Breaking News
Home / मनोरंजन / नवऱ्याला कळेना लग्नाला बसलोय की मैतीला, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

नवऱ्याला कळेना लग्नाला बसलोय की मैतीला, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात त्यांच्या लग्नाचा दिवस अतिशय खास असतो. आणि या क्षणाला खास बनवण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक जोमाने तयारीही करतात. मात्र, एवढं करुनही बऱ्याचदा अशा घटना घडतात, की लोक पोट धरुन हसतात. सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होतात मात्र सध्या लग्नसराईंचे दिवस असल्या कारणाने लग्न संमारंभातील व्हिडीओ जास्तच व्हायरल होताना दिसत आहेत. कालच एका लग्नामध्ये नवऱ्याने गुट’खा खाला म्हणून नवरीने त्याची धुलाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता एका नव्या नवरीचा माहेरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये लग्नातील गंमती जंमती, चित्रविचित्र परंपरा, किंवा घडलेला एखादा अनोखा प्रकार पाहता येतो. परंतु सध्या लग्नातील एक विचित्रच प्रकार व्हायरल होत आहे.

गावाकडे एके ठिकाणी लग्न लागते, विधी होतात. पाव्हने रावळे येतात, पंगती होतात. डान्स, नाच, मजा, मस्ती, मान-अपमान असं सगळं काही होतं. आणि मग शेवटी येते नवरीला वाट लावण्याची वेळ… हा कार्यक्रम म्हणजे पद्धतशीर रडारडीचा असतो. घरातला कुठलाही पुरुष तुम्ही कुठे रडताना बघितला नसेल मात्र इथे तो हमसून हमसून रडत असतो आणि आपल्या लेकीला वाट लावत असतो. पण कधी कधी लेकी जास्त लाडाच्या असल्या की प्रॉब्लेम होतो आणि तोच प्रॉब्लेम या व्हिडीओत झाला आहे.

जास्त लाडाच्या असणाऱ्या पोरी निघायलाच तयार होत नाहीत. मग शेवटी कशीतरी त्यांची उचलबांगडी करून त्यांना नवऱ्याच्या कारमध्ये बसवलं जातं आणि शेवटी टाटा बाय बाय खतम… बर त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे रडण्याची असते. नवरीला वाटे लावताना नवरीच्या जवळचे नातेवाईक अशा भयंकर पध्दतीने रडतात की, थोडा वेळ आपण पण विचार करतो की, आपण लग्नाला आलोय की कुणाच्या मयतीला..?

तर या व्हिडीओत पण असाच किस्सा झाला. या नववधुची पाठवणी सुरु होती. परंतु ही नवरी मुलगी काही केल्या आपलं घर सोडून जाण्यास तयारच नव्हती. ती अक्षरश: लहान मुलांसारखी लोळण घेऊन रडत होती. या पुढची हद्द म्हणजे हिचे नातेवाईक सुद्धा अश्याच पद्धतीने रडत होते. एका बाईने तर तिच्या गळी पडून रडता रडता दोघीही जमिनीवर झोपुन रडू लागल्या. ही एकूणच परिस्थिती पाहून नवरदेवासह त्याचे कुटुंबातील पाहुणे देखील अवाक होतात. अक्षरशः लहान मुलांसारखे यांचे रडणे-लोळणे पाहून नवरदेव पण थोडा वेळ विचारात पडला असेल की, नक्की लग्नच चालू आहे ना.

लग्नात जशा काही गंभीर गोष्टी असतात तशा काही मजेशीर पण असतात. हा व्हिडीओ मात्र एकदम गंभीर परिस्थितीचा असूनही आपल्याला बघताना हसू आवरत नाही. आता नेमकं अजून काय काय घडलं, हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडीओ बघावाच लागणार ना… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *