Breaking News
Home / मनोरंजन / न्हावी काकांना दम भरणाऱ्या मुलाचा नवीन व्हिडीओ होतोय वायरल, पाहून हसू आवरणार नाही

न्हावी काकांना दम भरणाऱ्या मुलाचा नवीन व्हिडीओ होतोय वायरल, पाहून हसू आवरणार नाही

मराठी गप्पाच्या आपल्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिलेले आहेत. त्यांना उदंड अशी वाचकसंख्या लाभलेली आहे. आपल्या या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सहसा एखादा वायरल व्हिडिओ हा एकंच असतो. त्याचा पुढचा भाग येत नाही. पण गेल्या काही दिवसांत आमच्या टीमला काही वायरल व्हिडियोजचे पुढील भागही मिळाले आहेत. त्यातला एक म्हणजे न्हावी काकांना ओरडणाऱ्या मुलाचा वायरल व्हिडियो. या मुलाचं नाव अनुश्रुत असं असून तो नागपूर येथे राहतो. त्याच्या वडिलांनी त्याच्या या बाललीला आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमांतून सगळ्यांसमोर आणल्या. काही काळापूर्वी त्यांनी अजून एका व्हिडियो ला शेअर केलं होतं, जो पुढे वायरल झाला. आज त्याच्याच विषयी थोडंसं.

या व्हिडियोत अनुश्रुत पुन्हा एकदा केसं का’पून घेताना दिसत असतो. काहीसे रडवेले भाव आपल्याला नकळत जुन्या वायरल व्हिडियोची आठवण करून देतात. या बाळाला केस का’पून घ्यायचे नसतात, असं पहिल्याच काही वाक्यांत कळून येतं. तेव्हा मग न्हावी काका त्याला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याचं लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. त्याला विचारतात वा’घ कसा बोलतो. त्यावर हे छोटे महाशय आवाज काढून तर दाखवतात पण त्यांच्या डोक्यात येतं, अरे पण वाघ बोलतो कुठे? मग न्हावी काका पण कमी थोडे असतात. वाघ कसा गुरकावतो असं विचारून दाखवतो. आपल्या निरागासतेने अनुश्रुत ते करून दाखवतो. न्हावी काकांचं काम होत असतं आणि आपलं मनोरंजन. मग पून्हा मागील व्हिडियो ची काहीशी पुनरावृत्ती दिसून येते. मी न्हावी काकांचे केस हाताने का’पून टाकीन असं अनुश्रुत म्हणतो आणि आपल्याला हसू थांबवत नाही. एवढंच नव्हे तर काका तुम्ही इथे का आलात असंही तो विचारतो. पण केस का’पणं सुरू राहतं. अजून किती वेळ लागेल असे त्याने विचारल्यावर न्हावी काका थोडाच वेळ लागेल असं सांगतात.

पण एव्हाना अनुश्रुतचा संयम संपत चाललेला दिसून येतो. पण न्हावी काका आणि त्याच्या पालकांनी सांगितल्यावर तो शांत होतो आणि हा व्हिडियो संपतो. संपूर्ण व्हिडियोभर आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य कायम राहतं. आपण अनुश्रुतच्या बाललीला अनुभवताना नकळत आपल्या किंवा आपल्या भावंडांच्या, मुलामुलींच्या बालपणाच्या आठवणीत हरवून जातो. त्याचं निरागस बोलणं, हावभाव आपल्याला प्रसन्न करून जातात आणि त्या बिचाऱ्याविषयी त्याच्या रडण्यामुळे आपल्याला कीवही वाटते. असो. आपलं काही क्षण का होईना पण कोणत्याही आवेशाविना निरागसपणे मनोरंजन करणाऱ्या अनुश्रुतला आमच्या टिमकडून मनापासून शुभेच्छा ! तसेच त्याच्या बाललीला आपल्या समोर आणणाऱ्या त्याच्या पालकांचे धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *