Breaking News
Home / मनोरंजन / नीता ह्यांनी ह्या एका अटीवर केले होते मुकेश अंबानी ह्यांच्याशी लग्न

नीता ह्यांनी ह्या एका अटीवर केले होते मुकेश अंबानी ह्यांच्याशी लग्न

नीता अंबानींना आजच्या घडीला कोण ओळखत नाही? ह्या गोष्टीत काहीच शंका नाही कि त्या एक लोकप्रिय व्यक्ती आहेत आणि त्यांच्या समोर मोठे मोठे बिजनेस परिवार सुद्धा छोटे वाटतात. परंतु हे सर्व लग्नानंतर झाले आहे, लग्नाअगोदर तर त्या एक सामान्या व्यक्ती होत्या, आजच्यासारखी कोणी सेलिब्रेटी नव्हत्या. भारतातील सर्वात श्रीमंत घरातील सून असलेल्या नीता अंबानी आपल्या लाइफस्टाइल बद्दल नेहमीच चर्चेत असतात. आजकाल सोशिअल मीडियावर त्यांच्या महाग साडी पासून ते स्पेशिअल चहा बद्दल खूप चर्चा रंगल्या. परंतु तुम्हांला माहिती आहे का, आजच्या जमान्यात भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली महिला म्हणून ओळख असणाऱ्या नीता अंबानी लग्नाच्या अगोदर फक्त ८०० रुपयाची नोकरी करत होत्या. आणि ह्यापेक्षा सुद्धा रंगतदार आहे मुकेश अंबानी आणि नीता ह्यांच्या लग्नाची कहाणी. खरंतर जेव्हा धीरूभाई अंबानी आपला मोठा मुलगा मुकेश अंबानींच्या लग्नाचे नातं नितासमोर ठेवले तेव्हा सामान्य घरात वाढलेल्या नीताने लग्नासाठी एक मोठी अट ठेवली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कोणत्या अटीवर नीता आणि मुकेश अंबानींचे नाते जुळले.


लग्ना अगोदर त्या कोणी मोठ्या सेलिब्रेटी नव्हत्या, तर त्या फक्त शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका होत्या आणि त्यांना ह्या कामाचे ८०० रुपये प्रति महिना पगार मिळत होता, जे अंबानी परिवाराच्या दृष्टीने लाखों पटीने कमी होती. पण असं म्हणतात ना, नशिबात जे लिहिलं असतं ते होऊनच जातं. तसंच काहीसं नीता अंबानींच्या आयुष्यात घडलं.

धीरूभाईंनी स्वतः पसंद केले होते नीताला सुनेच्या रूपात :

बोलतात ना जोडी स्वर्गात बनतात असाच काहीसं नीता आणि मुकेश ह्यांच्या जीवनात घडलं. सामान्य कुटुंबातील नीता धीरुभाई अंबानींच्या घरची सून बनण्याची कहाणी खूप रंगतदार आहे. खरंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक धीरूभाई अंबानी ने स्वतः नीताला एका समारंभात पाहून आपली सून बनवायचा विचार केला. घडलं असं होतं कि, त्या वेळी नीता चे वडील बीडला ग्रुप मध्ये काम करत होते. ह्या दरम्यान बीडला परिवाराने एक मोठा समारंभ आयोजित केला होता. ज्यात नीता अंबानीने भरतनाट्यावर एक छानसं नृत्य केले होते आणि त्या नृत्याची खूप स्तुती सुद्धा झाली आणि लोकं टाळ्या वाजवत होते. त्या गर्दीत धीरूभाई अंबानी सुद्धा होते. नीताचे नृत्य पाहून धीरुभाई अंबानी खूप प्रभावित झाले आणि त्यांनी नीताला आपली सून बनवायचे मनामध्ये ठरवले. जेव्हा त्यांनी नीताला पाहिले तेव्हा त्यांनी तिला आपल्या सुनेच्या स्वरूपात पसंद केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून नीताचा पत्ता आणि फोन नंबर घेऊन स्वतःच संपर्क सुद्धा केला.

