आजोबांनी नाचता नाचता असा काही राडा केलाय की विचारून सोय नाही. अक्खा मंडप दोन आजोबांच्या डान्सने हादरवून सोडला आहे. आजोबांनी गाण्यावर ज्याप्रकारे ठेका धरलाय, त्यावरून एक लक्षात येईल की आजोबा काय आज थांबायच्या मूडमध्ये दिसत नाहीत. आजोबांनी जिथे गप गुमान लग्नाच्या पंगतीत जेवून पान विडा घेऊन बाजूला व्हायचं की नाय. पण तिथंच आजोबा या घोळक्यात असे नाचत आहेत की आपले जत्रेत हरवलेले भाऊच त्यांना सापडले आहेत. आजोबांच्या या नाचण्याचा अर्थ आजीला लागला नाही! काल परवा पर्यंत एकदम हात पाय सांधेदुखी आणि गुडघेदुखींची तक्रार करणारे त्यांचे अहो ज्या प्रकारे नाचायला लागलेत! त्यानुसार, एक मात्र गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे उत्साहाला काही वय नसतं आणि आनंद फक्त वय पाहून व्यक्त करता येत नाही.
आजोबांच्या याच कृतीचा अनेकांना ठाव ठिकाणाला लागला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याने हा व्हिडिओ शूट केलाय त्याच्याच डोस्क्याचा पार भूगा झालाय. ऐनवेळी आपण ही शूटिंग केली नसती तर तात्या आणि आजोबा त्या इतक्या तालात नाचू शकता, हे गावाला कळलंच नसतं. त्याचं झालं काय लहानपणापासून तात्या आणि आजोबा हे एकमेकांचे लंगोटी मित्र. बर्थडे असो पार्टी असो लग्न असो कि हळद दोघांच्या नाचायची जोडी हे कायम ठरलेली असायची. पण मध्यंतरी झालं काय तात्यांना मुंबईला आपल्या लेका कड जावं लागलं. बरीच वर्ष तात्यांनी मुंबईतच काढले पण आता ठरवलं होतं की गावाला जाऊन राहायचं. तात्या गावाला आल्यावर ती त्यांनी अचानक आजोबांची भेट घेतली. इतक्या वर्षात न भेटलेला आपला मित्र भेटल्याचे पाहून आजोबा आणि तात्या दोघेही भारावून गेले. त्यातच आज गावात एक लग्न असल्याचं फक्त त्यांना कळलं मग लग्नाचं निमंत्रण मिळालं दोघांनीही मनसोक्त जेवणावर ताव मारला. बऱ्याच दिवसांच्या गोड गप्पा ही केल्या, राहिलेला सगळा बॅकलॉग भरून काढला. पान सुपारीची देवाण-घेवाण झाली. इतक्यात डीजे सुरू झाला आणि तात्यांना ठेका धरला आजोबा काय नाचायला मागण्यात पण तात्याच्या आग्रहास्तव आजोबांनीही ताल धरला.
बघता बघता दोघांनीही सगळा मंडप दणाणून सोडला. आता कुणाच्या आजवर हळदीत नाचले नसतील इतके दोघेही नाचत होते. पाहून तरुण पोरांनाही चेव सुटला. त्यांनी ही गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारली आणि आता काय, तात्या आजोबा विरुद्ध सगळी तरुण मंडळी अशी नाचायची स्पर्धा लागली. ज्याच्या घरी लग्न होतं त्याच्याकडे नुसता धुरळा झाला. असा जाहीर डान्सचा पराक्रम गाजवणारा प्रोग्राम पंचक्रोशीत कुठे झाला नसेल. हे सगळं कमी होतं म्हणून की काय पोरांनी लाईव्ह शूटिंग चालू केला. फेसबुवर धडाधड व्हिडिओ व्हायरल व्हायला लागली आणि ते पाहून गर्दी आणखी झाली. त्यानंतर जी गर्दी झाली त्यात फोटो काढायसाठी पण मंडपात जागा ठेवली नव्हती. इतका गोंधळ पुरे तर डीजे वाल्याला सुद्धा त्यातच चेव चढला. त्यानं काय केलं, सगळं संपता संपता झिंगाट वाजवलं. पुढे काय झालं असेल याची कल्पना तुमच्या आमच्यासारख्यांना न केलेली बरी. कारण लग्नाची हळद झालेली गावानं त्या दिवशी पाहिली.
बघा व्हिडीओ :