Breaking News
Home / मनोरंजन / ‘पप्पा सॉरी बोला ना’ ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, शेवट तर नक्की बघा

‘पप्पा सॉरी बोला ना’ ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, शेवट तर नक्की बघा

लहान मुलं आणि त्यांचं वागणं म्हणजे एकप्रकारे मनोरंजनच असतं बघा. ते ही अगदी निखळ मनोरंजन. त्यांचं भावविश्व आकार घेत असताना त्यांच्या मनात येणाऱ्या कल्पना, त्यांचं अवलोकन या साऱ्यांचा प्रभाव पडतोच. त्यातून त्यांचं वागणं आकारास येत असत. अर्थात या काळात त्यांचा जसा व्यक्तिमत्त्व विकास होतो तसंच त्यांच्या मनातील विचार आपल्याला ही कळायला लागतात. बरं हे सगळं होत असताना कधी कधी ही लहान मुलं अशी काही गोष्ट मनात घट्ट धरून बसतात की मग विचारायला नको. काही वेळा त्यांच्या या वागण्याचा आपल्याला राग येऊ शकतो पण बहुतांश वेळेस त्यांचं वागणं आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवून जातं.

अगदी मग ते एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असतील तरीही ती बाब आपलं मनोरंजन करून जाते. बरं हे प्रत्येक वेळीच होतं असं नाही. काही वेळेस अगदी डोक्याला हात लावायची वेळच येते. आपल्याला बिरबल आणि अकबर यांची बालहट्ट ही गोष्ट आठवत असेलच. या गोष्टीतुन बालहट्ट पूरवण किती कठीण होऊ शकते हे लक्षात येतं. सुरुवातीला ऊस तोडायला सांगून मग तोच ऊस जोडून द्यायला सांगण्याचा प्रसंग तर अजूनही मनातून जात नाही. असो. पण याउलट ही घडतं.

अनेक वेळेस लहान मुलांचे हट्ट हे अगदी सहज पुरवता येतात. इतक्या सहज की काही कष्ट पडत नाहीत. पण अट एकच असते, की त्यामागचा तर्क काय हा विचार करायचा नाही. हो. अहो हसता काय. खरं आहे ते. कारण शेवटी बालहट्ट असतो तो. त्याची चिकित्सा करण्यापेक्षा त्याची मजा घेतलेली बरी. याचाच उत्तम अनुभव देणारा एक छोटा व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. नुसता पाहिला नाही तर प्रेमातच पडलो त्या व्हिडियोच्या. कारण लहान मुलांचं हट्ट करणं एकाचवेळी किती गोड,निरागस आणि मनोरंजक असू शकतं याचा हा व्हिडियो मस्त उदाहरण आहे. तसेच या व्हिडियोतुन लहान मुलांची जी आकलनशक्ती असते ती किती उत्तम असते याचीही साक्ष पटते. या व्हिडियोत आपल्याला एक छोटी ताई दिसून येते. ती कॅमेऱ्यासमोर बसलेली असते. तर कॅमेऱ्यामागून तिचे पालक बोलत असतात. त्या ताईने काही तरी असं काम केलेले असतं की तिच्या पालकांनी तिला थोडा प्रसाद दिलेला असतो असं जाणवतं. बरं अस झालं की पहिली प्रतिक्रिया ही अर्थात रडण्याची असते. तशीच आपली ताई रडत असते. पण रडता रडता तिची एक मागणी असते.

ही मागणी तिने अगदी मनापासून लावून धरलेली असते. इतकी की तिच्या मागणीवर ती एकदम ठाम असते. तिचा तो हट्टच असतो म्हणा ना. हा हट्ट काय असतो? तर तिच्या पालकांनी तिला सॉरी म्हणावं हा ! बरं पालकांना आपण सॉरी का म्हणावं याचं कारण माहिती असतं पण तिच्या बोबड्या बोलांनी ते कारण ऐकण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे ती जेव्हा कारण सांगते तेव्हा आपल्याला हसू तर येतच सोबतच तिची कीवही येते. तिचे पालकही मग चट्कन तिला सॉरी म्हणतात. आपल्याला एकंदर बरं वाटतं. तसेच व्हिडियो संपला असं वाटत असतं. पण नाही. या व्हिडियोतील शेवटचं वाक्य अजून उच्चारलं जायचं असतं. आणि जेव्हा हे होतं तेव्हा मात्र आपण मोठ्ठयाने हसायला लागतो. एवढंच नव्हे तर हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. आपणही हा व्हिडियो बघून या शेवटच्या वाक्यातील मजा लुटा. कारण एवढं निरागसपणे बोलणं क्वचितच अनुभवायला मिळतं. तसेच या मुलीच्या अवलोकनाचं ही कौतुक वाटतं.

आपण हा व्हिडियो एव्हाना बघितला असेल तर आपल्याला ही हे कळलं असेलच, तसेच आपण या व्हिडियोची मजा ही घेतली असेल. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला तर जरूर बघा. आपलं काही क्षणांत जे मनोरंजन होईल ना ते बराच वेळ लक्षात ही राहील आणि त्यानिमित्ताने चेहऱ्यावर एक हसू सुद्धा कायम राहील. आपसूकच मन प्रसन्न होईल. तेव्हा हा व्हिडियो जरूर पाहा. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *