Breaking News
Home / मनोरंजन / ‘नाच रे मोरा’ फेम अभिषेकचा हळदीमधला हा नवीन डान्स होतोय वा’यरल, बघा हा व्हिडीओ

‘नाच रे मोरा’ फेम अभिषेकचा हळदीमधला हा नवीन डान्स होतोय वा’यरल, बघा हा व्हिडीओ

अभिषेक ढाळे हे नाव एव्हाना आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं झालेलं आहे. आपल्या मित्राच्या लग्नात कमाल डान्स करत त्याने धमाल उडवून दिली होती. नाच रे मोरा या गाण्यावरचा त्याचा डान्स तुफान गाजला. त्याची प्रसिद्धी एवढी झाली की पूढे पुढे अभिषेक जिथे जिथे डान्स करत राहिला त्याचे व्हिडियोज ही वायरल झाले. आपल्या टीमने ही त्यातील काही व्हिडियोज वर लेखन केललं आहेच. आज वेळ आहे एका नवीन व्हिडियो वरील लेखाची. आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडियो तीन मिनिटांचा आहे. आधीचे व्हिडियोज हे अगदी एका मिनिटापेक्षा कमी वेळ असलेले होते. तसेच यात अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे नाच रे मोरा या गाण्यावर अभिषेक याने पूर्ण वेळ डान्स केलेला आहे. त्यामुळे आधीच्या व्हिडियो च्या आठवणीही जाग्या होतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा मंडपात चार जण बसलेले असतात. तर त्यांच्या विरुद्ध बाजूला अभिषेक उभा असतो. गाणं वाजायला लागतं आणि अभिषेक नाचायला लागतो. मूळ गाण्याला डीजे स्वरूपात आपण ऐकत असतो. ही किमया डीजे सागर बार्शी यांनी साधल्याचं कळतं. डीजे बिट्स मुळे आपणही मान डुलवत आनंद घेत हा परफॉर्मन्स बघत असतो, अगदी एकरूप होऊन. सुरुवातीची जवळपास ५० सेकंद अभिषेक जेव्हा डान्स करतो तेव्हा त्याच्या पहिल्या वहिल्या वायरल व्हिडियो ची आठवण होते. तशाच स्टेप्स, डान्स करताना तोच मोकळेपणा आणि खट्याळ हावभाव आपल्याला दिसून येतो. ज्यांनी पहिला व्हिडियो वारंवार पाहिला आहे त्यांच्यासाठी ही तर अगदी पर्वणीच. मग मात्र गाण्यातील पुढील कडवी गायली जातात आणि अभिषेक च्या स्टेप्स बदलतात. पुढचं जवळपास एक मिनिटं वेगवेगळ्या स्टेप्स करत उपस्थितांना हसवण्याचं काम अभिषेक करत असतो. आपणही त्याचा डान्स बघून हसत असतो. आपल्या काही अतरंगी स्वभावाच्या मित्रांची आठवण होते. अनेकांना वायरल व्हिडियोज वर आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांची आठवण होईल यानिमित्ताने. कारण अनेक अतरंगी डान्स व्हिडियोज वर आपण याआधी लिहिलेलं आहे. असो.

इथे मात्र अभिषेक याचाच डंका वाजत असतो. आणि एक मिनिटं ४६-४७ सेकंदांच्या वेळी तो जी स्टेप करतो ती बघून तर अजून हसू येतं. अरे भाई असं कोण नाचतं का असा कौतुकमिश्रित प्रश्न आपल्या मनात येतो. दोन्ही पाय एकत्र करत इथून तिथे उडया मारण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल आपलं. तशाच या स्टेप्स असतात. पोटभरून हसवतात. मग पुन्हा मोराच्या काही स्टेप्स येतात. हात खांद्याजवळ घेत दुडक्या चालीने केलेली स्टेप खास लक्षात राहते. पुढचं मिनिटभर आपण या व्हिडियोची मस्त मजा घेतो. पहिल्यांदा पाहिलेला व्हिडियो काही सेकंदांचा होता. पण तुफान वायरल झाला. तसाच हा व्हिडियो ही वायरल होताना दिसून येतो. अभिषेक याने डान्स केलेल्या अन्य व्हिडियोज वरही आपल्या टीमने लिखाण केलेलं आहेच. कारण अभिषेक याच्या व्हिडियोज मधून प्रेक्षकांना आनंद मिळतो. तसाच आनंद आपल्या मराठी गप्पाच्या वाचकांना घेता यावा ही आमची इच्छा होती आणि आहे. आपल्या वाचकांचं मनोरंजन व्हावं हे आमच्या टीमला नेहमीच वाटत आलेलं आहे. कारण या लेखांद्वारे तुमचं मनोरंजन करावं, जेणेकरून काही क्षण का होईना तुम्हाला मजा मस्तीचे घालवता येतील ही अपेक्षा. खासकरून आजूबाजूला असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीत तरी तुमचं मन हलकं करण्यात आमची मदत व्हावी ही प्रामाणिक इच्छा. आपणही आम्हाला नेहमीच उत्तम साथ दिलेली आहे आणि यापुढेही ती द्याल ही खात्री आहे. लोभ कायम असावा.

त्याचप्रमाणे लेख संपवण्याआधी अभिषेक याचे ही आभार. त्याने अफलातून डान्स केला आणि मनं जिंकली. प्रत्येकाला काही क्षण का होईना थोडा विसावा मिळाला. या पुढेही तुझ्या मनमोकळ्या डान्स चे विविध व्हिडियोज बघायला मिळतील अशी आशा आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.