बिहारमध्ये एका नवविवाहित जोडप्याचे त्याच्या घरातल्या लोकांनी झाडू आणि चप्पलांनी स्वागत केले आणि त्यांची चांगलीच धुलाई केली. लग्न केल्यानंतर जेव्हा नवरा आपल्या पत्नीला घेऊन घरी आला. तेव्हा कुटुंबातील लोकांनी नवविवाहित वधूचे स्वागत करण्याऐवजी धुलाई करणे चालू केले. त्यानंतर नवरीने लग्न तोडलं आणि आपल्या घरी परत गेली. परंतु लग्न तोडण्या अगोदर नवविवाहित वधूनेसुद्धा आपल्या पतीची चांगलीच धुलाई केली. हि अजबगजब घटना लखीसराय येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखीसराय येथे राहणाऱ्या रुपेश कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या कुटुंबापासून लपवून लग्न केले. लग्न केल्यानंतर रुपेश कुमार जेव्हा आपल्या वधूला घेऊन घरी आला, तेव्हा खूप हंगामा झाला. आणि रुपेश कुमारची धुलाई केली गेली. खरंतर, रुपेश कुमार अगोदरपासूनच विवाहित आहे आणि एका मुलाचा वडील देखील आहे. घरात पत्नी असताना देखील त्याने कोणालाही न सांगता दुसरे लग्न केले.
जेव्हा लग्न केल्यानंतर तो आपल्या दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला तेव्हा पहिल्या पत्नीचा रागाचा पाराच चढला. तिने लगोलग आपल्या भावांना फोन केले आणि त्यांना घरी बोलावून घेतले. त्यानंतर पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी मिळून रुपेशची चांगलीच धुलाई केली. सोबतच दुसऱ्या पत्नीलासुद्धा मारलं. परंतु दुसऱ्या पत्नीने त्यांची क्षमा मागितली आणि सांगितले कि तिच्यासोबत खोटं बोलून लग्न केले गेले.
रुपेशच्या दुसऱ्या पत्नीने सांगितले कि, रुपेशने स्वतःला मुंगरे जिल्ह्यातील धरहरा परिसरात वाहाचौकी गावातील रहिवासी असल्याचे सांगितले होते. सोबतच त्याने अगोदरच विवाहित असल्याची गोष्ट देखील लपवली होती. दुसऱ्या पत्नीने आरोप केले कि त्याने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने लग्न केले. रुपेशचे सत्य माहिती पडताच दुसऱ्या पत्नीने लगेचच लग्न मोडले आणि आपली घरी परत गेली.
रुपेशचे सत्य समोर आल्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार देत आपल्या डोक्यावरचे कुंकू पुसून आणि मंगळसूत्र देखील काढले. ह्यानंतर तिने आपल्या भावांना बोलावलं आणि त्यांच्यासोबत घरी परतली.
दुसऱ्या पत्नीनेदेखील केली चांगलीच धुलाई :
लग्न तोडण्याअगोदर रुपेशच्या दुसर्या पत्नीनेसुद्धा खूप धुलाई केली. तर ह्या पूर्ण घटनेचा कुणीतरी व्हिडीओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर वायरल होत आहे. आरोपी तरुण रुपेश कुमारचे पहिले लग्न २०१८ मध्ये झाले होते. जवळपास ३ वर्षाअगोदर झालेल्या ह्या लग्नापासून त्याला एक मुलगा देखील आहे. इतकं असूनही त्याने कुणालाही न सांगता दुसरे लग्न केले. दुसरी पत्नी लग्न तोडून सोडून गेल्यानंतर आता रुपेश पुन्हा आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलासोबत राहत आहे.