धीरूभाईंच्या प्रस्तावाला विनोद समजली होती नीता :
ह्यानंतर त्यांनी नीता ला फोन केले आणि फोन करून सांगितले कि, “मी धीरु भाई अंबानी बोलतोय” हे ऐकताच नीता ने सुद्धा “मी एलिझाबेथ टेलर बोलते आहे” असे सांगून फोन कट केला. ह्यानंतर दुसऱ्यांदा धीरूभाईंनी फोन केले तेव्हा नीताच्या वडिलांनी फोन उचलला ज्यांनी धीरु भाईंचा आवाज ओळखला आणि सर्व बोलणं ऐकल्यानंतर नीताच्या वडिलांनी नीताला सांगितले कि धीरुभाई शी जाऊन भेट. हा, नंतर नीताला थोडे समजवायला लागले, नंतर तिने सुद्धा होकार दिला. आणि वडिलांनी थोडं मनवल्यानंतर नीता धीरूभाईंना भेटायला तयार झाली. नीता धीरूभाईना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेली जिथे त्यांनी नीताला जेवण बनवणे, तिच्या आवडीनिवडी, शिक्षण सोबत बऱ्याच गोष्टींबद्दल विचारले. ह्यानंतर धीरूभाईनी त्यांना आपल्या घरी आमंत्रण दिले आणि सोबत धीरूभाईनी स्पष्ट सांगितले कि ते नीताला मुकेशच्या पत्नीच्या स्वरूपात पाहत आहेत.

अशी भेट झाली होती नीता आणि मुकेशची :
धीरूभाईंच्या प्रस्तावाबद्दल त्यांच्या परिवारासोबत चर्चा केल्यानंतर नीता धीरूभाईंच्या घरी गेली. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा मुकेश ने घराचा दरवाजा उघडला. मुकेश ने नीताला पाहिल्यावरच ओळखलं कारण धीरूभाई सारखं सारखं तिच्याबद्दल सांगत होते. मग तिथे मुकेश आणि नीताची एकमेकांसोबत बोलणं झालं आणि मग पुढे भेटण्याचा कार्यक्रम ठरला.

लग्न करण्याअगोदर नीताने मुकेशसमोर हि अट ठेवली होती :
मग मुकेश आणि नीता दोघेही एकमेकांसोबत फिरू लागले. काहीच दिवसात दोघे एकमेकांना डेट करू लागले. पण जेव्हा मुकेश अंबानीने नीता समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा नीता ने एक अट समोर ठेवली. आणि ती हि होती कि लग्नानंतर देशाच्या सर्वात श्रीमंत कुटुंबाची सून बनल्यानंतरसुद्धा तिला एक सामान्य जीवन जगायचे आहे आणि शिक्षिकेची नोकरी करायची आहे. कारण तिला मुलांना शिकवायला खूप आवडत होते. ज्यामुळे त्यांनी मुकेश अंबानी समोर लग्नानंतर सुद्धा शाळेत काम करण्याची अट ठेवली. नीताने अट ठेवली कि, “मी जरी मोठ्या घराची सून बनली तरी मी टिचिंगची नोकरी नाही सोडणार. मला शिकवायला खूप आवडते आणि मला हे काम पुढे चालू ठेवायचे आहे.” आणि मुकेश ला नीता पसंदच होती. म्हणून त्यांनीसुद्धा नीताची हि अजब अट ताबडतोब मान्य केली. आणि त्यांनी नीताला शिकवायची परमिशन दिली. आणि ह्याच अटीसोबत नीता आणि मुकेशचं नात्याचं लग्नात रूपांतर झालं. जे आज सुद्धा एक पावरफुल कपल च्या स्वरूपात ओळखले जात आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *