Breaking News
Home / मनोरंजन / नवरीने होणाऱ्या नवऱ्यासाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा हा सुंदर व्हिडीओ

नवरीने होणाऱ्या नवऱ्यासाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा हा सुंदर व्हिडीओ

लग्न म्हणजे सगळेच कामात मग्न अशी अवस्था असते. उगीच नाही म्हणत लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. साखरपुड्याला ही कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असते. पण अस असलं तरी या लग्न सोहळ्यांमध्ये मजा मस्ती करण्याचे क्षण शोधून काढले जातातच. त्यात जर नवरा नवरी स्वतः धमाल मस्ती करणारे असले मग तर कमाल मजा येते. असाच एक कमाल व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. या व्हिडियोला गेल्या सहा महिन्यात जवळपास तीस लाखांहून अधिकांनी पाहिलं आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. हा व्हिडियो एकदम उत्साहाने आणि आनंदाने भरलेला आहे. म्हंटलं या व्हिडियोविषयी आपल्या वाचकांना सांगितलं तर पाहिजेच. यातूनच आजचा हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग वेळ न दवडता या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे राधिका आणि आयुष या जोडप्याच्या साखरपुड्याचा. या व्हिडियोतून हे दोघेही अगदी उत्साही असल्याचं प्रतीत होतं.

हा व्हिडियो म्हणजे राधिकाने आयुष याच्यासाठी गुप्तपणे एक डान्स तयार केलेला असतो. याची कानोकान खबर नसलेला आयुष राधिकाची साखरपुडयाच्या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट बघत असतो. तीच वेळ साधून, राधिका आणि या दोघांचा मित्रपरिवार हा डान्स सादर करतात. अचानकपणे हा गोड धक्का मिळाल्याने आयुष खुशीत असतो. बरं हा केवळ एका गाण्यावरचा परफॉर्मन्स नसतो. यात तब्बल चार गाणी असतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला पहिलं गाणं ऐकायला मिळतं. याच गाण्यावर राधिका ही मस्त एन्ट्री घेताना आपल्याला दिसते. ‘किथे रेह गया’ हे नीती मोहन यांचं गाणं याप्रसंगी वाजत असतं. या गाण्याच्या सुरुवातीपासूनच राधिकांच्या मैत्रिणींनी फेर धरलेला असतो. मग दुसरं गाणं सुरू होतं. हे ही एक प्रसिद्ध गाणंच असतं. ‘सौ आसमान’ हे या गाण्याचे बोल होय. आपल्यापैकी अनेकांना आवडणारं असं हे गाणं आहे. यावरही मग मस्त असा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो. पुढचं गाणं हे जुन्या गाण्याचं नवीन व्हर्जन असतं. ‘मैं चली मैं चली’ हे उर्वशी किरण शर्मा यांनी गायलेलं गाणं आता ऐकायला येत असत. या गाण्यावर डान्स करण्यासाठी आता सगळी मुलं पुढे सारसावलेली असतात. मित्र आणि मैत्रिणींचा सहभागी यांमुळे या तीनही डान्स परफॉर्मन्सला चार चांद लागतात जणू.

मग वेळ येते ती दुल्हेराजाची. सजवलेल्या मंचावर आरूढ होत राधिका यासमयी आयुषला प्रपोज ही करते. अगदी योग्य वेळ साधून, ब्रुनो मार्स यांचं ‘आय वॉन्ना मॅरी यु’ हे गाणं लागलेलं असतं. मग यथासांग आयुष सुद्धा राधिकाच्या हातात अंगठी घालतो आणि हा सोहळा संपन्न होतो. व्हिडियो संपताना या दोघांची सुंदर जोडी आपल्याला दिसत असते आणि आपण मनोमन त्यांना त्यांच्या पूढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत असतो. यात आपली टीमही सामील आहेच. आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही असंच वाटलं असणार हे नक्की. जर आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा तुम्हाला खूप आनंद होईल.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख वाचूनही आपल्याला आनंद झाला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांना आवडतील अशा विषयांवर नेहमीच लेखन करत असते. आपणही त्यास नेहमीच उत्तम प्रतिसाद देत असता आणि देत राहालच. सोबतच आपली टीमसुद्धा आपल्यासाठी नेहमी उत्तमोत्तम लेख वाचनासाठी घेऊन येईल याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले पण आपण न वाचलेले लेख वाचा. प्रत्येक लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.