Breaking News
Home / मनोरंजन / नशीब कधी कोणाची केव्हा साथ देईल सांगता येत नाही, बघा ह्या तरुणावर काय प्रसंग आला होता तो

नशीब कधी कोणाची केव्हा साथ देईल सांगता येत नाही, बघा ह्या तरुणावर काय प्रसंग आला होता तो

सध्या हा लेख लिहीत असताना भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर असनी चक्रीवादळ घोंगावतय. त्यामुळे त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस आणि वेगवान वारे यांनी सगळा आसमंत व्यापून टाकलाय. या सगळ्या पर्यावरणीय घटनांचा प्रभाव इतरत्र न होता तरच नवल. त्यामुळे इतर ठिकाणी ही मळभ दाटून येणं वगैरे प्रकार होतंच आहेत. तसेच काही ठिकाणी तर, जोरदार तडाखेबंद वाऱ्यांचा अनुभव ही अनेकांना बघायला मिळतो आहे.

एरवी या काळात सहसा आपण वैशाखातील जबरदस्त तापमानाचा सामना करत असतो. त्यात यंदाची तापमानवाढ ही खरंच ‘घाम फोडणारी’ आहे. त्यामुळे या महिन्यात काय होतय नी काय नाही कळायला मार्ग नाही, अन तेवढ्यात या नवीन चक्रीवादळाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं आहे. वातावरण बदललं असलं तरी त्यामुळे नवीनच प्रश्न उभे राहताहेत. काही ठिकाणी प्रचंड पाऊस आणि वारा असल्याने पिकांचे खूप नुकसान होतं आहे. तर काही ठिकाणी घरावरील, दुकानांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना ही नोंदवल्या गेल्या आहेत. इतकंच काय तर एक घटना तर चक्क कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ते ही एका व्हिडियोच्या स्वरूपात. केवळ अकरा सेकंदात घडणारी ही घटना मनाचा थरकाप उडवून टाकणारी आहे. कारण एरवी आपल्या घराचं उन्हा पावसापासून संरक्षण करणारे हे पत्रे भर वादळात उडून गेले तर जीवघेणे ही ठरू शकतात.

याचा चुकता चुकता का होईना पण प्रत्यय आपल्याला या व्हिडियोत येतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एका गावच्या ठिकाणचा परिसर दिसतो. थोडी माहिती घेतली असता, नांदेड येथील नायगाव येथील ही जागा असावी असं कळतं. अर्थात प्रथितयश वृत्तसंस्थाच्या हवाल्याने आम्ही हे येथे सांगू शकलो आहोत याची कृपया नोंद घ्यावी. तर होतं काय, या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्ती गावातील परिस्थितीचं चित्रीकरण करत असतात. वारं एकदम जोरात असतं. आजूबाजूला असलेली झाडं जबरदस्त अशी हलत असतात. तेवढ्यात कॅमेरा येऊन दोन तरुणांवर स्थिरावतो. ते दोघेही दुचाकीवर बसून कुठे तरी जाणार असतात. त्यांच्या देहबोलीवरून हे कळतं. तेवढ्यात पाठीमागे असलेल्या निळ्या शर्टाच्या तरुणाचं पाठी लक्ष जातं आणि तो लगेच पुढे बघतो. पण त्या पापणी लवते न लवते अशा क्षणात त्याच्या डोळ्यांच्या कडांनी एक गोष्ट टिपलेली असते. दुरून एक पत्रा जोरात उडून त्याच्या दिशेने येत असतो. खरं तर तो पत्रा बऱ्यापैकी लांबवर असतो. पण त्याला लगेच लक्षात येतं की आता हालचाल केली नाही तर जखमी होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. त्या क्षणापर्यंत हा सगळा अंदाज असतो. पण हा अंदाज पुढच्या एक दोन सेकंदातच खरा ठरणार असतो. कारण अर्थातच, वारा हा अतिशय वेगाने वाहत असतो. इतका वेगाने की तो भलामोठा पत्रा अवघ्या काही सेकंदात या माणसाजवळ पोहचतो सुदधा ! पण तेवढ्यात हा माणूस किंचित पुढे गेल्याने त्याचा जीव वाचतो.

आता या दरम्यान काही दुखापत वगैरे झाली का हे मात्र धडपणे कळत नाही. त्यामुळे त्याविषयी भाष्य करणं योग्य होणार नाही. पण निदान जीवावर आलेलं संकट हे दादा बाजूला गेल्याने निभावून नेलं जातं हे मात्र खरं. या प्रसंगी, दोन म्हणी आठवतात. एक म्हणजे देव तारी त्याला कोण मारी आणि दुसरी म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असो. या घटनेत ज्यांच्या जवळपास जीवावर बेतलं होतं ते दादा या धक्क्यातून सावरले असतील अशी आशा आहे. देव त्यांना उदंड आयुष्य देवो ही यानिमित्ताने सदिच्छा !

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आजचा लेख ! सदर वायरल व्हिडियो बघितला आणि त्यातील घटना डोक्यातून जाईना. म्हंटलं याविषयी लिहायला हवं. यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आमच्या या लेखासोबतच आमच्या टीमचे अन्य लेखही आपण आठवणीने वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी त्यांच्या आवडीचे विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही लागतो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *