Breaking News
Home / मनोरंजन / नाशिकची हि मुलगी आहे तरी कोण, अवघ्या काही दिवसांत मिळाले ३३ मिलियन्स व्ह्यूज

नाशिकची हि मुलगी आहे तरी कोण, अवघ्या काही दिवसांत मिळाले ३३ मिलियन्स व्ह्यूज

लहान मुलांचे गोड, गंमतीशीर व्हिडियोज किती मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात आणि वायरल होतात हे आपण पाहिलं आहेच. मराठी गप्पाने गेल्या काही काळात सातत्याने या व्हिडियोज बद्दलची माहिती आपल्यासमोर आणली आहे. यातील काही व्हिडियोज हे जुने तर काही नवीन होते. याच काळात अजून एक व्हिडीओ लोकप्रिय होत होता. सध्या नाशिकच्या एका मुलीचा व्हिडीओ खूप वायरल होत आहेत. तिच्या व्हिडीओजना अवघ्या काही दिवसांत ३३ मिलियन्सच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. तो व्हिडीओ आहे ‘अगर तुम साथ हो’ या गाण्यावर भन्नाट अभिनय करणाऱ्या एका मुलीचा. पण इतर व्हिडियोज आणि या व्हिडिओतील फरक म्हणजे बाकीचे व्हिडियोज हे बहुतांश एकदाच चित्रित झालेले होते. या व्हिडिओत जी छोटी मुलगी आहे, तिचं स्वतःचं असं सोशल मीडिया चॅनेल आहे.

एवढंच नव्हे तर वर उल्लेख केलेल्या तिच्या व्हिडियोला आजतागायत २६ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच तिचे बाकीचे व्हिडियोज ही लाखा लाखांचे लाईक्स जमा करताहेत. यावरून त्या मुलीच्या उत्तम अभिनयाची खात्री पटावी. पण ही मुलगी आहे तरी कोण? तर या मुलीचं नाव आहे शिवांजली पोरजे. शिवांजली मुळची नाशिकची आहे. तिचा मोठा भाऊ प्रतीक याने शिवांजली हिची गाण्यावर अभिनय करण्याची आवड हेरली. त्याने तिचे हे व्हिडियोज करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचं हे पाऊल यशस्वी ठरलं. आज शिवांजली ही सोशल मिडियावरती आणि अगदी सेलिब्रिटीज मध्येही चर्चेचा विषय ठरली आहे. काही युट्युब चॅनेल्स च्या मतानुसार अनेक सेलिब्रिटीजनी शिवांजली हिच्या अभिनयाचं कौतुक केलेलं आहे. पण गंमतीचा भाग असा की शिवांजली प्रसिद्ध होत होती, हे तिच्या आई वडिलांना अंमळ उशिरा कळलं. पण जेव्हा कळलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला.

सध्या सोशल मिडियावरती कौतुकाचा विषय ठरलेली शिवांजली आणि तिचं कुटुंब लोकांचं मिळत असलेलं प्रेम अनुभवत आहेत. शिवांजली हिच्या कलाकृतींना प्रेक्षक प्रेम मिळत राहो हीच मराठी गप्पाच्या टीमची शुभेच्छा ! आम्ही शिवांजलीचा व्हिडीओ खाली शेअर करत आहोत, तुम्ही नक्की पहा. आपल्याला लहान मुलांचे वायरल व्हिडियोज आणि इतर वायरल व्हिडियोज बद्दल वाचायचं असेल तर वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील. धन्यवाद !

बघा व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *