Breaking News
Home / मनोरंजन / नवर्याच्या मित्रांनी लग्नात सर्वांसमोर केला अफलातून डान्स, दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

नवर्याच्या मित्रांनी लग्नात सर्वांसमोर केला अफलातून डान्स, दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आजकाल जशी पिढी बदलत आहे, तशी संस्कृती पण बदलत आहे. काही गोष्टी चांगल्या पद्धतीने बदलत आहे, याचे आपल्याला जास्त कौतुक आहे. आता लग्नाचंच घ्या ना… आधी नवरा-नवरीला स्वतःचं लग्न अजिबात एन्जॉय करता येत नसायचं. आता मात्र उलट आहे, नवरा-नवरी स्वतःच लग्न इतकं भारी एन्जॉय करतात की, त्यांना त्या आठवणी आयुष्यभर पुरतात. आजकालच्या लग्नात तर एंटरटेनमेंट आणि एन्जॉयची अजिबात कमी नसते. सगळेच आनंद घेत असतात. त्यातली त्यात सगळ्यात जास्त मजा घेणारी लोकं म्हणजे नवरदेव-नवरीचे मित्र-मैत्रिणी… हळद, वरात, मंगलाष्टके, पूजा अगदी सगळ्या विधींना हे मित्रमंडळी एन्जॉय करत असतात. काही जण पिऊन तर काही जण न पिता. संपूर्ण लग्नात सगळ्यात जास्त एकच गोष्ट एन्जॉय केली जाते ती म्हणजे डान्स… मोठी फॅमिली असेल तर प्रत्येक विधी साठी 1-1 दिवस दिला जातो. छोटं लग्न असेल तर एकाच दिवसात सगळे विधी केले जातात. यात डान्स साठी विशेष वेळ राखीव ठेवला जातो. लग्न म्हटलं कि सर्वात जास्त उत्साह असतो तो म्हणजे मित्र-मंडळींमध्ये.

आता अशाचं एका मित्राचा उत्साह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता गेल्या काही वर्षात लग्नातील अनेक मजेशीर आणि काही काही अतरंगी किडे असणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कधी मित्र-मंडळी मजा करताना तर कधी रुसवे फुगवे काढतानाचे हे मजेशीर व्हिडीओ लोकांनी पाहायला आवडतात. आमच्या हाती आलेला हा व्हिडीओ 2 तरुणांचा आहे, जे लग्नात सगळ्यांसमोर दणकून नाचत आहेत. वेगवेगळ्या ३ गाण्यांवर या दोघांनी डान्स केला आहे. सगळीकडे निवांत वातावरण झालं असताना या पोरांनी केलेल्या डान्सने सगळा माहोलच बदलून गेला. सगळीकडे आग लागली या भावांच्या डान्सने… आता ही दोन्ही पोरं काही डान्स शिकलेली नाहीत. तरीही त्यांनी ज्या पद्धतीने डान्स केला आहे, त्यावरून ते अगदी प्रोफेशनल डान्सरला टक्कर देतील, असे वाटते. गाण्याचा आनंद घेऊन जे नाचतात, स्वतःसाठी आनंद घेऊन जे नाचतात, ते लोक खरा डान्स करतात.

म्हणूनच या पोरांचा डान्स लोकांनी एन्जॉय केला आणि या पोरांनी पण एन्जॉय केला. हे दोघे एकमेकांसोबत जुगलबंदी करूनही नाचले आहेत, त्यामुळे त्यांचा डान्स अजूनच खुलला आहे. यांच्या नाचण्याची अजून एक भारी गोष्ट आहे. ती म्हणजे एकमेकांसोबत जुगलबंदी करताना त्यांनी एकदम वेगळ्याच स्टेप्स वापरल्या आहेत. समजा, या दोघांतील कुणीही एक जण नसता तरी त्यांनाही नाचण्याची मजा घेता आली नसती आणि बघणार्यांना पण मजा आली नसती. आपण वेड्यासारख नाचत आहोत, याची कल्पना असूनही या पोरांनी एकदम खतरनाक डान्स केलाय. ते तसे नाचताना अजिबात लाजलेही नाहीत. आता ते कसे नाचलेत, हे बघण्यासाठी तर व्हिडीओ बघावाच लागेल ना भाऊ… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.