भारत हा असा जगात एकमेव असा देश आहे, जिथे ज्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या केल्या जात नाहीत आणि ज्या करायला नाही पाहिजेत त्यांना फार गंभीरपणे घेतले जाते. नको त्या गोष्टींना फार महत्व दिले जाते आणि ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे, त्यांना दिले जात नाही. एकूणच काय तर या देशात कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही.
म्हणजे जिथे ऍम्ब्युलन्स वेळेवर जायला हवी, तिथे ती जात नाही. मात्र फूड डिलिव्हरी कंपन्याचे फास्टफूड अवघ्या 10 मिनिटात पोहोचते. म्हणजे देशात रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा खेड्यात पोहोचल्या नाहीत, मात्र दुसऱ्या बाजूला गरज नसताना मेट्रो उभी केली जात आहे. आहे की नाही विरोधाभास? सरकार चुकतंय तर नाही, माणसं चुकत आहेत का तर नाही. इथे चूकत आहे ती आपल्याला आपल्या मूलभूत गरजा, नियम समजून देणारी यंत्रणा… याचे बेसिक उदाहरण म्हणजे प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये लिहिलेले असते की येथे थुंकू नये. मात्र बरोबर त्याच कोपऱ्यात सगळा लाल सडा पडलेला असतो. कुठल्याही बसस्टँडवर लिहिलेले असते, येथे लघुशंका करू नये, मात्र सगळ्याच जास्त लोक तिथेच लघुशंका करतात. आता या चूका छोट्या असतात. पण त्याचा प्रभाव मोठा असतो.
आता साधी साधी गोष्ट लक्षात घ्या. फुटपाथ हा पायी चालणाऱ्या लोकांसाठी असतो, मात्र या फुटपाथवर कधी कधी पाणीपुरीच्या हातगाड्या असतात तर कधी दुचाकी वाहने जोरात चालतात. कधी कधी टूकारांचा धिंगाना चालू असतो. तर कधी नवश्रीमंत लोक आपल्या कुत्र्यांना फुटपाथवर शी करण्यासाठी आणतात. अशा वेळी फुटपाथचा वापर करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांनी, लहान लेकरांनी, अपंगांनी काय करावे? एकूणच ही गोष्ट छोटी असली तर याचा ज्यांना त्रास होतो, त्यांचं काय?
फुटपाथ हा पायी चालणाऱ्या लोकांसाठी असतो, इतका साधा नियम आहे. मात्र न पाळल्याने किती अवघड होते. मात्र आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात वाहतुकीचा एक छोटासा नियम न पाळल्याने दोन व्यक्तींचा अपघात झाला. दुर्दैवाने या अपघातात त्यांचा जीव गेला. ही घटना अवघ्या काही क्षणांची आहे. इथे जर खबरदारी घेतली असती तर कदाचित ते एकदम धडधाकट, सुखरूप घरी पोहोचले असते. पण एक छोटासा नियम त्या दोघांसाठी जीवघेणा ठरला.
या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, दोन माणसे मोठ्या हायवेवर गाडी एका बाजूला घेऊन उभी आहेत. नॅशनल हायवे असल्याने अशी कुठेही गाडी रोडवर थांबवता येत नाही. कारण नॅशनल हायवे वर गाड्या खूप स्पीडने चालतात. नॅशनल हायवे वर लेन बदलताना सुद्धा खूप खूप काळजी घ्यावी लागते. अशातच या दोघांनी गाडी एका बाजूला उभा केली आणि थेट शेजारच्या लेनमध्ये उभा राहून गाडीकडे बघत होते, बहुदा त्यांच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. थेट शेजारच्या लेनमध्ये गेल्याने खूप वेगाने वाहत असलेल्या वाहनांना स्पीड कंट्रोल करणे, जवळपास अशक्य असते. बोलता बोलता हे दोघेही दुसऱ्या लेन मध्ये पायी घुसले आणि हायवेवर वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांना उडवले.
मिळालेल्या माहितीनुसार हि घटना वांद्रे-वरळी सी लिंकवर घडलेली असून जुना व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. ह्या अपघा’तात अमर मनीष जरीवाला आणि अन्य एका सहप्रवासीला आपले प्राण गमवावे लागले. असं बोललं जात आहे कि त्यांच्या गाडीला लागून एका घारीचा अपघा’त झाला होता. पशु पक्ष्यांविषयी असलेली तळमळ म्हणून अमर हे घारीचे प्राण वाचवण्यासाठी हायवेवरच बाजूला गाडी थांबवून बाहेर आले. आणि काही क्षणातच मागून येणाऱ्या भरधाव टॅक्सीचालकाला आपला स्पीड कंट्रोल करणं अवघड झालं. आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं.
नॅशनल हायवे वर प्रवास करताना थोडीशी दक्षता घेतली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे रस्त्यावर असो अथवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असो, अगदी छोटे छोटे नियम पाळणे, गरजेचे आहे.
आम्ही नियमितपणे आपल्याला हसवणारे, मनोरंजन करणारे व्हिडीओ पाठवत असतो. मात्र आज हा व्हिडीओ पाहून आम्ही हादरून गेलो आणि समाजात एक महत्वाचा संदेश पोहोच व्हावा, म्हणून हा लेखनाचा खटाटोप केला. काळजी घ्या इतरांचीही काळजी करा महत्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.
बघा व्हिडीओ :