असतात. खरं तर यानिमित्ताने त्यांचं कौतुक करावे तेवढं थोडं आहे. एवढे सगळे दागिने, लग्नाचा वजनदार पोशाख घालून ही त्यांनी अप्रतिम डान्स केला आहे. मनापासून एखाद्या गोष्टीची आवड असली की सगळं शक्य असतं याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडियो.

गाणं जस जसे पुढे सरकते तस तशा या सगळ्या जणींच्या विविध डान्स स्टेप्स बघायला मिळतात. त्यात ठुमके लगावत डान्स करणं, गिरक्या मारणं हे सगळं स्मिता अगदी उत्तम रित्या करत असतात. त्यांच्या डान्स स्टेप्स वरून त्यांना डान्सची प्रचंड आवड असणार आणि सवय सुद्धा असणार हे कळून येतं. या डान्सच्या शेवटी जेव्हा त्या आणि बाकीच्या सगळ्या जणी मिळून फुल बनवण्याची एक स्टेप करतात ती ही अप्रतिम आहे. संपूर्ण डान्स तर धमाल असतोच. त्यात भर पडते ती उपस्थित असलेल्या सगळ्यांनी स्मिता आणि त्यांच्या डान्सला दिलेल्या प्रतिसादाची. जेव्हा त्या सगळ्यात पहिल्यांदा डान्स स्टेप्स करायला सुरुवात करतात तेव्हापासून डान्स संपेपर्यंत सगळे त्यांना टाळ्या वाजवून, आवाज करून प्रोत्साहन देत असतात. व्हिडियोच्या शेवटी तर काही जण वन्स मोअर वन्स मोअर अस ओरडताना आपण ऐकतो. त्यावरून त्यांना स्मिता यांचा डान्स किती आवडला हे कळून येत असतं. जर हे लग्न नसत आणि आपण हा डान्स लाईव्ह बघत असतो तर कदाचित आपणही वन्स मोअर दिलाच असता.

असो. एकूणच काय तर हा परफॉर्मन्स भले अकरा वर्षांपूर्वीचा असेल, पण आजही जबरदस्त आवडून जातो हे नक्की. कलाकाराने अगदी मनपासून सादर केलेली कलाकृती कधीही बघितली तरी आवडतेच. हा व्हिडियो आणि त्यातील स्मिता यांचा डान्स हे याच उदाहरण. आपल्या टीमला तर हा डान्स आवडला. आपण ही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्या ही आवडला असणार हे नक्की.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.