Breaking News
Home / मनोरंजन / नागोबा बिळात जाता जाता वाचला रे… बघा हा अतरंगी व्हिडीओ

नागोबा बिळात जाता जाता वाचला रे… बघा हा अतरंगी व्हिडीओ

डान्स ही अशी एक गोष्ट आहे, की जी कुठेही करा, पण अगदी मनापासून करणं आवश्यक असतं. कारण जोपर्यंत डान्स हा मनापासून केला जात नाही, तोपर्यंत त्याची मजा येत नाही. मग भले तो डान्स एखाद्या रियालिटी शोच्या मंचावर करा अथवा रस्त्यावर एखाद्या मिरवणुकीत करा. पण जे करताय, ते मनापासून करणं आवश्यक असतं. त्यातही रियालिटी शोज म्हंटले की सगळं कोरिओग्राफ असतं. अर्थात त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे.

त्याउलट एखाद्या मिरवणुकीत होणारा डान्स हा कोरिओग्राफ केलेला नसतो. त्यावेळी, त्याक्षणी, उत्स्फूर्तपणे जे सुचेल ते केलं जातं. बरं, वर उल्लेख केल्याप्रमाणे मनापासून डान्स केला असेल तर, हा ही, डान्स मस्तच होतो. पण काय आहे ना मंडळी, आपल्याकडे कोणतीही गोष्ट अति करणाऱ्या व्यक्तींची संख्या जरा जास्तच आहे. बरं, त्यात थोडी घेतली मध्ये माणूस असेल, तर बघायलाच नको. भानच नसतं. कारण त्यामुळे त्यांना जे सुचतं आणि ते जे करतात ते अतरंगी आणि कधीही न विचार केलेलं असतं. पण एक मात्र खरं की त्यामुळे बाकीच्यांना मात्र भारी हसायला येतं. असाच एक भारी हसायला लावणारा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर वायरल होतो आहे.

हा व्हिडियो कुठचा हे कळत नाही. पण त्यातील मजा मात्र आताच काय, येत्या काळातही कायम राहणार आहे हे नक्की. कारण यात घडणारी घटनाच तशी आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मिरवणूक चाललेली दिसून येते. मिरवणूक म्हंटली की बँडबाजा, नाचणारी माणसं आलीच. पण त्यातले काही जण हे वर उल्लेख केल्याप्रमाणे अतरंगी असतात. असाच एक अतरंगी माणूस आपल्याला या व्हिडियोत दिसून येतो. या एवढ्या भरल्या मिरवणुकीत साहेब, नागीण डान्स करत असतात. बरं मिरवणूक धुळीच्या रस्त्यावरून चाललेली असते. त्यामुळे या नागोबांनी, सळसळ करून सगळा धुरळा उडवून दिलेला असतो. पण लवकरच ही सळसळ गटारात जाण्याची चिन्ह असतात. कारण लोळत लोळत, हे साहेब थेट एका गटाराच्या दिशेने जाताना दिसतात. किंबहुना जातात सुद्धा ! या नागोबाचा फणा एव्हाना त्या गटाररूपी बिळात गेलेलाच असतो. सुदैवाने बाजूला असणारी अनेक मंडळी यावेळी गारुड्याचं काम करताना दिसतात. दोन जणं त्याला खेचून बाजूला नेतात. नशीब ती लोकं तिथे असतात. अन्यथा, हा नागोबा, जवळपास बिळात गेलेला असतो. पण शेवटी देव तारी त्याला कोण मारी म्हणतात तेच खरं. बरं झाली घटना या माणसाच्या ही लक्षात आली असावी. पण ती जशी पूर्ण कळली तशी शंभर टक्के वळली नसावी.

कारण यापूढे हे साहेब आपला वळवळता डान्स चालू ठेवतात, फक्त मार्गात बदल होतो. गटाराच्या दिशेने जाण्याऐवजी दुसरीकडे जाणं सुरू होतं. असो. पण एव्हाना हा डान्स बघणाऱ्यांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळलेली असते. आमच्या टीमला ही हा माणूस खाली पडतो की काय याची भीती वाटली. पण तसं काही होत नाहीये हे बघून जोराने हसायला ही आलं. काय रे भावा काय लावलंय हे, हीच आमची प्रतिक्रिया होती. म्हंटलं तसाही हा व्हिडियो वायरल होतोय, तर आपल्या वाचकांना ही याविषयी कळू दे. त्यातूनच आमच्या टीमने हा लेख लिहिला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *