Breaking News
Home / मनोरंजन / ‘नाच रे मोरा’ फेम भाऊंचे झाले लग्न, लग्नात सुद्धा केला मोराचा अतरंगी डान्स

‘नाच रे मोरा’ फेम भाऊंचे झाले लग्न, लग्नात सुद्धा केला मोराचा अतरंगी डान्स

आपण अनेक वायरल व्हिडियोज बघत असतो. अनेकांचे विषय वेगवेगळे असतात पण बहुतेक व्हिडियोज हे आपलं मनोरंजन करणारे असतात. बरं एका दिवसात किती तरी वायरल व्हिडियोज बनत असतात. पण तरी काही व्हिडियोज मात्र आपल्याला अगदी आवडून जातात आणि कायम लक्षात राहतात. आता मागील वर्षी आलेल्या एका वायरल व्हिडियोचं उदाहरण घेऊ. या वायरल व्हिडियोने सगळीकडे अगदी धुमाकूळ घातला होता. या व्हिडियोत दिसणारी व्यक्ती पुढे अन्य व्हिडियोत ही झळकली आणि ते व्हिडियो ही वायरल करून गेली. इतकंच काय तर अनेक प्रथितयश वृत्तसंस्थांनी त्यांच्या मुलाखती ही घेतल्या होत्या.

या सगळ्यासाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचं नाव होतं, अभिषेक ढाळे आणि त्याने केलेला डान्स वायरल झाला होता. एका मित्राच्या लग्नात वरात निघाली असताना अभिषेक भाऊंनी जबरदस्त डान्स केला होता. ते ही ‘नाचरे मोरा’ या गाण्यावर ! आता तुम्हाला आठवण झाली असेलच. होय, त्याच तुफान डान्सची ! या डान्सचे तुम्ही आणि आम्ही सगळे फॅन झालो होतो.

आमच्या टीमने तर या व्हिडियोवर आधारित लेखही लिहिले होते. तसेच पुढील काळात अभिषेक यांनी केलेल्या अफलातून डान्सवरही आमच्या टीमने लिखाण केलं होतंच. कारण अभिषेक जेव्हा केव्हा नाचत होते, तेव्हा अगदी मनापासून नाचत होते. जे त्यांना त्या क्षणी वाटत असे, ते त्यांच्या डान्समध्ये दिसत असे. नाच रे मोरा वर त्यांनी हाताचा पिसारा करून केलेली स्टेप त्यातूनच आली असणार हे नक्की. असा मोकळेपणाने एरवी अभावानेच बघायला मिळतो. त्यातूनच हा व्हिडियो एवढा वायरल झाला होता. आणि आज वर्षभराने आज पुन्हा या डान्सची आठवण झाली आहे. कारण, अभिषेक यांनी पुन्हा हा डान्स केला आहे आणि तोही एका लग्नात ! अहो कोणाच्या काय, स्वतःच्या लग्नात ! होय, अभिषेक हे आता विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांचाच एक व्हिडियो आज आमच्या बघण्यात आला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला अभिषेक हे एके ठिकाणी उभे असलेले दिसतात. सोबत वऱ्हाडी मंडळी असतात. त्यांच्या मित्राच्या लग्नात असतात, त्याप्रमाणे इथेही गोलाकार आकारात उभे असतात. तसेच यंदाही सगळं लक्ष अभिषेक यांच्यावर असतं.

पुन्हा तेच गाणं वाजतं आणि तसाच डान्सही होतो. यावेळी मात्र डान्स करताना त्यांची ऊर्जा जेमतेम जाणवते. कदाचित लग्न कार्यातील सततच्या धावपळीमुळे असेल वा आजूबाजूच्या कडकडीत उन्हामुळे असेल वा अगदी परिधान केलेल्या पोशाखामुळे असेल. कारण काही असलं तरी आज त्यांचा हा डान्स आधी सारखा होत नाही. पण आनंद एवढाच असतो की हा डान्स पुन्हा बघायला मिळतो. कारण त्यातील स्टेप्स या तशाच असतात. तीस सेकंदांचा व्हिडियो असला तरी आनंद देऊन जातो आणि पुन्हा जुन्या व्हिडियोच्या आठवणी ताज्या करून जातो. आमच्या टीमला त्यांचा आधीच्या डान्सचा आणि या डान्सचा व्हिडियो ही आवडला. त्यातूनच हा लेख लिहिला गेलेला आहे. तसेच या लेखाच्या निमित्ताने अभिषेक यांना त्यांच्या पूढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपलं यापुढील आयुष्य सुखाचं असावं हीच सदिच्छा!

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.