Breaking News
Home / मराठी तडका / नेहा पेंडसेची जीवनकहाणी, बघा खऱ्या जीवनात कशी आहे नेहा, बहीण सुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री

नेहा पेंडसेची जीवनकहाणी, बघा खऱ्या जीवनात कशी आहे नेहा, बहीण सुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री

हा लेख लिहिला जातो आहे तो फादर्स डे च्या पूर्वसंध्येला. २०२१ चा २० जुनचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील बाबा या पहिल्या वहिल्या सुपरहिरो विषयी कृतज्ञता व्यक्त करेलच. या दिवशी एक गाणं आपण सगळेच जण नक्की ऐकू. हे गाणं म्हणजे येत्या काळात रिलीज होणाऱ्या जून चित्रपटातलं ‘बाबा’ हे गाणं. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापुरकर आणि निखिल महाजन यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट. बऱ्याच दिवसांनी मराठी सिनेमा आणि ते ही तगड्या स्टार कास्ट सकट बघायला मिळणार आहे. या स्टारकास्ट मधील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री नेहा पेंडसे पुन्हा रुपेरी पडद्यावर बऱ्याच काळानंतर दिसून येतील. मधल्या काळात हिंदी मालिकांतून त्या आपल्याला भेटत आल्या होत्याच आणि त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना आवडल्या होत्या. त्यामुळे अशी ही लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा मराठी सिनेमातून दिसते आहे याचा आपण चाहत्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. आजच्या या लेखानिमित्ताने आपल्या या लाडक्या अभिनेत्रीविषयी आपल्या वाचकांना थोडक्यात माहिती देण्याचा आपल्या टीमचा हा प्रयत्न.

नेहा यांना लहानपणापासून अभिनयाची, नृत्याची आवड होती. त्यात उत्तम गती ही होती. त्यांच्या या कलागुणांना वाव मिळाला तो त्यांनी या काळात केलेल्या काही कलाकृतींतून. या काळात त्यांनी कॅप्टन हाऊस, प्यार कोई खेल नहीं, हंसरतें, पडोसन सारख्या काही मालिका केल्या. या प्रवासात एक कलाकार म्हणून त्या घडत होत्या आणि अभिनय कलेचे नवनवीन अनुभव घेत होत्या. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुढे ज्या ज्या कलाकृतींतून काम केलं त्या त्या कलाकृतीत लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांची नटसम्राट, बाळकडू यासारख्या बायोपिक असणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांतील भूमिका आठवून बघा. तसेच ३५% काठावर पास, प्रेमासाठी कमिंग सून या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतील भूमिका आठवून बघा. प्रत्येक भूमिकेतून नेहा जी आपल्याला उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसतात. अर्थात हे तर केवळ मराठी सिनेमांच्या बाबतीत झालं. मराठी मालिकांतील त्यांच्या भूमिका ही गाजल्या आहेतच. त्यांची सगळ्यांत जास्त गाजलेली मराठी मालिका म्हणजे भाग्यलक्ष्मी. या मालिकेतील त्यांची काशी ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली.

यासोबतच त्या पिंपळपान या गाजलेल्या मालिकेचाही त्या भाग होत्या. नेहा यांनी मराठी सोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्येही अभिनय केलेला आहे. हिंदीतील काही मालिकांचा वर उल्लेख झालाच. त्याचप्रमाणे नेहा या हिंदीतील बिग बॉस या रियालिटी शोच्या बाराव्या सिझनचा भाग होत्या. सोंथम, इन्स्पेक्टर झान्सी, विधी राउडी, ट्विनकल ट्विनकल लिटिल स्टार, स्नेक अँड लॅडर या दाक्षिणत्य कलाकृतींचाही त्या भाग होत्या. नेहा या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आहेत हे काही वेगळे सांगणे न लगे. त्यांचा एका पेक्षा एक मधील अनेक डान्स परफॉर्मन्स आपल्याला आठवत असतीलच.

नेहा यांच्या प्रमाणेच त्यांच्या मोठी बहीण मीनल यासुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. मीनल या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्यांचा ऍस्ट्रोलॉजी विषयाकडे ही ओढा असलेला दिसून येतो. गेल्या काही वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याआधी मीनल यांनी बिनधास्त, आधारस्तंभ या गाजलेल्या मराठी चित्रपटांतून अभिनय केलेला आहे. तसेच अनेक हिंदी मालिकांतूनही त्यांनी अभिनय केलेला आहेच. अमिता का अमित, किस देश मैं है मेरा दिल, बंधन या त्यांच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक.

नेहा यांच्या नजीकच्या काळातील हिंदी मालिकांतील गाजलेल्या भूमिका म्हणजे भाभीजी घर पे है मधील अनिता विभूती नारायण मिश्रा, तसेच मे आय कमीन मॅडम मधील संजना. यातील अनिता विभूती मिश्रा ही व्यक्तिरेखा तर अगदी अलीकडची. पण तरिही अल्पावधीत या भूमिकेने प्रेक्षकमनावर राज्य काबीज केलं आहे. नेहा यांच्या येत्या काळातील भूमिकाही प्रेक्षकपसंतीस उतरतील यात शंका नाही. खासकरून त्यांची जून या चित्रपटात असलेल्या भूमिकेविषयी आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहेच. त्यांचा या चित्रपटाच्या ट्रेलर मधील वावर उत्कंठा वाढवणारा आहे. त्यातही एका सिनमध्ये किरण करमरकर यांच्या व्यक्तिरेखेस जेव्हा नेहा बँकेत भेटायला येतात तो सिन तर अप्रतिम वाटतो. अशाच उत्तमोत्तम सीन्स नी भरलेला असा हा सिनेमा मनोरंजक आणि डोक्याला चालना देणारा असेल हे नक्की. तसेच यात नेहा यांना अभिनय करताना अनुभवण्याची पर्वणी आहेच. यानिमित्ताने नेहा यांना त्यांच्या नवीन सिनेमासाठी आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आमच्या मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !! तसेच ‘जून’ चित्रपटाच्या टीमलाही मनःपूर्वक शुभेच्छा !!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.