बक्कळ पैका कमावयचा आणि गावाकडं रिटायरमेंटनंतर जाऊन मस्त निवांत रहायचं. असलं सपान पाहणारी तुमच्या आमच्या सारखीचं. पण काही बेनी ही स्वतःला ओव्हरस्मार्ट समजू लागतात ना तेव्हा खरी फजिती होते. याबद्दलच तुम्हाला माहिती करुन देणारा हा व्हीडिओ… शेती येड्या गबाळ्याचं काम न्हाय आधीच सांगून ठेवतो. फावल्या वेळात करायला जातात ती शेती कधीच नसतेयं. बघा. शेती टायमिंगला, सिझनला आणि जमिनीच्या गरजेनं करायची असते. बरं परसातलं आपल्याला काय माहिती नाही ना तर करायला जाऊच नये. अगदीच माहिती नसेल ना तर कुणाची तरी मदत तरी घ्यावी की नाही. पण या काकांनी तर किस्साच केला. माहितगाराला सोबत न नेता कॅमेरामॅन सोबत घेऊन गेले. बघा मी कशी शेती करतोय, ही गोष्ट सांगायला लाईव्ह सुरू केलं. शेती कीती उगवेल याची फिकीर अजिबात नव्हती. पण फिकीर सोशल मीडियावर लाईक्स आणायची जास्त घाई असल्यानं काकांनी कुणाची मदत घेतली नाही. काका एकदम साऊथ इंडियन स्टाईलनं परसात गेलं. काकांच्या परसात एक केळीचं झाड कुणीतरी मोडून ठेवलं होतं.
झाडाला आधार कसा द्यायचा जेणेकरुन त्याला सरळ उभं करता येईल, असा प्रयत्न काकांनी केला. पण प्रयत्न करायचा तर एकदम पद्धतशीर करायचा की शॉर्टकट मारायचा ते काकांना कळायला हवं की नाही. काकांनी काय केलं ते पाहून अनेकांच्या भूवयाच उंचावल्या होत्या. काकांना अचानक काय सुचलं ते माहिती नाही. काकांनी काय केलं एक छोटी रश्शी घेतली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण त्यांच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. त्यांनी केळीचं झाडं कुठेतरी आधाराला जागा शोधत होते. तरी म्हटलं होतं जरा ट्रेनिंग तरी घ्या. परसात कसं वावरायचं पण काकांनी कुठं ऐकलं. चिव्याच्या एका काठीला खाली खेचलं. त्याच्या टोकाला एक केळीला बांधलं. काकांना वाटलं आत्ता काम झालं पण काकांनी केळीचं झाड सोडलं तेव्हा काम फत्तेच झालं होतं. चिव्याची काठीवर इतक्या जोराने वर गेली की अख्ख झाडं मुळासकट उपटलं आणि चिव्यासकट दहा फूटवर जाऊन लटकू लागलं. अहो काका नाही जमत तर कशाला स्वतःची फजिती करून घेता. सगळा कार्यक्रम लाईव्ह झालायं तुमच्या अक्कलेचे तारे दिसले. परत परसाकडे जाल ना तेव्हा कॅमेरामन नको, कुणीतरी जाणकार घेऊन जा नाहीतर करायला जायचा वडा आणि व्हायची भजी….
बघा व्हिडीओ :