Breaking News
Home / बॉलीवुड / नवर्यापेक्षा अनेक पटीने कमावते बिपाशा बसू, चित्रपटांत काम मिळाले नाही तरी अशी करते कमाई

नवर्यापेक्षा अनेक पटीने कमावते बिपाशा बसू, चित्रपटांत काम मिळाले नाही तरी अशी करते कमाई

७ जानेवारी १९७९ ला दिल्लीमध्ये जन्मलेली बिपाशा बसू आज आपला ४१ वा जन्मदिवस साजरा करत आहे. बिपाशा बसू आज भलेही चित्रपटांत दिसून येत नसेल परंतु एक काळ होता जेव्हा बिपाशाला स्क्रीनवर पाहण्यासाठी लोकं वेडे व्हायचे. खरंतर, बिपाशाची फिटनेस आणि सौंदर्य आजसुद्धा पाहिल्यासारखेच आहे. बिपाशाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘अलोन’ होता. हा चित्रपट २०१५ मध्ये आला होता. ह्या चित्रपटाच्या एक वर्षानंतरच बिपाशाने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवर सोबत लग्न केले होते. बिपाशा आणि करणची जर तुलना केली गेली तर अनुभव आणि लोकप्रियता मध्ये बिपाशा आपल्या नवर्यापेक्षा खूप पुढे आहे. इतकंच नाही तर कमाई बद्दल म्हणाल तर एकूण संपत्तीच्या बाबतीत सुद्धा बिपाशा करणला मात देते. बिपाशाची संपत्ती आपल्या नवर्याच्या संपत्तीपेक्षा जवळजवळ ७ पट अधिक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिपाशाची एकूण संपत्ती १५ मिलियन डॉलर म्हणजेच १०८ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर तिचा नवरा करण सिंग ग्रोवरच्या संपत्तीबद्दल बोलाल, तर ती २ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ कोटी रुपये. आता ह्याच गोष्टी पासून तुम्ही अंदाज लावू शकता कि बिपाशा आपल्या पतीच्या तुलनेत किती श्रीमंत आहे.


जसे कि तुम्हां सर्वांना माहितीच आहे कि, आजकाल बिपाशा बसू कोणत्याही चित्रपटात दिसून येत नाही. अशामध्ये तुम्ही विचार केला आहे का कि बिपाशा चित्रपटात काम न करता सुद्धा इतके पैसे कसे कमावते. गेल्या ४ वर्षात कोणत्याही चित्रपटात काम न करता सुद्धा तिची संपत्ती १०० कोटींच्या वर कशी पोहोचली. आज आम्ही ह्याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. खरंतर बिपाशा सध्या जाहिरातीतून चांगली कमाई करत आहे. ती नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपनीच्या जाहिराती करत आहे. बिपाशाला आपण आतापर्यंत रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, फा डियोड्रेंट, गिली ज्वेलरी, कॅडिला शुगर फ्री गोल्ड, हेड अँड शोल्डर शॅम्पू सारख्या प्रोडक्ट्सच्या जाहिराती करताना पहिले आहे. ह्या प्रोडक्ट्सचे प्रमोशन करण्यासाठी बिपाशा भारी भक्कम फीस वसूल करते.

जाहिरातींशिवाय बिपाशा स्टेज शो सुद्धा करते. कोणत्याही स्टेजवर डान्स परफॉमन्स साठी बिपाशा २ ते ३ कोटी रुपये घेते. आणि एक ब्युटी आयकॉन असल्यामुळे तिला अनेक फॅशन शो मध्ये सुद्धा बोलावले जाते. बिपाशा आपल्या फिटनेस संदर्भात नेहमी ऍक्टिव्ह असते. लोकांना फिटनेसबद्दल गाईड करण्यासाठी तिने आपली डीव्हीडी सुद्धा लाँच केलेली आहे. बिपाशा जेव्हा चित्रपटात काम करत होती तेव्हा ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपयांपर्यंत फीस घ्यायची. अश्यामध्ये अगोदर चित्रपटामध्ये कमावलेले पैसे तिच्या बँकबॅलेन्स मध्ये आहेत. आणि त्याचा भारी भक्कम व्याज सुद्धा तिला मिळतो. बिपाशाकडे ३ आलिशान घरे आहेत आणि काही लग्जरी गाड्या सुद्धा आहेत. ती अनेक मॅगजीनच्या कव्हर पेजवर दिसून आलेली आहे. ह्या सर्व गोष्टीमुळे बिपाशाची कमाई १०० कोटींपेक्षा सुद्धा जास्त झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिपाशा आणि करण लवकरच ‘आदत’ नावाच्या चित्रपटात दिसून येऊ शकतात. जर असं झाले तर बिपाशाचे बॉलिवूडमध्ये हे पुनरागमन असेल.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *