आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहावं, यासाठी लोक अनेक क्लुप्त्या लढवत असतात. वेळेकाळानुसार, त्या स्थानिक भागानुसार तसेच नवरा-नवरीच्या घरच्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार लग्नाचा खर्च केला जातो. हेलिकॉप्टरपासून तर बैलगाडीपर्यंत प्रत्येक जण आपापल्या हौशीनुसार आणि कुवतीनुसार लग्नाची एन्ट्री आणि वरात कशी काढायची ते ठरवत असतो. सध्या नवरा-नवरीच्या एन्ट्रीमध्ये बराच बदल आल्याचं पाहायला मिळत आहे. कधी नवरी घोडीवर येते, तर कधी नवरा-नवरी नाचत येतात, तर कधी कधी एन्ट्री सर्वांच्याच आठवणीत राहावी, हाच या वेगळ्या आणि हटके एन्ट्रीमागचा हेतू असतो. सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत नवरा-नवरीच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अशा प्रकारचे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून पसंतही केले जातात. सोशल मीडियावर अनेकदा लग्नसमारंभातील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं.
जवळपास प्रत्येकाची आपल्या लग्नात अनोखं काहीतरी करण्याची इच्छा असते. जेणेकरून हा खास दिवस नेहमी लक्षात राहावा. लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव यांच्याकडेच सगळ्या पाहुण्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचालही लोकांच्या नजरेत येते. लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकजण लग्नातच डान्स करायला सुरुवात कऱण्याचा पर्याय निवडतात. आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतो. अशाच एका नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, नवरीने स्टेजकडे जाताना बॉलिवूड गाण्यावर भन्नाट असा डान्स केला आहे. तिच्या डान्सचे फक्त माहेरच्या नाही तर सासरच्या कुटुंबाने सुद्धा कौतुक केले आहे.
लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक खास क्षण असतो. हा गोड क्षण कायम आठवणीत रहावा यासाठी प्रत्येकजण काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात बिनधास्त डान्स करत हा दिवस साजरा करतात. हल्ली सगळीकडे याचा ट्रेंडच सुरू आहे. हाच ट्रेंड फॉलो करत या व्हायरल व्हिडीओमधल्या नवरीने लग्नात धांसू डान्स केलाय.
सहसा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, कि लग्नात वरमाळेच्या आधी नवरदेव स्टेजवर उभा असतो. इतक्यात नवरी नाचतच स्टेजवर एन्ट्री करते. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडिओ असा नाही. यात नवरी आनंदात असा काही जबरदस्त डान्स करते ज्याची नवरदेवाने कल्पनाही केलेली नसते. त्यालाही हा नवरीचा डान्स बघून भलताच आनंद झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :