Breaking News
Home / मनोरंजन / ‘नाच रे मोरा’ फेम अभिषेकचा हा डान्ससुद्धा होतोय वायरल, बघा हा वायरल व्हिडीओ

‘नाच रे मोरा’ फेम अभिषेकचा हा डान्ससुद्धा होतोय वायरल, बघा हा वायरल व्हिडीओ

वायरल व्हिडियोज वरील लेख आणि मराठी गप्पा हे समानार्थी शब्दच झाले आहेत जणू. वायरल व्हिडियोज वर लेख लिहिणं ही मराठी गप्पाच्या टीमची आता खासियत बनली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. याचं श्रेय अर्थातच आपल्या सारख्या वाचकांना जातं. तुम्ही प्रोत्साहन आणि पाठिंबा देत असता म्हणून नवनवीन विषयांवर लिहिण्यास आमची टीम पुढाकार घेते. या सगळ्या प्रवासात आपल्या टीमने असंख्य व्हिडियोज पाहिले. पण क्वचित असं झालं की एखाद्या वायरल व्हिडियो चा दुसरा भाग आला किंवा एखाद्या वायरल व्हिडियोतील व्यक्तीचाच नवीन वायरल व्हिडियो आला आहे. पण आज असंच काहीसं क्वचित घडणारं घडलेलं आहे. आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी ‘नाचरे मोरा’ या गाण्यावरील एका तरुणाचा डान्स अतिशय प्रसिद्ध झाला होता.

त्याच तरुणाचा अजून एक डान्स खूप प्रसिद्ध झाला आहे. या वेळी या तरुणाने ‘चलाओ ना नैनो से बाण रे’ या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स केलेला आहे. म्हणजे तसा मागील वेळीही केला होता. पण त्यावेळी ज्या मित्राच्या लग्नात नाच रे मोरा वर डान्स केला, त्याच लग्नात ‘चलाओ नैनो’ वर पण डान्स केला होता. पण तेव्हा नाच रे मोरा ची हवा झाली होती. आता चलाओ नैना ची हवा झाली आहे. कारणही तसंच आहे. आपला हा भाऊ नाचतोच एव्हढा कडक आणि उत्साहात की बाकीच्यांनाही नाचावसं वाटावं. आज पाहिलेला व्हिडियो सुद्धा यास अपवाद नाही. कारण आपला भाऊ एका मंचावर उभा राहून नाचत असतो. त्याचा नाच बघून खाली उभा असलेला एक माणूस इतका उत्साहित होतो की या भावाला मिठीच मारतो. मग बाकीचे त्याला कसा बसा दूर करतात. पण आपल्या भावाचा डान्स एकदम जोरात चालू असतो. खासकरून ‘चलाओ नैनो से बाण रे’ वरील बाण मा’रण्याची स्टेप तर भाव खाऊन जाणारी.

त्या स्टेप वर खाली उभी असलेली माणसं सुद्धा जल्लोष करतात. यावरून ती स्टेप लोकांना किती आवडली असेल याचा अंदाज यावा. त्यात आपल्या या भावाचा उत्साह आणि एनर्जी एवढी की केवळ तीस सेकंदांचा व्हिडियो सुदधा आपलं मन प्रसन्न करून जातो. पुन्हा नाचरे मोरा ची आठवण जागी होते.

या आठवणी जाग्या झाल्यावर मग या भावाविषयी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून आपल्या वाचकांना त्याच्याविषयी अजून माहिती मिळावी. तर आपल्या या उत्साहाने सळसळणाऱ्या भावाचं नाव आहे अभिषेक ढाळे. अभिषेक मूळचा पंढरपूर येथील राहणारा. वडिलांची नोकरी यामुळे ढाळे कुटुंब दोन – तीन दशकांपूर्वी पुण्यात राहायला आलं. आता तर अभिषेक पक्का पुणेकर झाला आहे. त्याचं स्वतःचं सोन्याचं दुकान पुण्यात आहे. स्वभावाने मनमिळाऊ आणि लोकांमध्ये मिसळण्याची सवय असलेला अभिषेक आपल्या मित्राच्या म्हणजे विजय भोसले यांच्या लग्नात गेला होता. शाळा कोलेज पासून अभिषेक ला डान्स ची आवड आहेच. तसेच तो काहीसा अतरंगी पण मस्त डान्स करतो हे मित्रांना माहिती होतं.

त्यामुळे लग्नाच्या समारंभांतून बाहेर पडताना मित्रांनी त्याला थोडा डान्स करण्याची विनंती केली. मित्रच ते. त्यामुळे त्यांचं मन कोण मो’डणार. मग काय, गाणं सुरू झालं आणि अभिषेक आपल्या धुंदीत नाचत राहिला. ते गाणं म्हणजे ‘नाच रे मोरा’ आणि त्या पुढील इतिहास तर आपण अनुभवलाच आहे. त्या वायरल व्हिडियो नंतर ते आजतागायत अभिषेक च्या काही मुलाखती झाल्या. त्यातून हे कळून आलं. तसेच त्याचे अन्य डान्स व्हिडियो ही प्रसिद्ध झाले. पण आज पाहिलेल्या व्हिडियोने पुन्हा एकदा व्ह्यूज मध्ये करोडोंचे व्ह्यूज मिळवले आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा अभिषेक आणि त्याच्या वायरल डान्स ची आठवण झाली. आपल्या डान्स स्टेप्सने आपल्या सगळ्यांना हसायला लावणाऱ्या आणि अगदी सहज मनोरंजन करणाऱ्या अभिषेक भावाला मनापासून धन्यवाद.

आपण जसं अभिषेक च्या डान्स वर प्रेम करता तसंच प्रेम आपण मराठी गप्पाच्या लेखांवर ही करता. अनेक वेळेस आपल्या कडून मिळणाऱ्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांतून हे कळतं. आपला लोभ असाच आमच्या सोबत कायम राहू दे. आपल्या साठी खास लिहिलेल्या नवनवीन लेखांचा आनंद घ्या. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.