बॉलिवूडशिवाय साऊथच्या म्हणजेच दाक्षिणात्य गाण्यांचं वेड देशासह जगभरात आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचे जगभरात चाहते असले तरीही जवळपास त्याच तुलनेत साऊथचे गाणेही जगभरात व्हायरल होत असतात. बॉलिवूड गाण्यांवर अगदी भारतीय असो वा परदेशी कुणीही नाचल्याशिवाय शांत बसू शकत नाही. अगदी तीच परिस्थिती साऊथच्या गाण्याबाबत आहे, कुठल्याही देशात गेले आणि तिथे साऊथची गाणी माहिती नसतील, असे होत नाही. आपल्याकडे आता बहुतांश भागात मराठी डीजे गाण्यावर नाचलं जातं. मात्र याआधी जेव्हा बँड हा प्रकार काहीसा मागे पडून डीजे या प्रकाराची एन्ट्री झाली होती, तेव्हा लग्न समारंभामध्ये साऊथ किंवा पंजाबी गाण्यांची चलती होती आणि या गाण्यांवर नाचण्याची मजा काही वेगळीच असायची. आता साऊथच्या गाण्याचं वेड केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. अनेक वेळी परदेशी लोक साऊथ गाण्यांची मजा घेत त्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतात.
गेल्या काही वर्षांपासून बँडबाजाची जागा डी.जे. या आधुनिक वाद्याने घेतली आहे. आजकाल एकही लग्न समारंभ डी. जे. शिवाय होत नाही. ही प्रथा गेल्या 10-12 वर्षांपासून सुरू झाली आहे. वर पक्षाचा सर्वात पहिला खर्च म्हणजे डी.जे. चाच होता. यासाठी दहा हजारांपासून ते एक लाख रुपयापर्यंत किंमत मोजावी लागत होती. पण महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा डीजे नवीन होते तेव्हा साऊथ आणि पंजाबी गाणी फुल चालायची. आ अंटे आम्लपुरा, अपुडी पोडे पोडे… अशी साऊथ गाणी तर ‘काला कव्वा काट खायेगा’ अशी टाइपची पंजाबी गाणी चालायची. आणि आता असाच एक जुना व्हायरल व्हिडीओ आमच्यापर्यंत आला आहे. ज्यावर काही डान्सर मंडळींनी असा काही डान्स केला आहे, ते पाहून तुमच्यातही बळ येईल आणि तुम्हीही लगेच गाणे लावून नाचायला सुरुवात कराल. आयुष्य नेहमीच गंभीर आणि रडत जगण्याची गोष्ट नाहीये राव… आयुष्य आनंदाने आपल्या कामात आवडीने आणि उत्साहाने जगण्याची गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून एक जबरदस्त डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा डान्स व्हिडीओ जुना आहे परंतु नव्याने व्हायरल होत आहे. या डान्स परफॉर्मन्समुळे अनेकांचे मन प्रफुल्लीत झाले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या डान्सला इतकी पसंती दिली की, ते या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहे.
या व्हिडीओत काही मुले आणि मुली डान्स करत आहेत. अपुडी पोडे पोडे या जुन्या प्रसिद्ध साऊथ गाण्यावर त्यांनी केलेला हा डान्स एकेकाळी मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींकडे ब्लुटूथ ने शेअर केला जायचा. इतका जुना हा व्हिडीओ आहे. या गाण्यात वेगळं काय आहे, हे समजून घ्यायचा असेल तर तुम्ही 90 च्या दशकांत जन्मलेले असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या काळचे असाल तर अजून जास्त रिलेट करू शकाल.
तर विषय असाय भावांनो… या व्हिडीओत या पोरा पोरींनी एवढया ऊर्जेने आणि उत्साहाने डान्स केला आहे, ते पाहून आपल्याही मनात एनर्जी निर्माण होते. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :