Breaking News
Home / मनोरंजन / नेमक्या जेवते वेळीच मुलाला आली जोराची झोप, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

नेमक्या जेवते वेळीच मुलाला आली जोराची झोप, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलं म्हणजे प्रसन्न, आनंदी वातावरण हे एक समीकरण आपल्या डोक्यात पक्कं झालेलं आहे. त्यांना इंग्रजी भाषेत ‘Bundle Of Joy’ म्हणतात ते उगीच नाही. त्यांचा निरागस सहवास आपला थकवा कुठच्या कुठं दूर करून टाकतो. म्हणूनच की काय वायरल व्हिडियोजच्या जगात लहान मुलांचे व्हिडियोज जास्त वायरल होत असावेत. त्यांच्या बाललीला पाहताना आपण नकळत सुखावतो. तसेच अनेक वेळा या बाललीला आपल्याला खदखदून हसवतात तर कधी कधी त्यांची कीव येते. असाच एक वायरल व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. त्यातील लहान बाळूची गंमत ही वाटते आणि कीव सुदधा येते.

हा व्हिडियो आहे दक्षिण भारतातील. या व्हिडियोत आपल्याला दिसून येतो तो एक बाळू. त्याचं निरागस रूप पाहून त्याला बाळू म्हणावं असं वाटलं म्हणून बाळू. त्याचं खरं नाव माहीत नाही. बरं आपला हा बाळू असतो काहीसा झोपेत. पण त्याला झोप पण कधी येत असते ? तर अगदी जेवायच्या वेळेला. म्हणजे अगदी शेवटचे काही घास उरले असताना आपले बाळू साहेब डुलत असतात. त्यांचं जबरदस्त जागरण झालेलं दिसत असतं. पहिल्यांदा त्यांचा झोका जातो तो त्याच्या डावीकडे. पण हा झोका काहीसा हलका असतो.

पण मग तो त्यातून काहीसा सावरतो. पण मग झोपेमुळे पुन्हा झोका जातो तो त्याच्या उजवीकडे. हा झोका मात्र बऱ्यापैकी मोठा असतो. त्यामुळे बाळूचे डोळे अगदी मोठ्ठाले होतात. झोप उडते आहे असं वाटत असताना निद्रादेवी पुन्हा त्याला झोपेच्या आधीन करते. हातातलं ताट आणि त्यातला दूध भात तसाच असतो. डावीकडे, मग उजवीकडे झोका दिल्यावर आपणच अंदाज बांधतो, की आता याचा पुढे झोका जाईल बहुतेक. अर्थात तो पडू नये ही इच्छा असते. होतंही तसं. त्याचं शरीर पुढे झुकतं खरं, पण त्याला अजूनही अर्धवट जागेपणाची जाणीव असते. त्यामुळे सावरला जातो. त्याचं ते निरागस रूप पाहून काहीसं हसू येतं पण तेवढ्यात या बाळूचा असा काही तोल जातो की हातातल्या ताटासकट तो डाव्या बाजूला पडतो. सुदैवाने काही लागत नाही त्याला, पण हातातील ताट मात्र विखुरत. त्यामुळे जमिनीवर सगळी शितं पडतात. तसेच आतापर्यंत व्हिडियो रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचा चुकचुकण्याचा आवाजही येतो आणि व्हिडियो संपतो. जवळपास चाळीस सेकंदांचा पेक्षाही कमी कालावधीचा हा व्हिडियो आहे. पण त्यातून जो बाळू आपल्याला भेटतो त्यामुळे हा व्हिडियो पुन्हा एकदा बघण्याचा मोह होतोच. बरं त्याचं डावीकडे, मग उजवीकडे आणि मग सरळ झुकणं चमत्कारिक ही वाटतं.

अगदी ठरावल्यागत वाटत असलं तरी ते सहज झालं असावं. पण त्याचा तो गोड चेहरा जेव्हा जेव्हा कावरा बावरा होतो तेव्हा त्याची काहीशी कीव ही वाटते. असो. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार यात शंका नाही. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून सांगायला विसरु नका.

सोबत आपल्या टीमने यावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असावा अशी अपेक्षा आहे. वाचकांना जे जे विषय आवडतात त्याविषयी सातत्याने लिहावं याकडे आमचा कटाक्ष असतो. त्यासाठी तुम्ही केलेल्या सकारात्मक सूचना आणि प्रोत्साहनपर कमेंट्स मदतशीर ठरतात. तसेच नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह दुणावतो ते वेगळंच. तेव्हा आपला आणि आपल्या टीमचा हा स्नेह यापुढेही वाढत राहू दे हीच सदिच्छा. आपला वाचक म्हणून आमच्या टीमवर असलेला लोभ कायम असू द्या. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.