Breaking News
Home / मनोरंजन / नवरीने स्वतःच्याच लग्नामध्ये डीजे वाजवत केला हटके डान्स, बघा हा व्हिडीओ

नवरीने स्वतःच्याच लग्नामध्ये डीजे वाजवत केला हटके डान्स, बघा हा व्हिडीओ

आपल्या वाचकांसाठी लेख लिहिणं ही आमच्या साठी सगळ्यांत जास्त आनंदाची वेळ असते. पण त्या आधी विषय शोधताना नाही म्हंटलं तरी वेळ जातोच. पण छान विषय मिळाला आणि वाचकांना तो आवडेल याची खात्री वाटली की बरं वाटतं. त्यातही वायरल व्हिडियोज विषयी तर वेळ जातोच. पण जेव्हा उत्तम व्हिडियो बघायला मिळतो तेव्हा मात्र आपल्या वेळेचं चीज झाल्यासारख वाटत.

आजचा व्हिडियो ही तशाच पठडीतला आहे. खर तर लग्नाच्या वायरल व्हिडियोज विषयी लिहावं असं ठरत होतं. पण मनासारखा व्हिडियो दिसेना. तेवढ्यात एक जुना व्हिडियो बघण्यात आला. त्यात नवरा आणि नवरी स्वतःच्या लग्नात ड्रम सेट वाजवत असतात. त्या व्हिडियो वरून अस वाटलं की असाच काहीसा व्हिडियो दुसरा एखादा असेल तर. योगायोग हा की काही काळाने आपल्या टीमला आता पाहिलेला व्हिडियो निदर्शनास पडला. आणि बघताच क्षणी वाटलं की आपल्या वाचकांना ह्या व्हिडियो विषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यात आमच्या टीमला सुदधा हा व्हिडियो आवडला आहे हे ही आलंच.

असो. हा व्हिडियो दिसून येतो तो एका लग्नातला आणि त्यातही हळदीचा असावा असं कळतं. आता हळद म्हणजे मजा मस्ती असणारच ना राव. त्यात डीजे धमाल करणारा असेल तर अजून बहार येते हळदीच्या कार्यक्रमात. या हळदीत मूळ डीजे कोण असतो ते कळत नाही, पण जीची हळद आहे ती आपली ताई या व्हिडियोत डीजे बनून तयार असते. बरं ती डीजे बनते म्हणजे नुसते हेडफोन्स घालून उभं राहणं नाही. हळद असल्यामुळे समारंभाचा सगळा पेहराव असतो आणि त्यात ताई असते हसमुख. त्यामुळे तिचं रूप अजून खुलून येत असत. पण एक मात्र खरं की ही ताई जेव्हा डोक्यात हेडफोन्स घालून उभी राहते तेव्हा खरीखुरी डीजे वाटत असते. बरं ती नुसती उभी नसते तर डीजेच्या समोर असलेली डिस्क पण वापरत असते. गाणंही धुमाकूळ घालणारं वाजत असतं. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ हे ते गाणं. हे गाणं वाजल्याशिवाय तशी पण हळद पूर्ण होत नसावी. आधीच हे लोकप्रिय गाणं आणि त्यात डीजे बनून धमाल करणारी ताई असं समीकरण असल्यावर मग काय मजाच. व्हिडियो तसा छोटाच आहे. त्यामुळे सुरुवात होते तेव्हा गाणं एव्हाना वाजत असतं. ताईला आता काय करु नी काय नको असं झालेलं असतं.

नकळत ती डोक्याला हात लावते. आपल्याला ही हसायला येतं. पण ती चट्कन सावरते. चट्कन म्हणजे एखाद्या सेकंदात. मग पुन्हा डिजेगिरी सुरू होते. यावेळी ती डीजे होण्याचा थोडा फिल घेत असावी. मग हा फिल घेऊन झाल्यावर ती एकदा डिस्क पूढे मागे करून एक इफेक्ट देऊन बघते. एव्हाना सगळेच जण या नवरीकडे बघत असतात. तिला प्रोत्साहन देत जल्लोष करत असतात. या इफेक्ट् नंतर मात्र तिला ही राहवत नाही आणि ती बेधडक नाचू लागते. वातावरणात उत्साह शिगेला पोहचलेला असतो आणि तेवढ्यात व्हिडियो संपतो. खरं तर व्हिडियो छोटा आहे. अगदी १३ सेकंदांचा आहे, त्यामुळे चट्कन संपतो. पण एवढा आनंद देऊन जातो की आपणही तो व्हिडियो पुन्हा पाहतो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला.

आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असेलच. तसेच या विषयावरील हा लेखही आपल्याला आवडला असणार अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांमधून आम्हाला जसे प्रोत्साहन मिळत असते तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी सुदधा मिळत असते. यातूनच मग उत्तमोत्तम लेख लिहिले जातात. तेव्हा आपल्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *