Breaking News
Home / मनोरंजन / नवर्याच्या बहिणीने लग्नमंडपात केली अतरंगी एंट्री, बघा व्हिडीओ

नवर्याच्या बहिणीने लग्नमंडपात केली अतरंगी एंट्री, बघा व्हिडीओ

आपल्या आयुष्यात मजा मस्ती आणि आनंद यावा, टिकून रहावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी मग आपल्याला आवडतील अशा विविध गोष्टी आपण करत असतो ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि आनंद मिळतो. पण अशी एखादी गोष्ट आहे का की जी सगळ्यांमध्ये समान असू शकते. म्हणजे जी केल्याने प्रत्येकालाच आनंद मिळू शकतो. होय. अशी एक गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे डान्स करणं.

आपल्याला डान्स आवडत असेल वा नसेल पण आपण जेव्हा जेव्हा डान्स करतो तेव्हा आपसूक आपल्याला मनापासून व्यक्त होतो आहोत असं वाटत राहतं. अगदी डान्स संपल्यावर आपण शारीरिक दृष्ट्या थकलेलो असलो तरी मनात ज्या काही आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की विचारू नका. बरं ज्यांना डान्स आवडतो, जमतो आणि ज्यांना जमत नाही अशांना सुद्धा हाच आनंद होतो. डान्स करणं हे असंच आहे. आपण स्वतःला विसरून नाचतो ना तेव्हा तर सर्वोच्च आनंद होतो. बरं त्यात डान्स येत असेल तर इतरांनाही हा डान्स अनुभवायला मिळण्याचा आनंद घेता येतो. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या.

हा वायरल व्हिडियो आमच्या माहितीनुसार केवळ तीन ते चार महिने जुना असेल. पण आजतागायत जवळपास सवा चार लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडियोने मिळवले आहेत. यावरून किती वेगाने हा व्हिडियो वायरल झाला असेल आणि पाहणाऱ्यांना आवडला असेल याची कल्पना यावी. हा व्हिडियो एका लग्नातील आहे. आता तुम्ही म्हणाल नवरा नवरी डान्स करत असतील कदाचित… कारण आपल्याला लग्नाचा व्हिडियो म्हणजे नवरा नवरी मनसोक्त डान्स करताना पाहण्याची सवय झालेली असते. पण नाही. या व्हिडियोत आपल्याला नवऱ्याची बहीण डान्स करताना दिसते. तिला डान्सची आवड असावी हे पहिल्या क्षणापासून कळत असतं. त्यात तिची सगळ्या उपस्थितांमधून एन्ट्री होते ती कल्पना सुद्धा आवडून जाते. तिने निवडलेलं गाणं असतं ‘सौदा खरा खरा’. नजीकच्या काळातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे हे गाणं होय. या गाण्याची खासियत म्हणजे यावर परफॉर्मन्स करण्यासाठी जबरदस्त ऊर्जा पाहिजे. सुदैवाने या तरुणीकडे ही ऊर्जा ठासून भरलेली असते. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही ऊर्जा आणि तिचा उत्साह काही कमी होत नाही. त्यामुळे तिच्या डान्सची ही एक जमेची बाजू म्हणायला हवी.

तसेच तिच्या डान्स स्टेप्स ही एकदम मस्त असतात. त्यामुळे या गाण्यावर केलेल्या तिच्या डान्सची रंगत वाढते. आपण जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही या तरुणीचा डान्स आवडला असेलच. पण आपण जर अजूनही हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला खूप आवडून जाईल. यातील त्या तरुणीची ऊर्जा, तिचा उत्साह यांनी आपणही प्रेरित व्हाल आणि जमत असेल तर नक्कीच डान्स कराल. कारण कोणताही मस्त डान्स बघितला की त्या गाण्यावर आपणही डान्स करावा असं वाटतंच. कदाचित ते आपल्याला ही वाटेल. असो.

मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि लक्षात आलं की आपल्या वाचकांना म्हणजे आपल्याला याविषयी वाचायला आवडेल. त्याचप्रमाणे आपल्या टीमचा हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.