Breaking News
Home / मनोरंजन / नवीन लग्न झालेल्या नवरीने घरामध्ये आल्यावर नणंद सोबत केला सुंदर डान्स, बघा व्हिडीओ

नवीन लग्न झालेल्या नवरीने घरामध्ये आल्यावर नणंद सोबत केला सुंदर डान्स, बघा व्हिडीओ

आपण जेव्हा दिर आणि वहिनी या नात्याबद्दल विचार करतो, तेव्हा आपसूक एक खट्याळ पण तेवढंच मायेचं आणि शिस्तीच नातं डोळ्यासमोर उभं राहतं. पण त्याच जागी नणंद आणि भावजय या नात्याबद्दल विचार करायचा असेल तर? बऱ्याच अंशी नकारात्मक अस नातं डोळ्यासमोर उभं राहू शकत. पण खऱ्या आयुष्यात तस असतंच अस नाही. काही घरांमध्ये तर नणंद आणि भावजय यांच्यात सख्ख्या मैत्रिणींपेक्षा जास्त प्रेम असतं अस आढळत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज बघितला. त्यावर लेख लिहिला तर आपल्या वाचकांना आवडेल अस वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो उत्तर भारतातील एका कुटुंबातील वाटत आहे. या व्हिडियोत आपल्याला नणंद आणि भावजय यांच्या पेहरावावरून हा अंदाज लावता येतो. तसेच यातील भावजय असलेली वहिनी ही नुकतीच लग्न होऊन घरी आली आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला या दोघी समोर दिसून येतात.

सोबतीला एक लोकप्रिय गाणं आपल्या कानावर पडतं. ‘५२ गज का दामन’ हे ते प्रसिद्ध गाणं असतं. हे गाणं एवढं प्रसिद्ध आहे की जवळपास एक अब्ज लोकांनी या गाण्याच्या व्हिडियोला पाहिलं आहे. या दोघींना तर ते गाणं आणि त्यातील स्टेप्स जणू पाठ असतात. त्यांच्या या व्हिडियोत अनेक वेळा ते जाणवतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा नणंद बाई स्वतः डान्स सुरू करतात. बाजूला उभ्या असलेल्या वहिनी तो डान्स बघत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना या स्टेप्स आवडल्याचे दिसत असते. मग काही वेळात त्या सुद्धा या डान्स मध्ये सहभागी होतात. मग तिथपासून पुढे त्यांच्याकडे नकळतपणे डान्सची सूत्र जातात. पण अस असलं तरीही दोघींमध्ये डान्स उत्तम करण्याकडे कल असतो हे दिसून येत. त्यांच्यात स्पर्धा आहे असं मात्र अजिबात जाणवत नाही. त्यांच्या प्रत्येक डान्स स्टेप्स मध्ये विविधता असते हे जाणवून येतं. त्यात मग कधी त्या गिरकी घेत नाचत असतात. तर कधी ठुमके मारत दोघींचा डान्स पूढे सरकत राहतो. दोघींमधलं सहकार्य उत्तम असतं.

यात एक गोष्ट अजून दिसून येते ती म्हणजे डान्स करताना वहिनी कितीही व्यस्त असल्या तरी त्यांचा घुंगट काही खाली ढळू देत नाहीत. तसेच आजूबाजुल ही इतरांचं येणं जाणं चालू असतं, आवाज येत असतो. अस असलं तरी या दोघींचं डान्सवर असलेलं लक्ष मात्र ढळत नाही. धमाल मस्ती करत या दोघीही या डान्स मध्ये रंगत भरत जातात आणि काही वेळाने डान्स संपतो. डान्स संपल्यावर मग मात्र या दोघींचं उपस्थित महिलांकडून कौतुक होत असतं आणि या कौतुक सोहळ्याला साक्षी मानत व्हिडियोची समाप्ती होते. खरं तर नणंद आणि भावजय या नात्याविषयी आपल्यापैकी अनेक जण अगदी अनुभवानिशी बोलू शकता. पण एक मात्र खरं की हा व्हिडियो पाहून, त्यातील नणंद आणि भावजय यांच्यातील सुरू होत असलेलं सहकार्य पाहून आपण सुखावतो. बरं वाटतं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही तो आवडला असणार हे नक्की. यावरील लेख ही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *