Breaking News
Home / मराठी तडका / निशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी

निशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी

मनोरंजन क्षेत्रात असो वा त्या परिघाबाहेर. अनेक जोड्या आपण बनताना आणि बिघडताना पाहतो. पण काही जोड्या एकत्र येतात आणि कायमस्वरूपी एकत्र राहतात. त्यांच्या मधली केमिस्ट्री सदैव ताजी असल्याचं पहायला मिळत. एकमेकांविषयी असलेला आदर हा यातला सगळ्यात मोठा आधारस्तंभ. आज आपण अशाच एका जोडीविषयी जाणून घेणार आहोत. हे गोड जोडपं आहे, डॉ. निशिगंधा वाड आणि दिपकजी देऊळकर यांचं. आपण दोघांना ओळखतो ते ‘घर संसार’ या सुप्रसिद्ध सिनेमासाठी. तसचं दोघांनीही अनेक हिंदी मराठी मालिका-सिनेमांमध्ये कामे केली आहेतच. दिपकजी प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या बलराम या कृष्णा या मालिकेतील ऐतिहासिक व्यक्तिरेखेसाठी. त्यांना आपण महादेव ठाकूर या ‘लेक लाडकी या घरची’ मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी सुद्धा त्यांना ओळखतो. तर निशिगंधाजी प्रसिद्ध आहेत त्या ‘शेजारी शेजारी’, ‘रेस ३’ मधील सुमित्रा, ‘बंधन’ या सिनेमांसाठी. त्यांनी जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. त्तात्याराव लहाने यांच्यावरील सिनेमात महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे.

तर मनोरंजन क्षेत्राशी एवढं घट्ट नातं असणारं हे जोडपं पहिल्यांदा भेटलं आणि त्यांच्या नंतर दोन मजेशीर किस्से घडले. त्यांची भेट झाली ती एका साबणाच्या जाहिरातीसाठी. दिपकजींच्या शब्दात सांगायचं तर निशिगंधाजींना पाहताचक्षणी त्यांना वाटलं हीच ती मुलगी जी आपल्या आयुष्याची जोडीदार होऊ शकते. शुटींग संपल्यावर एकदा दिपकजींनी निशिगंधाजींना फोन केला होता. समोरून निशिगंधा आहेत असं समजून ते नेहमीच्या मोकळ्या स्वभावाने फोन वर बोलले. थोड्या वेळाने समोरील व्यक्तीने निशिगंधाजींना फोन देऊ केला तेव्हा दिपकजींना हसू आवरत न्हवतं कारण आवाज सेम असल्यामुळे ते निशिगंधाजींच्या आई म्हणजेच डॉ. विजया वाड यांच्याशी बोलत होते. हळू हळू निशिगंधाजींना दीपकजींच्या मनातल्या भावना जाणवत होत्या आणि दुसरा किस्सा घडला. तो असा, कि निशिगंधाजींना दिपकजींचा फोन आला.

बाहेर देवळात भेटायचं असं ठरलं. पण निशिगंधाजींच्या आज्जी हे संभाषण ऐकत होत्या. त्यांनी काय चालू आहे असं विचारलं. निशिगंधाजींनी सांगितलं दिपकजींच्या मनात कदाचित त्यांना लग्नाबद्दल विचारायचं असावं. आज्जींनी थेट निशिगंधाजींना सांगितलं कि, दिपकजींना घरी घेऊन ये बाहेर कशाला तेवढ्यासाठी. पुढे दिपकजींनी आपल्या मनातल्या भावना मनमोकळ्या पणाने व्यक्त केल्या. निशिगंधाजींना कल्पना आली होतीच. त्यांनी होकार दिला, पण त्यांना स्वतःच शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यामुळे तीन वर्षांनी या दोघांनी लग्न केलं. आज त्यांना ईश्वरी नावाची मुलगी आहे. स्वतःच्या करियरमध्ये पुढे जाता जाता एकमेकांनाही तेवढीच भक्कम साथ देत देत त्यांची वाटचाल आजही सुरु आहे. दोघांनी अनेक कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं आहे. तसचं अभिनयाव्यतिरिक्तहि इतर क्षेत्रात ते मुशाफिरी करत असतातच.

निशिगंधाजी या आपल्या आईप्रमाणेच सिद्धहस्त लेखिका असून त्यांनी पाच पुस्तके प्रकाशित केली आहे. स्त्रियांचा समाजातील बदलता सहभाग – नाट्य क्षेत्राच्या अनुषंगाने या विषयावर त्यांनी स्वतःची डॉक्टरेट केली पूर्ण केली आहे. दीपकजी हे निर्माते म्हणून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेतच. त्यांनी गेल्याच वर्षी ‘श्री गुरुदेव दत्त’ या दत्त गुरूंवरच्या मालिकेची निर्मिती केली. तसेच त्या आधीपासून संगीत मराठी या संगीताला वाहिलेल्या चॅनेलची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अभिनय, आपल्या आवडी निवडी आणि संसार अश्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. पण योग्य जोडीदार असेल तर हा प्रवास सुखकर होतो. एकमेकांना सतत भक्कम साथ देणाऱ्या आणि प्रेक्षकांना सदैव आनंद देणाऱ्या या जोडीला पुढील प्रवासासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा!
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *