Breaking News
Home / बॉलीवुड / नव्वदीच्या दशकातील अभिनेत्रींची नाही चालू शकली पडद्यावर पुन्हा कमाल, करिष्मा पासून माधुरी झाल्या फ्लॉप

नव्वदीच्या दशकातील अभिनेत्रींची नाही चालू शकली पडद्यावर पुन्हा कमाल, करिष्मा पासून माधुरी झाल्या फ्लॉप

चित्रपटसृष्टीचे विश्व असे आहे कि फक्त तेच यशस्वी होऊ शकतात ज्यांनी मेहनत केली आहे. बॉलिवूडमध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांचे हृदय जिंकले. परंतु लग्नाच्या कारणामुळे ब्रेक घेतला किंवा सलग फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे ब्रेक घेतल्यानंतर त्या पुन्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून सुद्धा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खऱ्या उतरल्या नाहीत. आज आम्ही आपल्याला अश्याच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यापैकी काहींचे पुनरागमन खूप हिट राहिले तर काहींचे एकदम फ्लॉप.

माधुरी दीक्षित :

माधुरी दीक्षित धक धक गर्ल च्या नावाने बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. १९८४ मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून तिचे बॉलिवूडमध्ये पर्दापण झाले होते. १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातून ती सुपरस्टार बनली होती. माधुरी दीक्षितने त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. तिने २००८ मध्ये ‘आजा नच ले’ ह्या चित्रपटातून पुनरागमन केले, परंतु तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफशेल आपटला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ‘गुलाबी गॅंग’ आणि ‘डेढ इश्किया’ सारख्या चित्रपटांत तिने काम केले. परंतु हे चित्रपट सुद्धा काही खास कमाल दाखवू शकले नाहीत. माधुरीने २०१९ मध्ये ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ सारखे चित्रपट केले, परंतु ते सुद्धा काही खास जादू दाखवू शकले नाहीत.

करिष्मा कपूर :

करिष्मा कपूर नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने लग्नानंतर सिनेमातून खूप मोठा ब्रेक घेतला होता. लग्न केल्यानंतर आणि मुलाला जन्म दिल्यानंतर करिश्मा कपूरने २००९ मध्ये ‘डेंजरस इष्क’ चित्रपटातून पुनरागमन केले होते. परंतु तिचा हा चित्रपट खूप वाईटरित्या आपटला होता. ह्यानंतर करिश्माला अनेक चित्रपटांत फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहिले गेले. आता ‘मेंटलहूड’ ह्या वेबसिरीजमधून ती पुन्हा परतत आहे आणि ह्या वेबसिरीजपासून तिला खूप अपेक्षा आहेत.

श्रीदेवी :

श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये अनके हिट चित्रपट दिले. ती बॉलिवूडमध्ये चांदणी च्या नावाने लोकप्रिय होती. साल १९९७ मध्ये श्रीदेवीने जुदाई चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने पुन्हा २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातून पुनरागमन केले होते. पुनरागमन करताच तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर पुन्हा ब्रेक घेतला. परंतु त्यानंतर पुन्हा ‘मॉम’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

शिल्पा शेट्टी :

बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीला २००७ मध्ये शेवटच्या चित्रपटांत पाहिले गेले होते. ह्यानंतर ‘दोस्ताना’ आणि ‘ओम शांती ओम’ सारख्या चित्रपटांत फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत शिल्पा दिसली होती. आता ‘निकम्मा’ चित्रपटाद्वारे तिने पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. सोबतच प्रियदर्शनच्या ‘हंगामा २’ चित्रपटातसुद्धा शिल्पा शेट्टी दिसणार आहे.

करीना कपूर :

साल २०१६ मध्ये ‘उडता पंजाब’ चित्रपटानंतर करिनाने गरोदरपणामुळे चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर २०१८ मध्ये तिने ‘विरे दि वेडिंग’ ह्या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते. आणि हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर २०१९ मध्ये आलेला ‘गुड न्यूज’ चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली होती. सध्या करीना आमिर खान सोबत आपल्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. ह्या चित्रपटापासून तिला खूप अपेक्षा आहेत आणि ह्याचा खुलासा तिने अनेक मुलाखतीत केलेला आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *