Breaking News
Home / मनोरंजन / नवरीने स्वतःच्याच संगीत फंक्शनमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल

नवरीने स्वतःच्याच संगीत फंक्शनमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल

मराठी गप्पावर आपलं प्रेम हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपली टीम करत असलेली मेहनत योग्य दिशेने होत असून त्याला यश येताना बघताना आनंद होतो. अर्थात यात मुख्य श्रेय आहे ते आपल्या भक्कम पाठिंब्याचं. आपला हा खंबीर पाठींबा असाच कायम राहू दे. आज नेहमीप्रमाणे आपल्या टीमने एक छान व्हिडियो पाहिला. लग्नातील व्हिडियो चं आहे तो. जवळपास दीड करोड हुन अधिक लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. तेव्हा या व्हिडियो ची लोकप्रियता लक्षात यावी. बरं व्हिडियो मोठा नाहीये. केवळ सवा मिनिटांचा आहे. पण मग आहे काय या व्हिडियोत असं खास? यात आहे एक ताई जीचं लग्न ठरलेलं असतं. ठरलेलं असतं म्हणण्याचं कारण हा व्हिडियो आहे दोन वर्षांपूर्वीचा. आणि ज्यांच्या युट्युब चॅनेल वर हा व्हिडियो आहे त्यांच्या चॅनेल वरील इतर व्हिडियोज मध्ये सुद्धा हीच ताई आपल्याला विविध गाण्यांवर थिरकताना दिसते.

त्यातून कळतं की तिचं लग्न झालं आहे. व्हिडियो ची सुरुवात होते तेव्हा एका सुप्रसिद्ध गाण्याची धून वाजत असते. काहींना ही धून आधी ऐकल्याचं जाणवेल. ही धून असते खलनायक चित्रपटातील पालखी मैं होके सवार चली रे या गाण्याची. सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला.अलका याग्नीक यांनी हे सुमधुर गाणं गायलं आहे. या लोकप्रिय चित्रपटातील या लोकप्रिय गाण्यावर ही ताई डान्स करत असते. उत्तम पोषाख, उत्तम अलंकार यांच्यामुळे आधीच देखणं व्यक्तिमत्व असलेली ताई अजून खुलून दिसत असते. गाणं पुढे सरकतं तसा तिचा डान्स चालू होतो. उपस्थित सगळे तिला प्रोत्साहन देत असतात. तेवढ्यात तिच्या मागे असलेला एक चिमुकला पुढे येतो. तो तिच्या अगदी जवळ उभा असतो. दोघांनाही अंदाज येत नाही एवढ्या जवळ उभे असतात. यात या ताईचा एक हात त्याला लागला तर पडेल बिचारा असं वाटेपर्यंत एक व्यक्ती पुढे येऊन त्याला बाजूला करते. इथे ताई या गाण्यात मश्गूल होऊन डान्स करत असते. मग एक काकू येतात.

कौतुक म्हणून तिच्या डोक्यावरून पैसे ओवाळतात. बऱ्याच लग्नांत आपल्याला असं करताना माणसं आढळतातच. ताईचा डान्स पुढेही चालू राहतो आणि काही वेळाने व्हिडियो संपतो. ताई या गाण्याला साजेसे अशा डान्स स्टेप्स करते. लग्नाचा पोशाख, अलंकार यांचं वजन असून सुद्धा ताई तिच्या परीने उत्तम डान्स करते.त्यासाठी तिचं कौतुक. स्वतःच्या लग्नात मस्त मजा करणारी मुलं मुली आपण बघतोच. ही ताई यातलं अजून एक प्रसन्न व्यक्तिमत्व. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. पण एवढ्यावर थांबू नका बरं का. आपल्या टीमने आपल्याला आवडतील असे अनेक लेख गेल्या काळात प्रसिद्ध केले आहेत. आजचा दिवस ही यास अपवाद नाही. तसेच या पुढेही करत राहूच. या सगळ्या लेखांचा आनंद घ्या आणि हे लेख शेअर करून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आपला लोभ मराठी गप्पावर कायम असावा. मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *