Breaking News
Home / जरा हटके / नेहमी सतर्क राहा, कधी काय होईल सांगता येत नाही, बघा हा व्हिडीओ

नेहमी सतर्क राहा, कधी काय होईल सांगता येत नाही, बघा हा व्हिडीओ

‘जाको राखे सैयां मार सके ना कोई’ ही म्हण तुम्ही यापूर्वी टीव्ही, सिनेमा, कुठे ना कुठे ऐकलीच असेल. जर तूमचे बहुभाषिक मित्र असतील तर त्यांच्या तोंडून नक्कीच ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे कारण आजच्या या व्हायरल व्हिडीओत एकदम जबरदस्त विषय आहे. ‘देव तारी त्याला कोन मारी’ अगदी अशीच गत या व्हिडीओत एका व्यक्तीची झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘देव तारी त्याला कोन मारी’ ही म्हण खऱ्या अर्थाने साकार झालेली दिसते.

आता या व्हिडीओत एक अपघा’त घडला आहे, सुदैवाने यात कुठलीही जीवितहा’नी झालेली नाही. या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, एक गाडी भरधाव असते आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती एका दुकानात जाऊन धडकते. आता गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा वेग प्रचंड असतो. मुळातच गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला व्यवस्थित गाडी येत नसल्याने सगळाच कन्ट्रोल सुटलेला असतो. भर रस्त्यात ही गाडी असते आणि शेजारी असलेल्या दुकानात घुसते.

दुकानाच्या बाहेर बसलेला व्यक्ती गाडी आपल्या दिशेने आली असल्याचे बघतो आणि झटकन उठतो. जर त्याच क्षणाला तो उठला नसता किंवा त्याचे कामात, मोबाईल मध्ये खुप लक्ष असते तर त्याचे गाडीकडे दुर्लक्ष झाले असते. परिणामी गाडीने त्याचा कार्यक्रम केला असता. पण सावधान असल्याने तो बाजूला झाला आणि क्षणात स्वतःचा जीव वाचवला.

या व्हिडीओमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला दिसून येईल. ते म्हणजे कार दुकानात घुसली आहे, दुकानाचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कारच्या बोनेट भागाचा अगदी सुपडा साफ झाला, मात्र गाडी चालवणाऱ्या चालकाला एक ओरखडाही आला नाही. चालक आणि काम करत असलेला व्यक्तीला कुठलीही हानी पोहोचलेली नाही. यानंतर मात्र हा चालक कधी गाडी चालवण्याची हिम्मत करणार नाही.

थोर-मोठी माणसं बोलून गेलेली आहेत की, ज्या गोष्टीतील आपल्याला काही कळत नाही, त्यातलं काही बोलू नये. तसेच जर एखाद्या गोष्ट आपल्याला पूर्ण ज्ञात असेल तरच प्रयोग करावा. अन्यथा अपघा’त अटळ…

तुम्हीही असले अतरंगी प्रयोग करताना जपून करत जा. म्हणजेच गाडी शिकताना मोकळ्या भागात आणि शिस्त असणाऱ्या लोकांकडून शिका, जेणेकरून आपल्यामुळे कुणाचा जीव जाणार नाही. किंवा कुणाला आयुष्यभर एखादा अवयव गमावून बसावं लागणार नाही. आता हा व्हिडीओ बघा, जो या अपघा’तातुन एक क्षणात वाचला त्याच्या भावना समजून घ्या. त्याच्याजागी आपण असतो तर… ही कल्पना करून बघा.

या भीषण अपघा’ताचा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, ‘यमराज आज रजेवर गेल्याचे दिसत आहे.’ या संपूर्ण अपघा’ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतका भयानक आहे की त्याला आतापर्यंत जवळपास कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *