मराठी गप्पाच्या टीमने आपल्या भेटीसाठी वेळोवेळी वायरल व्हिडियोज वरील लेख आणले आहेत. आपल्या पैकी असंख्य वाचकांनी या लेखांना पसंती नोंदवली आहे. पण आजपर्यंत प्रत्येक वायरल व्हिडीओ हा एकेकटा असा आपल्या समोर आला होता. क्वचित असं होत असेल की एका वायरल व्हिडियोचा पुढचा भाग आपल्या भेटीस आला असेल. असंच काहीसं झालं आणि आमच्या टीमच्या हातातही तो व्हिडीओ आला. आजचा लेख त्याच्याचविषयी आहे. काही काळापूर्वी ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर तुफान डान्स करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडियो वायरल झाला होता. या वायरल व्हिडियोबद्दल आमच्या टीमने केलेल्या लेखाला आपला प्रतिसाद लाभलाच. हा प्रतिसाद ओसरतो न ओसरतो तोच, या तरुणाचा त्याच लग्नातील अजून एका डान्स चा व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला.
यातही या तरुणाने आपल्या डान्स ने जी धमाल उडवून दिली आहे त्यास तोड नाही. मागील व्हिडियोत हा तरुण ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर थिरकला होता. या व्हिडियोत तो, ‘चलाओ ना नैनो से बाण रे’ या सुप्रसिद्ध गाण्यावर थिरकला आहे. या व्हिडियोची सुरुवात होते ती हा तरुण आणि त्याचा मित्र- नवरदेव- एके उंच ठिकाणी उभे असतात. गाण्याची सुरुवात होते आणि मग या तरुणाचा भन्नाट डान्स सुरू होतो. कधी हाताने बाण मारल्यासारखं करत, तर कधी सोबतच्या नवरदेवाला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत देत त्याचा डान्स चालू असतो. खाली उभी असलेली माणसं सुदधा हा डान्स अगदी आनंदाने बघत असतात. काहींना या तरुणाचा बिनधास्तपणा आणि मनमोकळं नाचणं आवडतं. व्हिडियोच्या शेवटी शेवटी काही जण स्वतः सुद्धा या गाण्यावर थिरकायला लागतात. या संपूर्ण व्हिडियोत सोबत असलेले नवरदेव यांचं लक्ष गाण्याकडे आणि आजूबाजूला काय चाललं आहे याकडे असतंच. ते वेळोवेळी या तरुणाला काही सांगत असतात. पण भावाच्या अंगात हे गाणं एवढं भिनलेलं असतं की विचारता सोय नाही.
असं एक कडवं मिळत नाही ज्याच्यावर या आपल्या उत्साही भावाने अफलातून आणि लोकांना आवडणारे एक्सप्रेशन्स दिले नसतील. आधी सांगितल्याप्रमाणे उपस्थितांनाही एकूणच हा डान्स आवडत असल्याचं दिसतं. सरतेशेवटी मात्र गाणं थांबतं आणि नवरदेव आणि आपला उत्साही भाऊ स्टेजवरून खाली उतरतात आणि व्हिडियो संपतो.
आत्ता पर्यंत मराठी गप्पाच्या टीमने असंख्य व्हिडियोज केले आहेत. पण या तरुणाने आपल्या मनमोकळ्या डान्स ने जी धमाल उडवून दिली आणि मजा आणली ती खचितच काही व्हिडियोज मधून दिसते. असो. आपल्याला या उत्साही तरुणाचे दोन्ही डान्स वरील व्हिडियोजचे लेख आवडले असतील तर आमच्या इतर वायरल व्हिडियोज वरील लेखांना भेट द्यायला विसरू नका. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील. तसेच लेटेस्ट अ’पडेट्स साठी आमच्या वे’बसा’ईटला बु’कमार्क करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद!
बघा व्हिडीओ :