Breaking News
Home / मनोरंजन / नवऱ्याने वधूसाठी केलेला हा अफलातून डान्स होतोय वायरल, नवरीला तर विश्वासच बसत होत नव्हता

नवऱ्याने वधूसाठी केलेला हा अफलातून डान्स होतोय वायरल, नवरीला तर विश्वासच बसत होत नव्हता

लग्नकार्याचा काळ म्हणजे धावपळ. या काळात लग्नघरात उत्साह आणि ताण एकमेकांसोबत असे काही वावरत असतात की काही विचारू नका. ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी तर यांची अगदी हद्द होते. पण एकूणच उत्साहाचं वातावरण असल्याने ताण कुठच्या कुठे निघून जातो. हल्ली तर आयुष्यातील या महत्वाच्या दिवसासाठी प्लॅनिंग करणाऱ्या अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे लग्न घरातील मंडळींवर काही अंशी ताण कमी होतो. तसेच विविध प्रयोग ही करता येतात. जसे की मेहेंदि डान्स आणि इतर कार्यक्रम. यांमुळे या शुभ कार्यात अजून रंगत भरते. असाच एक लग्नसोहळा काही काळापूर्वी वायरल झाला होता. या लग्नसोहळ्यातील नवरदेवाने त्याच्या नववधू साठी केलेला डान्स फार लोकप्रिय ठरला होता. लग्नात बॉलिवूडच्या गाण्यांची एक क्रेझ असतेच. या गाण्यांवर थिरकत या नवरदेवाने अगदी धमाल उडवून दिली होती. इतकी धमाल की नववधूला तर आश्चर्याचा सुखद ध’क्का बसला होता. या व्हिडियोत ही नववधू आणि तिच्या सख्या लग्नमंचकाच्या खाली उभ्या असतात. समोरील मंचकावर एक डान्स परफॉर्मन्स होणार असतो.

अगदी नटून थटून तयार असलेल्या सात कन्यका गाण्याच्या क्यू ची वाट बघत उभ्या असतात. गाण्याच्या आधी सुरू होतो एक मोनोलॉग, शाहरूख खान यांच्या आवाजातला. नववधू आणि तिच्या सख्या यामुळे अगदी हरखून जातात. त्यांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. त्यात भर पडते जेव्हा नवरदेव गाण्यावर एंट्री घेतो तेव्हा. एव्हाना पाठी उभी असलेली वर्हाडी मंडळी सुद्धा उत्सकतेपायी उभी राहिलेली असतात. नवरदेवाचं जल्लोषात स्वागत होतं ते ‘साजन जी घर आए, दुल्हन क्यों शर्माए’ या गाण्यावर. नवरदेव अगदी कसलेल्या डान्सरप्रमाणे गाण्यावर डान्स सादर करतात. मग सुरू होतं दुसरं गाणं. यावेळी आजूबाजूला असलेले डान्सर वर्हाडी बदलतात. अजून जास्त उत्साहात नवीन मंडळी मंचावर येतात आणि गाणं सुरू होतं – मुझसे शादी करोगी. मग काय अजून धमाल. सगळे जणं या परफॉर्मन्सचाही आनंद घेतात. मग येतं तिसरं गाणं. यासाठी थोडे प्रॉप्स घेतले जातात. नववधू चे स्टायलिश फोटो घेऊन वर्हाडी मंडळी नाचत असतात तर नवरदेव हातात फुलांची माळा घेऊन असतो. याला साजेसे असंच गाणं निवडलेलं असतं. ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’.

नववधू तर नवरदेवाच्या या परफॉर्मन्स वर अगदीच फ्लॅट झालेली दिसून येते. अगदी उत्साहात हे गाणंही पार पडतं आणि हा व्हिडियो संपतो. खरं तर हा व्हिडीओ आहे चार मिनिटांच्या पेक्षाही जास्त वेळेचा. पण त्यातील डान्स परफॉर्मन्स इतके अफलातून आहेत की हा व्हिडिओ एकदा बघणं तर बनता हे बॉस. आणि एकदा बघितलात ना, कि पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो हा व्हिडीओ. एखाद्या हिंदी चित्रपटातील एक प्रसंग वाटावा इतका तो ग्लॅमरस आणि आनंददायी आहे. या व्हिडियोतील नवरदेवाने ज्या पद्धतीने उत्कृष्ठ डान्स केला आहे त्यास तोड नाही. त्याला मराठी गप्पाच्या टिमकडून सलाम. तसेच या व्हिडियोतील नवपरिणीत जोडप्यास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्याला हा लेख आवडला असेलच त्यामुळे आपण हा लेख शेअर करणार आहातच. सोबत फक्त एक करा. आमच्या टीमने लग्नाच्या व्हिडियोज वर आधारित इतरही लेख लिहिले आहेत. त्यात अगदी नाचत गात एंट्री घेणारी वधू, गाणं गात गात प्रपोज करणारा वर अशा अनेक विषयांवर लेखन केलेलं आहे. आपण त्याही लेखांचा आनंद घ्या आणि आम्हाला ही तो क’मेंट्समध्ये मध्ये कळवा. हे लेख मिळवण्यासाठी वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शनचा वापर करायला विसरू नका. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *